सारणा साठी-१ वाटी सोललेला मटार,२ बटाटे, १/४ वाटी किसलेले पनीर, ३ ते ४ मिरच्या वाटून, आले लसूण पेस्ट १/२ चमचा, १ कान्दा, १ चमचा कोथिम्बिर पुदिना पेस्ट, १/२ चमचा लिम्बू रस, १/२ चमचा साखर, मीठ चवी नुसार, १ चमचा तेल.
पारी साठी- १ वाटी कणिक, १/४ चमचा मीठ,१ चमचा तेल, ३ चमचे तेल पराठे भाजाताना.
पारी-कणिक, मीठ, तेल एकत्र करून, पुरेसे पाणी घालून मऊसर कणिक भिजवून घेणे.
सारण- मटार ब्लान्च करून मिक्सर मधे बारीक करून घेणे. बटाटे उकडून घेणे. एका कढई मधे तेल गरम करून कान्दा परतून घेणे, त्यात बारिक केलेला मटार परतणे.आले, लसूण, मिरची, कोथिम्बिर, पुदिना पेस्ट टाकवी.मीठ, साखर, लिम्बाच रस टाकावा व एक वाफ काढावी. मिश्रण कोरडे झाल्यावर गॅस बन्द करावा.बटाटा कुस्करून त्यात गार झालेले मटाराचे मिश्रण व पनीर एकत्र करावे.
क्रुति- २ मध्यम आकाराच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.एका पोळीवर सारण पसरून दुसर्या पोळीने कव्हर करावे.पराठा हलक्या हाताने लाटुन घ्यावा आणि नॉन स्टिक तव्यावर तेल सोडुन खरपूस भाजावा.
गरमा गरम पराठा हिरवी चटणी आणि दह्या बरोबर खावा.
छान आहे! करून बघेन नक्की!
छान आहे! करून बघेन नक्की!
छान आहे
छान आहे
मस्त चव येत असणार.
मस्त चव येत असणार.
आज रात्री केले की सांगते कसे
आज रात्री केले की सांगते कसे झाले ते
अरे वाह्... मस्त पण फोटो..?
अरे वाह्... मस्त
पण फोटो..?
थंडीत हा पराठा म्हणजे सु़ख
थंडीत हा पराठा म्हणजे सु़ख
मायबोली वर नवीन आहे, अजून रेसीपी लिहायला शिकते आहे. हळूहळू फोटोज टाकीन. धन्यवाद.
एक्दम मस्त झाले होते!
एक्दम मस्त झाले होते!


मी पण केलं आज.. मस्त झालेत
मी पण केलं आज.. मस्त झालेत
मी कालच केले होते हे पराठे!
मी कालच केले होते हे पराठे! आमच्या घरात एकदम हिट आयटम ठरला!
थँक्स राजुल. आजच केले होते.
थँक्स राजुल. आजच केले होते. आमच्याकडेही हिट ठरले परोठे. मी पनीरचं प्रमाण मात्र जास्त घेत्ल होतं.
मस्त
मस्त
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
आज करते आहे. केल्यावर लिहीनच
आज करते आहे. केल्यावर लिहीनच कसे झाले ते.
- सुरुचि