पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, भारी अनुभव गाठीला जोड्ले आहेस रे. तुझी त्यांना दिलेली उत्तरं इतर कोणाला उपयोगी ठरतील अशी आहेत.

पुण्याच्या बशीत डाव्या बाजूला बायका बसतात हो. तिकडे बघायचे म्हणजे...

काय हो हे? उजवी म्हणजे चांगली बाजू हो.
--------
खासगी वाहन मात्र केले की फसवाफसवी ठरलेलीच असते. कारण अमुक तासांत किती मिळाले यातच त्यांचा जीव गुंतलेला असतो. ओटोचा रेट कमी करून घ्यायचा असेल तर रांगेपासून थोडे दूरच एखाद्याला विचारावे लागते.

<< आम्ही धुतला असता त्याला हे कळल्यावर म्हणुन त्याला चेहरा दाखवायचा नव्हता... >>

जवळच्या बस/रेल्वे स्थानकावरून तुम्हाला फुकट अथवा ठराविक किमतीत जाण्यायेण्याची सोय पुरवू, अशी ॲडऑन सेवा द्यायची हॉटेल्सना चांगली संधी आहे.

खुप वर्ष पुण्या शी संबंध नाही.
पण काही प्रश्न आहेत.

गाव वरून मुंबई ला येताना कधी कधी उगाचच मी स्वारगेट लं जातो.
निर्णय हा महागात पडतो
कात्रज ते स्वारगेट अनेक lane आहेत पण नक्की त्याचा हेतू विचार करून पण कळला नाही.
दोन चाकी,चार चाकी,सहा चाकी कोणत्या ही lane मध्ये असतात.
हा एक प्रश्न .
आणि दुसरा बस चे बस स्टॉप जे आहेत ते खूप उंचावर आहेत.
म्हणजे बस चा ( कॉमन) दरवाजा ची उंची त्या बस स्टॉप शी मॅच होत च नाही.
ट्रेन सारखे रस्ता आणि प्लॅटफॉर्म ह्या मध्ये खूप उंची आहे.
नक्की ते बस मध्ये चढतात कसे

हैदराबादला सालारजंग म्युझियमबाहेरून आम्हाला दीडदोन किमीवरच्या एका ठिकाणी जेवायला जायचं होतं. त्यासाठी रिक्षा बघत होतो. पण एकतर कमी अंतर म्हणून रिक्षावाले तयार होत नव्हते आणि जे तयार होत होते त्यांची 'अट' अशी होती की ते वाटेत (त्यांच्या ओळखीच्या) मोत्यांच्या दुकानात आम्हाला घेऊन जाणार!
शेवटी भर दुपारच्या उन्हात आम्ही चालत गेलो.

रिक्षा टॅक्सी वाल्यांचे हे वर्तन देशभर एकसारखेच आहे.
फक्त थोडे कमी जास्त चांगले वाईट.
इतकाच फरक आहे.

परिवहन विभाग काय झोपलेला असतो का? .

नाही जागाच असतो. पाचशे रुपये प्रतिचौकी प्रतिमहिना दिले की तुम्ही भंगारातली बिन नंबरची रिक्षा कितीही प्रवासी भरुन चालविली तरी कोणी हरकत घेत नाही पण जिथे रक्कम दिलेली नाही त्या चौकीच्या हद्दीत सगळे नियम व कायदे पाळून रिक्षा चालविली तरी बरोबर पकडतात इतके दक्ष आहेत पुणे पोलिस.

ट्रेन सारखे रस्ता आणि प्लॅटफॉर्म ह्या मध्ये खूप उंची आहे.
नक्की ते बस मध्ये चढतात कसे
>>>>बी आर टी बसेस चा स्टॉप असतो तसा.

हैदराबाद सेम अनुभव.. मी चौमोहल्ला पॅलेस बघून पुढे अजून कुठेतरी जाणार होते.. रिक्षा ठरवली.. तो एवढा मागे पडला होता .. शेवटी मी कंटाळून त्याला सांगितल. चल दुकानात मी खरेदी करते अन बिल तू भर मग मुकाट बसला.

ओळखीचे मोत्या>> Lol
गेलोच नाही त्यामुळे मोत्या भेटले नाहीत!

आपल्या चेहऱ्यावरच लिहिलेले असते की हे नवखे पर्यटक आहेत. हैदराबादकडे आम्ही बसनेच फिरतो. https://www.onefivenine.com/india/BusRouteStage/
या साइटवर बऱ्याच शहरांचे बस रूटस दिले आहेत. कोटी'हून गोवळकोंड्याचा जायचे होते. अकरा किमी. बस बदलली एका ठिकाणी. थेट गेटवरच उतरलो. पण रिक्षावाल्याने काहींच्या काही भाडे सांगितले होते.

मलाही हैदराबाद मध्ये जाम फसवलं आहे
रिक्षा तर कैच्याकै महाग असतात तिथं
मी एक बिल्डिंग शोधत होतो, रिक्षावाल्याला विचारला तर म्हणे लेके जाता, बैठो
म्हणलं किती घेणार? तर म्हणे 50रु
आणि म्हणे इतना फिक्स है, बाद में खिटखीट नई करना

म्हणलं ठिके आता काय, तेव्हा गुगल मॅप्स वगैरे नव्हते,मोबाईल पण अगदी मागासलेले असत

बसलो, आणि एक चौक ओलांडून मला म्हणे ये सामने बिल्डिंग
माझं असलं डोकं सरकला म्हणलं हेच तू बोलला असता तर मी चालत आलो असतो ना
मी अजिबात 50 रु देणार नाही
तर आरडाओरडा करायला लागला, शिव्या द्यायला लागला
बाकीचे दोन तीन रिक्षावाले आले
हिंदीत भांडणात आपण बाजू बरोबर असूनही वाद घालू शकत नाही हे कळलं
कानाला खडा म्हणून निमूटपणे त्याला पैसे दिले

नंतर कधीही रिक्षा करताना किती अंतर आहे, कितिकिमी वगैरे आधीच विचारायचो
सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅफिक पोलीस ला विचारायचे,इथून या ठिकाणी जायचे आहे, रिक्षाचे किती होतात
तो बरोबर अंदाज द्यायचा मग त्याप्रमाणेच रिक्षा ठरवायची
नैतर तुमचा खिसा हलका झालाच

हैदराबाद चे रिक्षावाले कचाकचा भांडतात

काही येतात, काही नाही. फक्त चार स्टेशन्स आणि तीन बस स्टेशन्स वर पोलिसांच्या देखरेखीत मीटर अथवा प्रीपेडने त्यांना यावे लागते. इतर ठिकाणी ट्राफिक पोलीस असून त्याचे कुणी ऐकत नाहीत आणि ते ही मिटरनेच घेऊन जा सांगायच्या भानगडीत पडत नाहीत.
ओला उबर ऑटो बुक केला की बुकिंग घेऊन फोन करून पेमेंट ऑनलाइन की कॅश विचारून कॅश नसल्यास कॅन्सल करणारे आहेत काही.

मुंबईला दादर गड्ड्याला उतरले की तिथे फसवणारे टॅक्सीवाले जास्त असतात. दादर गड्डा ते पार्ले एवियन हॉटेल मीटरने नेहमी पेक्षा दुपटीच्या वर झाले एकदा. दोनशेच्या आतच होत तेव्हा, तेही दादर पूर्व वरून. एवढेच होतात नेहमी येतो सांगत होता. त्याला म्हटले पुढे पोलीस स्टेशनला घे त्यांनी मिटरने एवढे होतात बरोबर सांगितले तर अजून वरून मी १००₹ जास्तीचे देईन किंवा आता दोनशे घे सांगितले. चारशे द्या, तीनशे करत शेवटी अडीचशे घेऊन निघुन गेला.

दादर गड्डा म्हणजे वेस्टर्न रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडीने येऊन दादरला उतरल्यास दादर पश्चिमे कडे न जाता पूर्व बाजूने बाहेर पडणे. सेंट्रल आणि वेस्टर्नच्या मध्ये .

रिक्षा टॅक्सी वाल्यांच्या तावडीतून सुटका झाली की हॉटेल वाले,laudge वाले लुटण्यासाठी तयार असतात.

पूर्ण दुनिया फिरलेल्या एका अरब नागरिक शी गप्पा मारत असताना त्यांनी एक मत व्यक्त केले होते.
भारतात सर्वात महाग सेवा आहे राहण्याची.
भारता पेक्षा बऱ्याच देशात पर्यटन करणे त्रास दायक वाटत नाही .भारतात त्रासदायक आहे.
फसवणूक करण्याची इथे स्पर्धा चालू असते.

सरसकटीकरण चूक आहे
मेबी परदेशी व्यक्तीला लुटत असतील
पण मला नॉर्थ ईस्ट मध्ये अतिशय चांगले अनुभव आले
लोकं अगदी अतिथ्य करणारे, मदतीला कायम तत्पर असे भेटले
तिथेही सगळीकडे सार्वजनिक वाहनाने एकट्याने हिंडलो
कधीच काही फसवणूक नाही

दुसरा बस चे बस स्टॉप जे आहेत ते खूप उंचावर आहेत.
म्हणजे बस चा ( कॉमन) दरवाजा ची उंची त्या बस स्टॉप शी मॅच होत च नाही.
ट्रेन सारखे रस्ता आणि प्लॅटफॉर्म ह्या मध्ये खूप उंची आहे.
नक्की ते बस मध्ये चढतात कसे
Submitted by Hemant 33 on 22 October, 2022 - 22:17

BRTS (Bus Rapid Transit System) आहे ती, ज्यात रस्त्यावर केवळ बससाठी स्वतंत्र मार्गिका असते. त्यात इतर वाहनांना प्रवेश निषिद्ध असतो. त्यामुळे बसेस वेगाने, विना अडथळा जाऊ शकतात. त्यासाठी रेल्वे प्रमाणे बस stop वर platform बनवतात (कदाचित पायऱ्या चढण्या-उतरण्याचा वेळ वाचावा, हा उद्देश असेल). हे platform आणि त्यासाठीचे मोठे दरवाजे मात्र बसच्या उजव्या बाजूस असतात.
पुण्यात हे मॉडेल तितकेसे यशस्वी झाले नाही असे म्हणतात, पण अहमदाबादमध्ये खूप यशस्वी झाले आहे.
https://www.youtube.com/watch?v=Ak2zrWKZJrE
https://www.youtube.com/watch?v=9QzHDVSByck

कल्पना चांगली आहे.फक्त योग्य नियोजन केले तर स्वतःची गाडी घेवून बाहेर जाण्याची गरज कमी होईल .लोक बस नीच प्रवास करतील.

4 वर्षांपूर्वी दिवाळीत हैद्राबादला गेलो होतो. 2-3 वेळेस 2 किमी अंतरासाठी 100 रूपये मोजून नंतर ओला ऑटो वापरू लागलो. 100 च्या जागी 25-26 बील यायचे. उरलेली ट्रीप छान पार पडली.

मुंबई मध्ये एअरपोर्ट,रेल्वे terminal येथे टॅक्सी आणि रिक्षा वाल्यांची gang तयार झाली आहे.
ते प्रवासी लोकाकडून जास्त पैसे घेवून लुटतात.
ह्या मध्ये हे सर्व उत्तर भारतीय आहेत.
धडक कारवाई पोलिस करत नाहीत.
म्हणजे फौजदारी गुन्हे दाखल करत नाहीत त्या मुळे ह्यांचे फावते.
एअरपोर्ट वरून prepaid taxi त्या मुळेच चालू झाल्या.
एअरपोर्ट मधून बस ची पण सुविधा दिली जात होती.

टॅक्सी ,रिक्षा wlyanchi मुजोरी आता कमी झाली आहे.
Uber ,ola आल्या,युनियन आता कमजोर झाल्या.
कारण लोकांना खूप पर्याय निर्माण झाले.
बस,ओला,उबर,लोकल ट्रेन तर आहेच,मेट्रो,
हे पर्याय आहेत
त्या मुळे पाहिले संप करून जसे vedhis धरायचे तसे आता करू शकत नाहीत.
संप केला तरी कोणी लक्ष देत नाही.
उलट ह्यांचा संप असला की रस्ते मोकळे असतात.
प्रवास चांगला होतो.

काही वर्षा पूर्वी सण असेल त्याच दिवशी टॅक्सी,रिक्षा आणि बस वाले संप करायचे.
सरकार लं झुकावच लागायचे

दिल्ली एअरपोर्टवर पिक अप करिता ओला / उबेर बोलविता येत नाही. तिथलीच स्टँडवरची टॅक्सी मागवावी लागता असा माझ्यासारखाच अनुभव अजून कोणाला आला आहे काय?

खूप वर्षांपूर्वी नवी दिल्लीत सुरुवातीला फसवून चांगलंच घेतलं पण नंतर साधारण नवी दिल्ली स्टेशन ते आम्ही उतरलो होतो त्या रंजीत हॉटेलपर्यन्त किती रिक्षेचा दर साधारण द्यायला हवा सांगणारी चांगली लोकं पण भेटली त्यामुळे अंदाज आला. दिल्लीत मिश्र अनुभव आले. नवी दिल्लीत आपल्याला जणू नवीन बघितल्यावर पकडतात, त्यात आमचं लेकरू लहान होतं मग काय सॉफ्ट टार्गेट. नंतर मात्र फार वाईट अनुभव आले नाहीत कारण थोडे अलर्ट होतो आणि साधारण इथून इथे रिक्षा किती घेते वगैरे हॉटेलवर विचारून घेतलं.

एका प्रायव्हेट बसने दिल्ली दर्शन करत होतो, तो माणूस सांगत होता, प्रदूषण वगैरे बस जास्त करत असली तरी पैसे फेकले की काही अडत नाही आमचं. लाल किल्ल्यात मीना बाजारात काही छोट्या वस्तु अतिशय स्वस्त मिळाल्या त्या मी गिफ्ट म्हणून घेतल्या.

नंतर महाराष्ट्र मंडळ आहे तिथे गेलो. दिल्ली आग्रा मथुरा बस बुक केली, आग्रा इथे अमुक दुकानातून हे घ्या ते घ्या, असं गाईड सांगत होता, मी छोट्या वस्तु सिलेक्ट केल्या, फार काही घेतलं नाही. एकीकडे पेठा घेतला मात्र कारण बस नंतर थांबणार नव्हती. येताना पिंपरी चिंचवड च्या डॉक्टर कपलला (दोन मुलांसह होते ते), त्यांनी रात्री दिल्लीत मध्येच कुठे सोडलं, उतरल्यावर ते इथून कसं जायचं विचार करत होते, ते बघून मी फार घाबरले पण आम्हाला सुखरूप हॉटेलसमोर सोडलं.

चांदणी चौकात शाली छान स्वस्त मिळाल्या, त्या जवळच्या नातेवाईकांना गिफ्ट द्यायलाही घेतल्या. तिथे सर्व साड्या किंवा कपडे घेण्यासाठी आतमध्ये ओढायलाच बघतात, अशा ठिकाणी न जाता पराठे खाऊन आतल्या बाजूच्या गल्लीत खरेदी केली. तिथून येताना सायकलरिक्षेने आलो, स्वस्त होती, आम्ही थोडे वर पैसे दिले त्याला. काही रिक्षावाले (स्कूटर म्हणतात तिथे), मुलाला आत ओढायलाच बघायचे बसा बसा करत मग वाटेल तो रेट सांगायचे, त्यामुळे खूप सावध झालो आम्ही.

स्पेशल चाईल्डला घेऊन फिरताना काही फायदा घ्यायला बघत होते त्याचबरोबर काहींची मदतही झाली, म्हणून मी मिश्र अनुभव आले लिहिलं वरती.

माझा ताजा अनुभव एक्स्प्रेसवे टोल चा! आमचा fasttag स्टिकर एक्सपायर झाला होता. मुंबई वरून येताना पहिल्या टोलला आम्ही पैसे विचारले. त्याने Rs 203 सांगितले. आम्ही पावती घेवून निघालो. दुसऱ्या टोलला त्याने परत Rs 203 मागितले. कारण पहिली पावती फक्त लोणावळा पर्यंतच दिली होती. पहिल्या टोलला तो विचारातच नाही की पुण्याची पावती हवी का. त्यामुळे दुप्पट भुर्दंड बसला. सर्वांनी ह्या अनुभवा वरून सतर्क रहावे.

फास्ट टॅग स्टिकर एक्ष्पायर होतो हे माहित नव्ह्ते.

२०३ एवढा कमी टोल बघुन कळले नाही? २७० च्या आसपास आहे मुम्बै पुणे.

पर्यटक लोकांचा संबंध कोणाशी येतो.

रिक्षा ,टॅक्सी वाले,बस वाले,जिथे राहणार ते हॉटेल वाले फसवणूक करतात.

बाकी भारतात च आणि ते भारतील शहरात च पर्यटन करायचे असेल तर काही अडचण नाही
सर्व भारतीय दिसायला सावळे,माध्यम बांध्याचेच असतात.
सहज ओळखता येत नाहीत.
इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असावे आणि त्याच लायकीचा माणूस असेल तर च संवाद साधावा.
हॉटेल बुकिंग,टॅक्सी बुकिंग ऑनलाईन च करावे.
सावध आणि हुशारी दाखवली तर कोणी फसवणूक करू शकत नाही.

Pages