लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

थोडे दिवस फक्त मदर्स मिल्क द्या... परत शी व्यवस्थित सुरू झाली की फायबर वाढवा... गाजर, व्हेजिटेबल्स...
कोणतेही फूड सलग तीन दिवस द्या.. नंतरच नवीन फूड introduce करा...

माझी लेक 3 वर्षांची आहे, 1-2 दिवसांपासून ती पोट दुखायची तक्रार करत आहे, स्पेशली जेवल्यावर लगेच.. थोडा वेळ गेला की तिला शी होते, पण थोडी हिरव्या रंगाची. पोट साफ झालं की दुखण्याची तक्रार कमी होते, पण थोडं काही खाल्लं की लगेच थोडंस दुखायला लागत परत पोट.
मागच्या वेळेस पोट दुखलं होतं, ( डॉक्टरनी तेव्हा हवाबदल हे कारण सांगितलं, नुकतेच आम्ही दुसऱ्या शहरातून इथे दिल्लीत शिफ्ट झालो होतो)
तेव्हा सांगितलेलं औषध देऊन पाहिलं, ओवाही दिला, आता पोटदुखी कमी आहे पण शीचा रंग अजूनही तसाच (हिरवट) आहे.
आज संध्याकाळी परत डॉ. कडे नेणार आहे (precaution म्हणून), पण शीचा रंग असा का येत असेल कोणी सांगू शकेल का ?
तिचे सगळे दात, दाढ वगैरे आलेले नाहीत अजून, त्याच्याशी काही संबध असू शकेल का ?

डॅाक्टर योग्य उपचार करतीलच. पण तिचा आहार कसा आहे? जेवणात काही मोठा बदल झाला आहे का? पाणी भरपूर पिते का? खाण्याच्या वेळा पाळल्या जातात का? नियमीत पोट साफ होते का? ते तपासून पहा.
माझ्या मोठ्या मुलाला तो लहान असताना पोट साफ न होण्याचा त्रास झाला होता तेव्हा आम्हाला कळले कि pediasure मुळे तसे झाले. अर्थात सगळ्यांनाच तसे होत नाही त्यामुळे सगळा आहार लिहून, काही गोष्टी बंद करून शोधावे लागले.
बरेच वेळा मुले फक्त आवडीचेच खातात. बाकीचे काहीच खात नाहीत म्हणून उपाशी कशाला ठेवा म्हणूनही त्यांचे हट्ट पुरविले जातात. काही ठिकाणी मी मुलांना बिस्किटाचा पुडा, फक्त जॅम-चपाती, सॅास-चपाती, मॅगी असे जेवताना पाहिले आहे.
माझा लहान मुलगा ३ वर्षाचा आहे. मी तर म्हणेन खाण्याची आवड त्याला पोटात असल्यापासूनच आहे Happy त्यालाही बिस्किट, चॅाकलेट खूप आवडतात. मी त्याला देते पण अगदी २ बिस्किट तेही त्याचे सकाळचे खाणे झाल्यावर म्हणजे तो जास्त मागत नाही आणि आपण दिलेच नाही असे होत नाही. पण जेव्हा मधल्या वेळेत काही खायचे असेल तर एखादे फळ, २-४ भिजवलेले बदाम, मुठभर शेंगदाणे, ३-४ खजूर, मनूका, dry cranberries, गाजर, काकडी, टोमॅटो, उकडलेले रताळे-बटाट-बीट दिले तर आवडीने खातो.

@sonalis, धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी.
हो, ती सगळं व्यवस्थित खाते, म्हणजे पोळी भाजी भात आणि फळही... खाण्यात बदल असा विशेष नाही. पोटही नीट साफ होते, सकाळी आम्ही दोघीही भिजवलेल्या मनुकाही खातो, सो तो problem येत नाही.
पाणी कमी पीत होती पण आता कधी थोडं कोकम सरबत किंवा लिंबू मीठ साखर घालून देते, सो पाण्याचा intake वाढला आहे थोडाफार.
बाहेरचं असं विशेष नाही, पण महिन्यातून एकदा कधीतरी चिप्स खाल्ले जातात, ते पण समोर दिसले किंवा कोणी खात असेल तर मागते पण , तसे जंक फूड चे प्रमाण कमी आहे.

मुलांच्या शीचा रंग सतत बदलत असतो. मग पोटात का दुखते तेच तपासावे लागेल. फूड डायरी लिहा म्हणजे शोधायला मदत होईल.

मीनाक्षी , हिरव्या रंगाची शी म्ह णजे अपचन. तिला शी नॉर्मल होईपर्यंत मुगाची खिचडी , जिरे / धणे भिजवून उकळलेले पाणी असे द्या. हलका आहार दोन तीन दिवस देऊन बघा . दूध अव्हॉइड करून बघा .

धन्यवाद सामी
हो , तिला हलकाच आहार देत आहे, पोटदुखी कमी झाली आहे आता आणि शी चा रंगही नॉर्मल होतोय.
प्रतिसादासाठी सर्वांचे धन्यवाद

Pages