युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिती,
मी आधी अनेकवेळा लिहिलेय कि प्रेशर कुकर, केक भाजण्यासाठी वापरु नये. त्या तपमानाला त्याने कार्य करावे अशी त्याची घडण नसते. अति तापल्यामूळे त्याचा आकार बिघडू शकतो. तसेच तो तंदूर म्हणुनही वापरु नये (अगदी प्रसिद्ध शेफ लोकांनी सांगितले असले तरी) याबाबतीत कूकरबरोबर येणारी माहीतीपुस्तिकाच प्रमाण मानावी.
केक भाजण्यासाठी मोठे भांडे, त्यावर झाकण आणि आत तापलेली वाळू एवढे पुरेल. बिस्किटांसाठी सपाट तवा आणि त्यावर उलटे झाकण बसेल अशी कढई पण चालेल.
बेक करणे नेहमीच होत असेल तर बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या अवनपैकी एखादा जरुर घ्यावा. त्याचा अनेकप्रकारे उपयोग होऊ शकतो.
(हे सगळे मी हॉकिन्स मधे बिलिंग अँड कलेक्शन ऑफिसर म्हणून काम करत असताना तिथल्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांनी सांगितले होते.)

बिस्किटांसाठी सपाट तवा आणि त्यावर उलटे झाकण बसेल अशी कढई पण चालेल.
>>>>>>>>>>>>>

यात वाळु??? वापरावि ना????

केक करताना

मोठे भांडे+वाळु+आत केक+वर झाकण असेच ना??
किति वेळ??

बिस्किट आणी केक साठी वेळ वेगळ्या की सारख्याच?

जाड दळलेले गव्हाचे पिठ आहे ५ किलो,,>>>>
जसा केक कुकर मधे करु शकतो तसे बिस्किटे करता येतिल का???>>>>

तुमच्या जवळपास जर एखादी बेकरी असेल तर ते तुम्हाला बिस्कीट बनवून देवू शकतात. १ की. पिठाला अर्धा की. तूप, अर्धा. की साखर एवढे साहित्य आणि त्यांची मजूरी.

दुसरा पर्याय असा की ते पिठ जर वस्त्रगाळ करून घेतले तर त्यातले बारीक पिठ निघून येईन आणि उरलेल्या पिठासाठी मग इथे सुचवलेले पर्याय वपरता येतील.

आपण जितकं धान्य घेतो, ते दळलं की तितक्याच वजनाचं पीठ होतं का, की कमी / जास्त होतं?>>> पिठ तितकच होत. झालच तर जरास कमी.
जर तुम्ही घरी येऊन मोजलत तर मात्र ते कमी भरण्याची शक्यता जास्त असते. कारण बरच पिठ हे उडतं. तुमच्या गिरणीवाल्याकडे जिथे पिठाचा डबा ठेवतात तिथे जर जाळी लावलेली असेन तर तिथे ते डबे बदलताना सांडलेले पिठ साठवतात.
जसे वजनाचा काटा मारतात तसेच गिरणीवाले ही काही पिठ मारतात. हे जमा केलेले पिठ मग एखाद्या मेसवाल्याकडे किंवा जनावरांना खाद्य म्हणून गोठेवाल्यांकडे जातं.

केकसाठी भांड्याची रचना सांगितलीय तशीच. अश्या प्रकारे केला तर तपमान निश्चित सांगता येणार नाही (जमल्यास झाकण म्हणून गरम तवा आणि त्यावर तापलेली वाळू पण ठेवता येईल. वेळेसाठी मूळ कृतीत जेवढा वेळ दिलाय त्या अंदाजाने, पण खमंग वास सूटल्यावर आणि केकमधे सुई खुपसून परिक्षा करावी लागेल. आई अशाप्रकारे अगदी खुप वर्षांपासून केक करतेय. तो भाजत आला कि घरभर दरवळ पसरतो.
बिस्किटांसाठी वाळू नको.

धन्स दिनेशदा.........

बिस्किटांसाठी वाळू नको>>>>>>>>>>
मग ति कशी बेक होतिल????

बिस्किटांची जाडी कमी असते ना. (केकपेक्षा) त्यामूळे खालचा जाड तवा आणि झाकण असलेल्या कढईच्या डोमच्या आत कोंडलेली उष्णता पुरेशी होईल.

धन्यवाद... Happy
प्रश्न चुकिच्या ठिकाणी विचारर्‍याबद्द्ल माफ करा.. पण मला कधीपासून हा प्रश्न विचारायचा होता, पण लिंकच भेटत नव्हती. शेवटी न राहून ईथेच विचारला. Happy

फ्रुट सलादमध्ये अननस टाकल्यास सलाद कडु होतं. कडु होऊ नये म्हणून काय करावे?

फ्रुट सलादमध्ये अननस टाकल्यास सलाद कडु होतं. कडु होऊ नये म्हणून काय करावे?>>> अननस घालू नये. Lol

सॉरी, पण अगदीच राहवलं नाही. Happy Light 1

मंजू, अननस पाकवलेला किंवा कॅनमधील असेल तर नाही होत फ्रूट सॅलड कडू. एनी वे, शक्यतो आयत्या वेळीच घालायचा अननस, किंवा वरून टॉपिंग म्हणून. करून बघ.

गुळ खराब होऊ शकतो का? 4-5 महिन्यापुर्वी आणलेला आहे, थोडा थोडा वापरते नेहमी, आता उघडुन पाहिला तर त्यावर पांढरी बुरशी आलीय. काय करु?

.

.

.

बुरशी आली असेल तर अजिबात वापरू नका. तब्येतीला अपाय होण्यापेक्षा थोडा गुळ वाया गेलेला परवडला.

पुण्यात पूर्वी संतोष बेकरीत आपण दिलेल्या कणकेची बिस्कीटे भाजून मिळत. आता अश्या बेकर्‍या कोणास माहीत आहेत का?

दिनेश, रोज ब्रेफा ला उकडावी लागू नयेत म्हणून आठवड्याभराची उकडून ठेवावी यासाठी विचारले. सकाळी जरा कमी युद्धकाळ असतो घरी.

दक्षिणा, रोज उकडलेले अंडे खाऊन कंटाळा नाही का येणार ? अंडे शिजवायच्या अनेक पद्धती आहेत. रोज वेगवेगळ्या प्रकारे शिजवता येईल.
तेला तूपाचा अजिबात वापर न करता, पोच करणे हा एक चांगला पर्याय आहे.

दुध विरजण लावले तर दही फाटल्यासारखे दिसत आहे.. तीन ते चार वेळा विरजण बदलवून झाले, लिंबू, व्हीनेगर, तुरटी वापरून दही लावण्याची पद्धत कुणाला माहीत आहे का?

Pages