Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 December, 2011 - 14:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
१) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या.
२) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे.
३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.
४) एका डिश मध्ये तांदळाचे सुके पिठ घेऊन त्यात हे काप घोळवायचे.
५) तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळायचे.
६) हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे.
झाले तय्यार तळलेल्या वांग्याच्या तुकड्या म्हणजे वांग्याची भजी हो.
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी २ कमीत कमी.
अधिक टिपा:
हा प्रकार ८०% लोकांना माही असणार पण हल्ली कॅमेर्याला छंद लागलाय ना पदार्थांचे फोटो काढून माबोवर प्रकाशीत करण्याचा
तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसनही वापरतात.
तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पिठ तेल लगेच शोषून घेते.
भाकरी व चपाती बरोबर एकदम छान.
लहान मुलांना आवडतात
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात भजी कुठे आहेत ?
यात भजी कुठे आहेत ?
जागू, जागू, जागू.... आता
जागू, जागू, जागू.... आता बाजारात गेलं पाहिजे, वांगी आणली पाहिजेत अन काप करून खाल्ले पाहिजेत...
वांग्याच्या तुकड्या 


मस्त गं
मी बरीक, यात लसूण बारीक चिरून पण घालते, तेव्हडीच माश्यांची जरा अजून चव
वाव...नक्की करणार. सिंपल मस्त
वाव...नक्की करणार. सिंपल मस्त रेसिपी.
मस्तच... सोपाय... नक्की
मस्तच... सोपाय... नक्की करणार!
कुरकुरीत लागतात हे काप (मी
कुरकुरीत लागतात हे काप (मी ८०% मधे.)
मी ही अशीच पण बेसन लावुन करते
मी ही अशीच पण बेसन लावुन करते ही कापं, ती लांबट डार्क वांगी असतात त्यांची करते.
मस्त फोटो जागू आमच्याकडे
मस्त फोटो जागू
आमच्याकडे तांदूळाच्या पीठात रवाही मिसळतात. त्याने मस्त कुरकुरीत होतात काप.
तो पा सु
तो पा सु
अग्गो बाई जागू............काय
अग्गो बाई जागू............काय गं? एकदम वांग्यांवर?
असो .........अशीच कारली पण मस्तच होतात.
हो हो दिनेशदा मी पण ८०% त.
एक अवांतर आणी आगावु सुचना:
एक अवांतर आणी आगावु सुचना: पाककृतीमध्ये लागणार्या जिन्नसांमधे फोटो काढायला कॅमेरा हे पण हवे आहे ना?


मीपण हे रवा लावून करतो. छान
मीपण हे रवा लावून करतो. छान होतात
नेहमी प्रमाणे मस्तच जागू,
नेहमी प्रमाणे मस्तच जागू, एकदम तोंपासु
बघुनच भुक लागली , नाही तरी आज
बघुनच भुक लागली , नाही तरी आज शनिवार आहे, हे चालेल
बाळू जोशी काही जण ह्याला भजी
बाळू जोशी काही जण ह्याला भजी म्हणतात.
नेहा, योगेश, साक्षी, दिनेशदा, प्रिती, रचु, इनमिनतीन.
मंजूडी,जागोमोहन आता मी एकदा रवा लावूनही करुन बघेन.
मानुषी मी परवाच कारल्यांचे काप केले. फोटो काढले आहेत रेसिपी वेटींग लिस्ट वर आहे.
गिरीकंद
आणि एखादी व्यक्ती फोटो काढायला जवळ असेल तर तिही ऑप्शनल म्हणून.
अशीच बटाट्याची, कारल्याची आणि
अशीच बटाट्याची, कारल्याची आणि नवलकोलाच्या सालांची कापंही करतात.
)
नवलकोलांची कापं दूधभाताबरोबर मस्त लागतात.
कारल्याची मसालेदार कापं ड्रिंक्सबरोबर छान लागतात. (म्हणे
प्राची आआ$$$$$$$$$$$$$$
प्राची आआ$$$$$$$$$$$$$$
जागूची पा.कृ. बघुन मला ही
जागूची पा.कृ. बघुन मला ही फुलांची नक्षी आठवली.
जागू, अगं मी पण कालच केली
जागू, अगं मी पण कालच केली होती. फार छान लागतात.
जागु,मी पण ८०% मधेच.. अशीच
जागु,मी पण ८०% मधेच..

अशीच भेंडीची पण करु शकतो. भेंडी मधे सुरी चे काप देऊन बाकी सगळे सेम वांग्यासारखेच.
मस्त लागातात.
मी याला भाजणी वापरते (सा.
मी याला भाजणी वापरते (सा. बांनी शिकवीले आहे हे काप). मी वांग वर्ज्य प्रकारातली (जिभ खवखवते) पण हे चालते मला
आरती सुंदर नक्षी आहे ग
आरती सुंदर नक्षी आहे ग वांग्यांची.
प्रज्ञा :स्मितः
प्रिती, मोनाली तुमच्या पद्धतीने ही करुन बघते.
जागु ही रेसिपी मस्त आणि सोपी
जागु ही रेसिपी मस्त आणि सोपी करून पाहण्या जोगी आहे.
शाकाहारी माशांचे तुकडे..!!
शाकाहारी माशांचे तुकडे..!!
दक्षे, सारीका ह्या तुकड्या
दक्षे, सारीका ह्या तुकड्या खास तुमच्यासाठी.
माशांचं तेल वांग्यावर वांगी
माशांचं तेल वांग्यावर
वांगी बाकी सुबक ठेंगणी सुंदर खाशी दिसताहेत
वांगे क्लबात या
वांगे क्लबात या
माझ्या फेवरेट कचर्या.तोंडाला
माझ्या फेवरेट कचर्या.तोंडाला आलेले पाणी गिळून टाकले.
बाळू जोशी काही जण ह्याला भजी म्हणतात.>>> नाही जागू,अट्टल भज्यांप्रमाणे, वांगी ,कालवलेल्या बेसनात बुडवून डीप फ्राय केली जातात.
आरती, एवढ्या कचर्या तुम्ही केल्यात.ग्रेट !
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
हे क्काय जागुले?? माश्या चं
हे क्काय जागुले?? माश्या चं ... आपलं वड्याचं तेल वांग्यावर????????
आई ची ही हीच रेसिपी आहे वांग्याच्या कापांची..
@ काउ ५व्याच आठवड्यांत जुने
@ काउ
५व्याच आठवड्यांत जुने धागे (अर्थात तुम्हाला हवे तेच) लक्षांत ठेवून वरती आणायचे फार कष्ट नका घेत जाउ.
बाकी,
एकाच धाग्यावर जामोप्या आणि काउ....
वा काउ ... बढिया हय....
आता आमच्या काऊ मायबोलीवर काय-काय दाखवतील ह्याचा नेम नाही....
Pages