पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्या विषयी हे खरे आहे.
कोणी नवीन माणसाने pmt Bus chya conductor ल अमुक स्टॉप आला की सांगा असे सांगितले की तो पाहिले तर मारक्या म्हशी सारखा त्या प्रवाशांकडे बघतो.
आणि अगदी ठरवून तो स्टॉप आला तरी सांगत नाही.
मुंबई बस मध्ये हा अनुभव येत नाही.
कंडक्टर co opration करतात.

बसमध्ये डावीकडे बघायचं. स्टॉपवर नावं लिहिलेली असतात. आपल्याकडे रूटची स्टॉप्सची नावं असलेली यादी असतेच. दोन स्टॉप्स अगोदर दाराकडे पुढे जायचं. conductorवर किती जबाबदाऱ्या टाकायच्या?

तर तिथला माणूस म्हणाला,"शिळा ब्रेड हवा असेल तर आधी ऑर्डर द्यावी लागेल!" >>> मंदार Lol हे ही निसटले होते.

पुण्यातील दुकाने म्हणजे टुरिस्ट ट्रॅपच्या बरोब्बर उलटे आहे. टुट्रॅ मधे काहीतरी चांगले अनुभवायला/बघायला/खायला मिळेल अशा समजुतीने आपण पैसे/वेळ खर्च करतो आणि प्रत्यक्षात तसे काहीच नसते. इथे दुकानदाराचे वागणे, एकूण नेपथ्य वगैरे बघून तेथे काहीच इंटरेस्टिंग नसेल असे आपण समजतो. प्रत्यक्षात ते विकतात त्या गोष्टीचा दर्जा एकदम चांगला असतो Happy

पुण्याच्या दुकानांबद्दल वर लिहिलेले किस्से म्हणजे पर्यटकांची फसवणूक म्हणता येणार नाही. हे इथे लिहिल्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करत आहोत.
आमच कस स्पष्ट आणि रोख ठोक असतो. एक घाव दोन तुकडे. आता याला तुम्ही फसवणूक म्हणू शकत नाही. त्याला आ बैल मुझे मार असे म्हणतात. आमचा आग्रह नाही. Happy

विक्रमसिंह , बरोबर आहे.
विषयांतर आहे हे म्हणुन माझा हा प्रतिसाद काढला, योग्य त्या धाग्यावर देईन.

पुण्याचे किस्से पर्यटकांची करमणुक अशा धाग्यावर टाकायला हवेत.

पुण्यातून कोल्हापुरात गेल्यावर तर हुंदका दाटून येतो गळ्यात.
पत्ता विचारला एकाला तर तो पार गंतव्य ठिकाणापर्यंत सायकल हानीत सोडायला आला. आपला पावणा चुकला बिकला म्हणजे?

तसंच एका हाॅटेलात गेलो होतो. मी रोटी आणि पंजाबी भाजी मागवली होती व कुटुंबानं थाळी. वेटरनं सगळ्यांनाच मोठी ताटं दिली आणि कोशिंबीर, पापड, चटणी,लोणचं, फरसाण आयटम, सोलकढी वगैरे माझ्याही ताटात वाढायला सुरूवात केली. मी नकोनको असा हात ताटावर आडवा ठेवला आणि त्याला म्हटलं, ""दादा, मी थाळी नाही मागवलीये. फक्त पंजाबी भाजी रोटी ऑर्डर केलिये" तर तो म्हणाला, "आणतो की ते पण. पण तोवर बाकीचं तरी वाढू द्या की मला" आजूबाजूचं सगळं वाढून झाल्यावर त्यानं पंजाबी रोटी भाजी वाढली.

पुण्यात ट्रेनिंगला आणायला हवं त्याला.

मानवजी सॉरी . तुम्हाला नव्हत म्हणल मी .
पुणेकर फसवणूक करतात अस म्हणण म्हणजे त्यांच्या रोख ठोक पणाचा उपमर्द आहे अस मला अभिप्रेत होत .
Happy

विक्रमसिंह सॉरी कशाला, तुमचा मुद्दा योग्यच आहे.
आणि तुमची पोस्ट माझ्या पोस्टच्या आधी आली तेव्हा तुम्ही मला उद्देशून म्हटले नाही हे उघड आहे, पण जरी माझ्या पोस्ट नंतर आली असती तरी तुमचा सुद्धा मुद्दा बरोबर आहे. "पर्यटकांची फसवणूक, ट्रॅप" यावर माझी पोस्ट अस्थानीच होती, मोठीही होती. या करता मी ती इथुन स्वेच्छेने काढली.
Happy

बसमध्ये डावीकडे बघायचं. स्टॉपवर नावं लिहिलेली असतात. आपल्याकडे रूटची स्टॉप्सची नावं असलेली यादी असतेच. दोन स्टॉप्स अगोदर दाराकडे पुढे जायचं. conductorवर किती जबाबदाऱ्या टाकायच्या?
Submitted by Srd on 21 October, 2022 - 05:57

पुण्यात हे शक्य नाही. कोविडपूर्व काळात (२०१९ मध्ये) २-३ वेळा पुण्यात गेलो होतो तेव्हा त्या PMPML च्या बसने प्रवासाचा योग आला होता. बस stop वर त्या stop चे नाव आणि तेथे थांबणाऱ्या बसचे क्रमांक अशी 'फालतू, बिनकामाची' माहिती अजिबात नव्हती उलट तो नुतनीकरण केलेला बस थांबा कोणत्या आमदाराने, कोणत्या साली, कोणत्या योजनेतून उभारला आहे ही 'अत्यंत महत्वाची' माहिती मात्र लिहिलेली होती!

मी आपला M-indicator (पुण्याचा data टाकून) आणि Google Map च्या आधारे प्रवास करत होतो.

दोन तीन रुटवर प्रवास केला आहे. स्टॉपवर मध्यभागी लिहिलेली नावं पुसली गेली होती. पद्धत एकच पण नावं पुन्हा लिहायला हवीत.

उलट तो नुतनीकरण केलेला बस थांबा कोणत्या आमदाराने, कोणत्या साली, कोणत्या योजनेतून उभारला आहे ही 'अत्यंत महत्वाची' माहिती मात्र लिहिलेली होती! >>> Lol

पुण्याच्या दुकानांबद्दल वर लिहिलेले किस्से म्हणजे पर्यटकांची फसवणूक म्हणता येणार नाही. हे इथे लिहिल्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. >>>> हो. आम्ही लीगल फाइन प्रिन्ट वाले टेक्स्ट मार्केटिंग ब्रोशर म्हणून देतो. तरी पब्लिकला लक्षात येत नसेल तर "मागाहून तक्रार चालणार नाही".

पण इथला अवांतराचा पॉइण्ट बरोबर आहे. त्याला मी बराच जबाबदार आहे. म्हणून मीच आवाहन करतो की मामींच्या मूळ विषयाकडे परत न्या. नाहीतर हा बाफच एक वाचक ट्रॅप आहे असे होईल Happy

बसमध्ये डावीकडे बघायचं. स्टॉपवर नावं लिहिलेली असतात. आपल्याकडे रूटची स्टॉप्सची नावं असलेली यादी असतेच. दोन स्टॉप्स अगोदर दाराकडे पुढे जायचं. conductorवर किती जबाबदाऱ्या टाकायच्या?
Submitted by Srd on 21 October, 2022 - 05:57
पुण्याच्या बशीत डाव्या बाजूला बायका बसतात हो. तिकडे बघायचे म्हणजे...

काही खूप चांगले क्वालिटी जपतात.
काही मोठ्या bakery च ज्यांच नाव असते.
ते ब्रेड ची फ्रेश च विकतात.
रात्री 9 पुढे तो फ्रेश राहणार नसेल ते ब्रेड ते किती ही पैसे दिले तरी 9 च्या पुढे विकणार नाहीत.
एक भाजी वाला मुंबई मध्ये मी बघितला होता.
तो उत्तम दर्जा ची भाजी विकतो.
अगदी पालेभाजी घेतली तरी एक पण पान खराब निघणार नाही.
पण त्याचे भाव जास्त असतात.
खराब झालेले सरळ फेकून देईल पण कोणी विकत जरी मागितले तरी देणार नाही.
त्यांनी आपले वेगळेपण जपलेले असते.

आमच्या ऑफीसमधला चहावाला....त्याला म्हटलं जरा कमी साखर घालत जा...

तर म्हणाला, " बाकी कायपण सांगा पण काॅलिटीशी काॅम्प्रमायीज करनार नाही."

१९९५-२००० चा काळ. दिल्ली चंदिगढला फोन वरून हॉटेल बुक करून तिथे स्टेशनवर/विमानतळावर पोचून पुढे रिक्षा/टॅक्सीने हॉटेल वर पोचणे एक दिव्य असे. आपण ज्या हॉटेलला घेऊन जा म्हणुन सांगितले त्या ऐवजी त्यांना कमिशन मिळेल त्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास ड्रायव्हर लोक कुठल्याही थराला जात. आपण सांगू ते हॉटेल बंद पडलेय, अरे कालच त्या हॉटेलला आग लागली, तिथे तर काल पोलिसांची रेड पडली धंदा चालतो तिथे, त्या हॉटेलचे आता नाव बदललंय अमुक हॉटेल झालंय वगैरे नित्याचे. या सगळ्याला आपण पुरून उरलो की दुसऱ्याच हॉटेल समोर थांबवून साहेब हे हॉटेल पाहून तर घ्या, नाही पटलं तर नका राहु एकदा बघुन तर घ्या. आमच्या कंपनीचा काँट्रॅक्ट असतो डायरेक्ट पेमेंट होते हॉटेलचे आम्ही पैसे दिले तर परत मिळत नाही वगैरे थापा मी आधी मारायचो, तर ते म्हणणार ज्याने काँट्रॅक्ट ठरवला तो कमिशन खात असेल, तुम्ही नवा काँट्रॅक्ट ठरवा चांगली हॉटेल्स दाखवतो तुम्हाला पण कमिशन मिळेल. नुसती कटकट. (यापेक्षा अहमदाबाद, बरोडा वाले बरे. बुकिंग असेल तर एवढे भाडे, नसेल तर दहा रुपयात घेऊन जातो म्हणायचे.)

सगळेच एवढ्या चिकाटीने मागे लागत नसत, पण थोडीफार तरी नाटकं करत, काही तर भयंकर करत.
मी पण हळूहळू निर्ढावलो आणि आग लागली म्हटलं तर हो बरोबर त्याच्याच चौकशीला आलोय फायर सेफ्टी डिपार्टमेंट कडून, रेड पडली म्हटले बरोबर, त्याचीच स्टोरी कव्हर करायला आलोय आमच्या पेपरसाठी अशी उत्तरं देऊ लागलो.

एकदा दिल्ली वरून चंडीगडला बसने पहाटे पोचलो.
जवळ पास सायकल रिक्षाच होत्या आणि हॉटेलही फार लांब नव्हते. नाही ! त्याच हॉटेल मध्ये न्यायचं आणि मध्ये दुसऱ्या हॉटेल बद्दल बोलायचंही नाही अशी तंबी देऊन रिक्षा ठरवली.
तर रिक्षा वाल्याने त्याच हॉटेलच्या कागाळ्या सुरू केल्या, लोकांचे सामान चोरीला जाते अन काय काय. मध्ये दुसरा रिक्षावाला क्रॉस झाला तर ओरडून त्याला म्हणाला "साब को अमकेही हॉटेल मे जाना है, बताओ" तो: " वहा कलही लडकी पकडी।" हा "देखो साब, मै ने बताया ना!"
मी "लडकी पकडी तो उधरही ले चलो."
आणि त्याने धाडकन रिक्षा कडेला घेऊन थांबवली आणि "मैने नही ले जाणा आप को, मुझे नही फसना है कोई लफडे मे।" असे म्हणुन सरळ एका टपरी कडे निघून गेला. पैसेही मागीतले नाहीत काही. मी बॅग घेऊन पुढच्या चौकात जाऊन दुसरा रिक्षा केला.
हॉटेलवाल्याला झाला प्रकार सांगितला तर म्हणाला आम्ही धुतला असता त्याला हे कळल्यावर म्हणुन त्याला चेहरा दाखवायचा नव्हता आम्हाला. आधी पण असे प्रकार झालेत.

२००० नंतर मग वेगळी हॉटेल्स, त्यांचाच पिक अप असे सुरू झाले आणि हे ऍडव्हेंचर्स दुर्मीळ झाले.

मेधावी, हे किस्से लिहिण्यासाठी हा धागा नाही. कृपया पुण्याचे विनोदी किस्से नवा धागा काढून लिही.

Pages