Submitted by दिनेश. on 4 December, 2011 - 11:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी, (तीन सेमी चौरस १५/२० वड्या होतील)
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
रुचिरा
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
पण धोकर डालना असं नाव का? आपण
पण धोकर डालना असं नाव का? आपण चण्याची डाळ तर धुवूनच घालतो ना?
छान आहे. मला प्रथम शिर्षक
छान आहे. मला प्रथम शिर्षक वाचून वाटले की विनोदी लेखन आहे
दिनेशदा सजावट खुप सुंदर
दिनेशदा सजावट खुप सुंदर केलीत.
मलाही पहीला धोकर डाला म्हणजे काहीतरी वेगळ असेल असच वाटल.
पाककृती छानच आहे.
आत्ताच रुचिरात ही कृती वाचली
आत्ताच रुचिरात ही कृती वाचली . प्रमाण आणि कृती ( तांदूळ पीठ वगळता ) सेम आहे
.
दिनेशदा, हा बंगाली पदार्थच
दिनेशदा, हा बंगाली पदार्थच आहे. ढोकार/ धोकार दालना (दालना = रस्सा) असं नाव आहे खरं तर. या वड्यांचा रस्सा करतात. आणि यात फक्त चण्याचीच नाही तर इतरही डाळी असतात बहुदा. त्याचं रेडिमेड मिक्स मिळतं आमच्याकडे. मला सध्या अगदीच वेळ नाहीये, नंतर व्यवस्थित कृती टाकेन इथे.
रच्याकने, एकदम तोंपासु फोटो पाहून. उद्यापरवा केलेच पाहिजे
वड्यांची जाडी बरोबर आहे. आणखी पातळ छान नाही लागत रश्शात.
ओगले आज्जींचाच शब्द आहे हा.
ओगले आज्जींचाच शब्द आहे हा. आता शीर्षकात केला खुलासा.
आभार वरदा, मला अपेक्षा होतीच कुणीतरी खुलासा करेल याची.
आता रस्सा पण करुन बघीन.(कृती मिळाली तर..)
कोलकात्याला मी खाल्ला त्याचा
कोलकात्याला मी खाल्ला त्याचा आकार (प्रत्येकवेळी) शंकरपाळ्याचा होता. फोटो एकदम मस्त
माझ्याकडे आलेल्या सर्व पाहुण्यांना मी हा पदार्थ टेस्ट करण्याचा आग्रह करायचेच :), एकदम आवडीचा.
वरदा, नक्की टाक पाकृ.
मस्तच! सजावट भारीच केलियेत
मस्तच!
सजावट भारीच केलियेत दिनेशदा
ठमे
पदार्थ नवीनच. आधी हिंदीतून
पदार्थ नवीनच.
आधी हिंदीतून काहीतरी लिहिले असल्यासारखे वाटले.
सजावट छान झालिये.
भारी दिसतोय
भारी दिसतोय
छान वाटतोय पदार्थ. आमचे एक
छान वाटतोय पदार्थ.
आमचे एक बंगाली स्नेही आहेत त्यांच्याकडे सिमिलर पदार्थ असतो जेवणात. पण तो ग्रेव्हीमधे असतो. आणि त्याला ते धोका/धोखा म्हणतात. तो भाताबरोबर खातात.
दिनेशदा खूप छान सजवल आहे. चव
दिनेशदा खूप छान सजवल आहे. चव पण खूप असेल.
दिनेशदा , खुप सुन्दर फोटो,
दिनेशदा ,
खुप सुन्दर फोटो,
वरदा १००% अनुमोदन !!
हा बंगाली खाद्य पदार्थाला बंगाली लोकात खास स्थान आहे.
प्लेटिंग फारच सुंदर आहे. वरदा
प्लेटिंग फारच सुंदर आहे.
वरदा यांनी म्हटलंय की या वड्यांचा रस्सा करतात, ते वाचून पाटवड्यांची आमटी आठवली.पाटवड्या चण्याची डाळ भिजचून वाटण्याऐवजी सरळ बेसनाच्याच करतात ना?
फोटो बघूनच तोंपासु
फोटो बघूनच तोंपासु
दिनेश इथे पदार्थांची चव नाही
दिनेश इथे पदार्थांची चव नाही कळत, पण तुमचं प्रेझेंटेशन अफलातून असतं..
पाहूनच पदार्थ खावासा वाटतो.
ती सजवलिली प्लेट पाहुन सरळ
ती सजवलिली प्लेट पाहुन सरळ ओढुन घ्यावीशी वाटते :प
मला बंगाली ग्रेव्हीची रेसिपी
मला बंगाली ग्रेव्हीची रेसिपी द्या रे कुणीतरी.
(सजावटीत रांगोळीची हौस भागवलीय, दुसरे काही नाही !)
वॉव.. सह्ही दिसतीये धोकर
वॉव.. सह्ही दिसतीये धोकर डालना..
करून पाहीनच
दिनेशदा, उद्या देते रेसिपी
दिनेशदा, उद्या देते रेसिपी
बंगाली स्वयपाकात चणाडाळ ,बेसन
बंगाली स्वयपाकात चणाडाळ ,बेसन बरेच वापरतात..फिश फ्राय करताना,ताकाच्या तयार कढीत ती उकळवताना त्यात तयार ओम्लेट चे तुकडे सोडायचे -भज्यांऐवजी],कांदा,बटाटा,फ्लॉवर्,टोमॅटो ची बेसन वापरुन भजी,पिठ पेरुन पालेभाज्या.वांग्याचे काप पिठ पेरुन तव्यावर परतलेले...त्यात धोकर दालना ची रस्सा भाजी खुप आवडती...एक पाहिले कि पोळीसाठी गहुपिठा ऐवजी मैदा जास्त वापरतात त्याचा पराठा किंवा लुची/पुरी करतात..रोजच्या स्वयपाकात २ भाज्या-एक पालेभाजी हवीच्,माशाचे किंवा अंड्याचे कालवण आणि पाणी काढलेला भात असतो..१७-१८वर्ष बंगाली लोकांतच राहिले त्यामुळे कलकत्त्याचे बंगाली अन आसाम कडले बंगाली यातला फरक[रितीरिवाज्,बोली भाषेचा फरक] खुप जवळुन अनुभवला..तुमची रेसिपी अन कलात्मक मांडणी खुपच आवडली..
आभार सुलेखा, मुंबईत बंगाली
आभार सुलेखा,
मुंबईत बंगाली पदार्थ, हॉटेलमधे तरी फारसे बघितले नाहीत. बंगाली पदार्थ म्हणजे मिठाईच, असे समीकरण झालेय.
वा! छान पदार्थ आहे, आणि फोटो
वा! छान पदार्थ आहे, आणि फोटो लाजवाब देखणा!
अकु, हा पदार्थ ते लोक सात्विक
अकु, हा पदार्थ ते लोक सात्विक म्हणतात. कांदा लसुण नाही वापरत.
आता ग्रेव्हीची रेसिपी मिळाली नेटवर (बटाटा+टोमॅटो+दही वाली). वरदा/सुलेखा नी दुजोरा दिला तर आज रात्री करीन. वड्या आहेतच.
लुची/पुरी करतात >> लुची
लुची/पुरी करतात >> लुची तांदळाच्या पिठाची असते ना ?
हा पदार्थ ते लोक सात्विक म्हणतात. कांदा लसुण नाही वापरत. >> तसेही बंगाली पदार्थांमधे कांदा लसुण कमीच दिसले मला. स्ट्राँग चव म्हणजे मस्टर्ड सॉस
आपला जसा आदिक महिना असतो जावयांसाठी, तशी तिथे जमाई शष्ठी असते. तेंव्हा हा पदार्थ बहुतेकांकडे होताच. थोडक्यात 'खास' दिवशी केला जातो. (वरदा ?)
काय दिसतायेत !!
काय दिसतायेत !!
दिनेशदा, दही नाही हो घालायचं
दिनेशदा, दही नाही हो घालायचं (कल्पनेनेच कसंतरी वाटलं). टोमॅटोपण नाही घालत. कांदालसूणही नाही. तसंही बंगाली स्वयंपाकात हिंग आणि लसूण जवळजवळ तडीपारच असतं
मोहरीच्या किंवा साध्या तेलाला सणसणीत तापवून (फोडणीसारखं) त्यात आधी बटाटे मोठ्या फोडी करून बर्यापैकी खरपूस सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. मग जास्तीचं तेल काढून उरलेल्या तेलात तेजपाता/ तमालपत्र, हळद घालायची. बटाटे घालून जिरेपूड, धणेपूड, मीठ, थोडं आलं बारीक किसून किंवा तुकडे करून, हवं असल्यास तिखट असं सगळं घालून पाणी घालून उकळी आणायची. बटाटे शिजत आले की धोका त्यात घालायचा आणि ५ मि. नी गॅस बंद करायचा. वरती दिसायला छान म्हणून २-३ आख्ख्या हिरव्या मिरच्या उकळी आल्यावर नुसत्याच सोडायच्या. किंचित वास लागतो पण तिखट लागत नाही. आणि पिवळ्या रश्श्यात हिरव्याजर्द मिरच्या देखण्या दिसतात.
हा पदार्थ फक्त भाताबरोबरच खातात. निरामिष/ व्हेज जेवणातली ही एक डेलिकसी आहे.
लुची मैद्याचीच असते. त्याशिवाय का इतकी लुसलुशीत लागते? सगळं बंगाली जेवण म्हणजे हार्टट्रबल, डायबेटिस, युरिक अॅसिडचा प्रॉब्लेम यांना अगदी सहर्ष आमंत्रण असतं
हो, आरती. जमाईषष्ठीला दरवर्षी जावयाला खास सासुरवाडीला आमंत्रण असतं आणि यथेच्छ मासे, मांसाहार आणि मिठाई चारली जाते. हे असे व्हेज पदार्थ उगाच आपले असावेत म्हणून. पण माझ्या नवर्याची सासुरवाडी बंगाली नसल्याने आणि इतक्या दूर असल्याने तो त्या दिवशी स्वतःच्याच घरी जेवतो (आणि माझ्या माहेरी आला की सगळे दिवस जमाईषष्ठी असल्यासारखा हादडतो
)
मस्टर्ड सॉसला काशुंदी म्हणतात
सुरेख दिसत आहेत
सुरेख दिसत आहेत
.
.
Pages