पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फास्टटॅग नसेल आणि तुम्ही फास्टटॅग लेन मध्ये गाडी घुसवली तर दुप्पट पैसे घेण्याचा शासनाचा निर्णय आहे. म्हणून कदाचित तुम्हाला जास्त पैसे भरावे लागले असतील.

"As per NH Fee Rules 2008, any vehicle not fitted with FASTag or vehicle without valid, functional FASTag entering into the FASTag lane of the fee plaza shall pay a fee equivalent to two times of the fee applicable to that category," the Ministry said.

हॉटेल बुकिंग,टॅक्सी बुकिंग ऑनलाईन च करावे.
एका मराठी अभिनेत्रीची रत्नागिरीतल्या हॉटेलकडून फसवणूक झाली. ऑनलाईन बुकींग करून ही हॉटेलने पैसे मिळाले नाहीत हे कारण दिले व त्यांना रूम दिली नाही.

https://www.esakal.com/manoranjan/aai-kuthe-kay-karte-fame-madhurani-pra...

मी पण मुंबई एअरपोर्ट शेजारी चकाला त एका हॉटेलच बुकिंग केलेलं agoda.com वरुन

पण आमचं आणि agoda च tie up आता नाही अस सांगून रूम नाहीच दिली

मी त्यांना त्या साईटवर तुमचं हॉटेल कसं आहे मग अजुन अस विचारलं तर उडवाउडवीची उत्तर मिळाली

Complaint raise केली होती पण रिफंड नाही मिळाले

त्या हॉटेलवर जाईपर्यंत landline वर २-३ वेळा कॉल केलेला रूट साठी

हॉटेलवर तो नंबर दाखवलेला तर आमचा landline नंबर नाही हा अस सांगितलं

खूप उशीर झालेला आणि सकाळी लवकर निघायचं होत मग तिथे जवळचं एक हॉटेल पाहिल आणि मुक्काम केला.

ओह!
रिफंडही नाही म्हणजे, याबद्दल तक्रार करता यायला हवी अजून कुठे.

इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असावे आणि त्याच लायकीचा माणूस असेल तरच संवाद साधावा.
हॉटेल बुकिंग,टॅक्सी बुकिंग ऑनलाईनच करावे.

हे नवीनच. भारतात खाडखाड फाडफाड इंग्लिश बोलणारे सगळीकडे फिरत असतात. फक्त लायकीचा ओळखायचा.

Fastag normally doesn't expire. May be it was blacklisted.
Mumbai Pune - khopoli toll 203 and talegaon toll 67 total 270 same is for return.

A FASTag is valid for a time period of 5 years. Is it mandatory to have the FASTag? Yes. Since 16 February 2021, the Government of India has made it mandatory for users to have FASTag installed on their four-wheeler vehicles.

How do you check the validity of a FASTag?
The toll-free number +91-8884333331 can be used to check your Fastag balance.

फास्टटॅग पाच वर्ष वॅलिड आहे असे वाचायला मिळतेय पण नम्तरही तो वापरता येतो हेही आहेच. साधारण २०१७-१८ पासुन लोक वापरताहेत, २०२१ पासुन बण्धनकारक झाले. म्हणजे आजच्या घडीला ५ वर्षे तो वापरणारे मोजकेच असतील.

बाकी वर लिहीलिय तशी घटना ओळखीत एकासोबत झाली. तेव्हा फास्ट टॅग नव्हते. त्यांनी पैसे देऊन टोल रिसिट घेतली पण चेक केली नाही. ती लोणव्ळ्यापर्यंतचीच होती. पुण्याला पोचताना रिसिट दाखवावी लागली तेव्हा कळले व पुर्ण टोल भरावा लागला. हे ऐकल्यापासुन मी नियमीत रिसिट चेक करायला लागले होते Happy

साधी सोपी,सर्वांना समजेल अशी,सरळ स्पष्ट नियम असणारी, उच्च तंत्र नी युक्त, निर्दोष अशी आधुनिक यंत्रणा निर्माण करणे अजून पण आपल्याला जमत नाही .
तरी आधुनिक तंत्र चा हव्यास मात्र आहे.
प्रतेक system मध्ये काही ना काही दोष आहे.
सर्व बुद्धिमान माणसं देश सोडून गेली काय?
की योग्य जागेवर चुकीचं माणसं बसलेली आहेत.

हॉटेल बुकिंग,टॅक्सी बुकिंग ऑनलाईन च करावे.
एका मराठी अभिनेत्रीची रत्नागिरीतल्या हॉटेलकडून फसवणूक झाली. ऑनलाईन बुकींग करून ही हॉटेलने पैसे मिळाले नाहीत हे कारण दिले व त्यांना रूम दिली नाही.>> हे असं सेम आमच्या बाबतीत 4 वर्षांपूर्वी झालेले. अंदमान ला एकजण ओळखीचे जाऊन आलेले नुकतेच. त्यांच्याकडून त्याना तिकडे फिरवणार्या तिथल्या लोकल गाईड/एजनत चा नंबर घेतला. सविस्तर बोलणं झालं. तिथून पुढे हॅवलोक च्या वगैरे बुकिंग साठी एडव्हान्स ऑनलाइन ट्रान्सफर केला. बाकी पैसे ओके वाटले पण तो रूम बुकिंग 2500 पासून च सुरू आहे म्हणत होता. इकडे oyo वर 700 पासून रूम्स दिसत होत्या. अंदमान ला जायच्या आधी तिरुपती ची रूम बुकिंग oyo वरून केलेली. रूम्स ,सर्व्हिस छान होती. म्हणून त्या अंदमान वाल्या एजंट ला सांगितलं बाकी बुकिंज कर, रूम्स आम्ही इकडून बुक करतो. तो ओके म्हणला. आणि आम्ही इथं बसून 3 रात्री अंदमान आणि एक रात्र हॅवलोक ला रूम्स बुक केल्या. 1500 रु च्या आसपास. तिथं पोचल्यावर लॉज वाला म्हणला आमचा oyo शी आता काहीही काँट्रॅक्त नाही. आमच्या रूम्स ऑनलाइन बुक होत नाहीत. त्याला मोबाईल वर दाखवलं तरी म्हणे आमचा oyo शी काहीही सम्बन्ध नाही. सगळा मूड च गेला पहिले. मग एक दोन ठिकाणी बघून एक रूम घेतली. तो एजंट म्हणत होता तसे 2 अडीच हजार च्या खाली एक ही रूम नव्हती. आवरुन बाहेर पडलो. आमच्या पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या बुकिंगची तिकिटं तो एजंट घरी विसरून आला होता त्या दिवशी. त्याला पहिले जाऊन तिकिटं आणायला सांगितली. आणून दिली तेव्हा जीव भांड्यात पडला. तिथलं कुठलंही हॉटेल ऑनलाइन बुकिंज घेत नव्हतं। पण सगळी oyo वर दिसत होती. त्या दिवशीच फिरणं झाल्यावर त्या एजंट कम द्रायव्हर ला पोलीस स्टेशन ला न्यायला लावलं नवऱ्याने. तिथं पोलीस म्हणले रोज आशा 4 कल्पेन्ट्स येत असतात. पण तुम्ही बुकिंज जिथून केलीत तिथं कप्लॅन्ट करा. मग परत नाद सोडून दिला आणि ट्रिप ला प्राधान्य दिलं. एजंट कमी द्रायव्हर खरच चांगला होता. आणि सांगितलं की नुसतं रूम पण बुक करू का विचारू नकोस. आमचा अनुभव सांगत जा ऑनलाइन रूम्स बुकिंग चा. त्याला शेवटी खुशी पण दिली. ट्रिप करून घरी आल्यावर त्या oyo कस्टमर केअर वाल्याला रोज तास तास फोन करून पिडलं. वादावादी केली . तेव्हा कुठं महिन्याभराने ते पैसे मिळाले. Oyo वरचा विश्वास च उडाला तेव्हापासून.

सरळ त्या हॉटेल च्या अधिकृत वेब साईड वरून बुकिंग ची सुविधा असेल ना.
सरासरी लहान लहान हॉटेल पण स्वतःची वेब साईड चालू करतात किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण देतात.

मी ऑनलाइन एजंट्स ( booking.com की अजून कोणती आणि मेक माय ट्रिप आणि अजून एक) कडून मोजक्या वेळीच रूम्स बुक केल्या. त्याही आधी हॉटेलला डायरेक्ट फोन करून हा एजंट ऑनलाईन अमुक तारखांचे बुकिंग एवढ्याला दाखवतोय त्यात हे हे इन्क्लुड आहे ते बरोबर आहे ना याची खात्री करून घेऊन.
तुम्ही डायरेक्ट बुकिंग घेऊन कमी दरात द्याल का असेही विचारतो, पण बहुतकरून डायरेक्ट बुकिंगला तेवढेच किंवा जरा जास्तच रेट सांगतात.
यात आधी एजंट साईटवर हॉटेल शोधणे आणि मग गुगलवर त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर शोधणे हे करावे लागते. नसेल नंबर मिळत तर दुसरे हॉटेल शोधायचे.

Make my trip वर 1 रुपयात बुकिंग, 1 मिनिट आधी पर्यंत फ्री कॅन्सलेशन असे ऑप्शन असतात. पण ते सगळ्याच हॉटेल्स ना नसतात.

वर्णिता >>> मलाही डिसेंबर २०१९ मध्ये चंदीगड व मनालीला असाच अनुभव आला, कोणतेही हॉटेल्स ओयोहून केलेली ऑनलाईन बुकिंग स्वीकारायलाच तयार नव्हते, व्यक्तीश: बुकिंगला घेत होते. पुढे चंदीगड ला एका हॉटेलवाल्याने ओयोनी बहुतेक सगळ्याच हॉटेलांची फसवणूक केल्याचे सांगितले. कित्येक हॉटेल मालकांचे ओयोनी ८-९ लाख रुपयांची थकवल्याने चंदीगड व मनालीमधील हॉटेल असोसीएशननी ओयोकडून कोणत्याही प्रकारची बुकिंग घ्यायची नाही असा ठराव घेतला होता. तसेच ओयोच्या वेबसाईट वरून त्यांच्या हॉटेलच्या जाहिराती काढून टाकण्यासाठीही कित्येकदा कळवले होते तरीही ओयोने कोणतीही कारवाई न केल्याने असोसीएशनने कायदेशीर नोटिस पाठवली होती.

मात्र मी सद्यस्थितीबद्दल अवगत नाही.

मागच्या महिन्यात booking.com ने दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक केले. दोन्ही वेळा बुकिंग करताना काही पैसे दिले नाहीत आणि हॉटेल वर पुर्ण पैसे दिले. त्रिवेंद्रम मध्ये early checkin सकाळी ५ वाजता होते आणि आम्ही ५.३० वाजता पोहोचलो तरी देखिल त्यानी रुम दिली. दुसर्या ठिकाणी लेट चेकआउट हवे होते तेव्हा ३ वाजेपर्यन्त चेकआउट होते त्या हॉटेल मध्ये बुक केले आणी आम्ही ३ वाजेपर्यन्त हॉटेल वर होतो. थोडक्यात जे साईट वर दिले होते त्याप्रमाणे सुविधा मिळली

makemytrip वर सुध्धा चांगला अनुभव आला. कोविडच्या काळात बुक केलेल्या विमान तिकिटाचे सगळे पैसे बॅकेत जमा केले. बुकिंग क्रेडिट कार्ड वर केले होते आणि काही कारणास्तव ते कार्ड बंद केले म्हणुन त्याने पैसे थेट बॅकेत जमा केले.
ओयो कधी वापरले नाही आणि आता वापरणार

त्रिवेंद्रम मध्ये रिक्षावाल्याने मात्र फसवले. एअरपोर्ट वरुन २०० रुपये ठरवले असताना आणी गुगल मॅप वर ठिकाण दाखवले असताना सुध्धा पोहचल्यावर ४०० रुपये मागायला लागला. आणि मारायची धमकी देउ लागला. सकाळची वेळ असल्याने सगळीकडे सुमसाम होते त्यामुळे शेवटी २५० रुपयावर सेटल केले. ३ किमी साठी २५० रुपये हे खुप जास्त वाटले.

3 km साठी 250 रुपये खूप होतात.
पण तालुक्याचे ठिकाण ते बाजू चे खेडेगाव असा सकाळ च ( भल्या पहाटे सकाळी पाच च्या आत मध्ये) रिक्षा प्रवास केला तर 150 ते 200 रुपये 3 km साठी आपल्या महाराष्ट्र मध्ये पण घेतात
आणि ते पण रिक्षावाले तोंड ओलखीचेच असतात.
सकाळ ची वेळ आणि खेडेगावातील कच्चा रस्ता आणि परतीचे भाडे नाही असा त्यांचा युक्तिवाद असतो आणि तो पटतो पण.
पण त्रिवेंद्रम म्हणजे मोठे शहर आहे तिथे असे घडणे म्हणजे शॉक च आहे

Pages