लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

माझा मुलगा ५ महिन्याचा आहे.त्याला gas problem आहे आनि तो ४ दिवसानि शी करतो.मी त्याला solid food अजुन देत नाहि,breastfeeding करतो आहे.तरिहि त्याला हा प्रोब्लेम आहे.मला कहितरि उपाय सागा.मि त्याला हिमालयाचे "बोनिसान' औषध देते तरिहि तो रदत असतो

मनिशा, बाळाचे ४ दिवसानी शी करणे नॉर्मल आहे(पण शी खूप घट्ट नसायला हवी). औषध डॉक्टरच्या सल्ल्याने दे. पण दूध पाजल्यावर त्याची ढेकर काढत जा. पोटाला मसाज केल्यानेही गॅस बाहेर पडायला मदत होते...
http://www.ehow.com/video_12124662_baby-pass-gas.html

http://www.youtube.com/watch?v=7akZb16ZGsU

मि दूध पाजल्यावर त्याची ढेकर काढत असते आनि पोटाला मसाज पन करते त्याला औषध पन डॉक्टरच्या सल्ल्याने देते.पन शि करयाचि असेल तेवा रदत असतो.त्याचि शि तशि घट्ट नसते

मनिशा_२८, ही लिंक बघा : http://www.youtube.com/watch?v=vFmyjvYTtlc
जर बाळ सतत रडत नसेल तर ४ दिवसांनी शी करणे, काही त्रासाचे नाही. फक्त त्याची मलावरोधाची प्रवृत्ती बळावू नये, यासाठी वरील विडिओमधील सगळे उपाय करून बघा.

माझ्या २ वर्षाच्या लेकीच्या तोंडातुन सारखा वास [दुर्गंधी] येते उपाय सांगा
मी तिचे दात
१ पेस्ट
२ मिठ
३ मिठ + लिंबु
यांनी घासुन देते [तिच्या हाताने घासायला दिले तर ब्रश जमिनीला , भिंती ला , दाराला लाव /घास ,फेकुन दे - अशी करते मग मिच घासुन देते]

दाताला येणारी दुर्गंधी घासण्याने'च' जाते असे नाही. मुळात दुर्गंधी येत असेल तर ती तिने खाल्लेल्या अन्नातून तयार होऊन येते. तिच्या तोंडात अडकणारे पदार्थ ब्रश करूनच काढावे लागतील, पण त्याशिवाय तिच्या आहारात काय टाकले किंवा काढले की, दुर्गंधी अनुक्रमे येते किंवा जाते, याचे निरीक्षण करा. कधी कधी अपचन हेच कारण असते दाताच्या दुर्गंधीचे. दिवसा आणि रात्री झोपण्याआधी(हे सर्वांत महत्वाचे) दात घासलेच पाहिजेत. तेव्हा तिला 'रात्रीच्या झोपेच्याआधी दात घासणे' ही सवय जितक्या लवकर लावाल, तितके चांगले.
अर्थात वरील सर्व सल्ले मोठ्यांनाही लागू होतातच. तेव्हा तुम्ही ते पाळा, तुम्हाला बघून तीही शिकेल.

माझ्या मुलाच्या दाताला केळं खाल्ल्यावर वास यायचा. त्याला केळी भयंकर आवडतात. पण आता मी केळं दिल्यानंतर अजून वेगळ्या चवीचं त्याला काहीतरी देते, ज्यामुळे तो वास निघून जातो.

तिच्या हाताने घासायला दिले तर ब्रश जमिनीला , भिंती ला , दाराला लाव /घास ,फेकुन दे - अशी करते मग मिच घासुन देते>>>>> ती लहान आहे, तेव्हा ती असं करणारच. तिने फेकाफेकी केल्यावर दर वेळी नेटाने 'असं करू नकोस' असं सांगत रहा. शिवाय, तुम्ही कशा प्रकारे दात घासता, याचं प्रात्यक्षिक द्या. किंवा दोघींनी मिळून दात एकाच पद्धतीने दात घासण्याचा खेळ खेळा. हळू हळू तिलाही मज्जा वाटेल या एकत्र असण्याची.

तिच्या हाताने घासायला दिले तर ब्रश जमिनीला , भिंती ला , दाराला लाव /घास ,फेकुन दे - अशी करते मग मिच घासुन देते >> वर धाराने सांगितलेले बरोबर आहेच. लेकीचा डेंन्टिस्ट सांगत होता की मुलांना व्यवस्थित स्वच्छ दात घासायला यायला त्यांच वय ७-८ व्हाव लागत.(आपण जरी ४-५ वैगरे पासुन आपापल घास म्हणल तरी दाढा आणि दोन्ही कडेने म्हणजे गालाच्या आतल्या बाजूने त्यांना तेवढे व्यवस्थित घासता येत नाही)
आत्ता पासुन शिकवत रहा तिला जमेल हळूहळू. पण तिने घासले तरी तु तिचे दात घासून देत जा.

बरं, आता मला एक सांगा. (सर्व प्रश्न लहान मुलांच्या दूधाच्या दाता/दाढेबाबतीतले आहेत.)
१) लहान मुलांचे दूधाचे दात कितव्या वर्षीपासून पडायला/ हलायला सुरुवात होते? (माझ्या लहानपणचे मला काही आठवत नाहीये.)
२) अश्या वेळी दात पडलाय त्या जागेतून रक्त येते तेव्हा घरच्या घरी लगेच काय उपाय करावेत? मला स्वतःला रक्त बघून कसेतरी व्हायला लागते. (फोबिया) त्यामुळे रक्त लगेच थांबेल असे उपाय काय?
३) दाढा आपोआप पडतात की डेंटिस्ट कडे जाऊन काढून घ्याव्या लागतात? माझ्या लहानपणी माझ्या दाढा डेंटिस्ट कडे जाऊन काढून घेतल्याच्याच आठवणी आहेत. Sad ते झाले की आईस्क्रीम वा पेप्सी कोला द्यायची आई. तेव्हा वाटे की दाढा आपोआप का पडत नाहीत? सर्व मुलांचे असेच होते का?

१) लहान मुलांचे दूधाचे दात कितव्या वर्षीपासून पडायला/ हलायला सुरुवात होते?>>६ व्या वर्षापासून.(आपल्या १ ली ते ४थीच्या दरम्यान)
२) अश्या वेळी दात पडलाय त्या जागेतून रक्त येते तेव्हा घरच्या घरी लगेच काय उपाय करावेत?>>>कापूस दाताखाली ठेवायचा आणि त्याजागी थोडा दाब द्यायचा(१५-२० मि.). जास्त वेळ रक्त वाहत नाही. थोड्यावेळाने ते बंद होते/व्हायला हवे.
३) दाढा आपोआप पडतात की डेंटिस्ट कडे जाऊन काढून घ्याव्या लागतात?>>>आपोआप पडतात. पण किडल्या असतील तर काढाव्या लगतील.

प्रिती तू दात घासताना तिची जीभही घासतेस का? जीभ साफ नसणं हा दुर्गंधीचा राजमार्ग आहे. भारतात लहान मुलांचे फिंगर ब्रश मिळतात का? गूगल केल्यास इमेज बघता येईल. हे फ्लेक्सीबल असतात अगदी सॉफ्ट ब्रिसल्स असतात आणी आपल्या बोटावर घालून त्याने लहान मुलांचे दात घासता येतात. ह्याच ब्रशचा उपयोग जीभ साफ करायला करता येतो. उपलब्ध नसल्यास जो ब्रश दात घासायला वापरताय त्याचाच अगदी हलक्या हाताने जीभ साफ करण्यासाठी उपयोग करायचा. स्वतःचे स्वतः दात घासायला शिकवताना जीभही घासायला शिकवावी.
ईथे ३ वर्षे पूर्ण झाल्यावर पहिली डेंटल व्हिजीट असते. ह्यावेळी डेंटिस्ट देखील हसत खेळत दात जीभ घासायचं टेक्निक शिकवतात. मुलांना हे सर्व लगेच तिसर्‍या वर्षी जमावं ही अपेक्षा नसते पण हेल्दी हॅबिट्स एन्करेज केल्या जातात कळत नकळत.
सध्या जीभ घासण्या पासून सुरवात करून बघ. दुर्गंधी नक्कीच अटोक्यात येईल.

३) दाढा आपोआप पडतात की डेंटिस्ट कडे जाऊन काढून घ्याव्या लागतात?>>>आपोआप पडतात. पण किडल्या असतील तर काढाव्या लगतील.
<<
sonalisl
थोडी भर घालतो.
लहान मुलांच्या दुधाच्या दाढा असतात, त्या मोठ्या माणसांच्या उपदाढा बनतात. म्हणजे तिथे येणारे दात हे उपदाढा म्हणवतात.
यांच्या पाठी मागे ३-३-३-३ (खाली वर उजवी डावी) दाढा येतात. पहिल्या दोन दाढा अन शेवटली १-१-१-१ (खाली वर उजवी डावी) अक्कल-दाढ जी १६व्या वर्षाच्या आसपास येते अन बर्‍याचदा 'इंपॅक्टेड थर्ड मोलर' बनते. जबडा मोठा असलेल्या लोकांना हा त्रास होत नाही (अक्कल इझीली येते) पण इतरांची शेवटची दाढ ऑपरेशन करून उपटून टाकावी लागते.

अ‍ॅडल्टला (पक्के दात-भाकरीचे. दुधाचे नाही) ३२ दात असतात. ८-८-८-८ असे. २ पटाशीचे, १ सुळा, २ उपदाढा, २ दाढा, १ अक्कल दाढ. असे प्रत्येकी ८, खाली वर उजवी डावी बाजू, सगळे मिळून ३२. लहान मुलांना १२ (दाढा- साधी+अक्कल) कमी असतात. फक्त २०.

काहिंदा डेंटिस्टही उपदाढ दुधाची की भाकरीची या गोंधळात पडलेले असू शकतात. अन घोळ होऊ शकतो. (माझ्या बाबतीत झाला होता > पण ते लै जुना इतिहास आहे, त्या काळी फोटू लै म्हाग होता. म्हणून पडणारी दाढ समजले ती पक्की उपदाढ होती. तेंव्हाच सांगितलं असतं डेंटिस्ट जोशीकाकांना पण मी तेव्हा डाक्टर नव्हतो म्हणून विसरलो. Wink ) फोटू काढला (क्ष किरण) तर समजायला सोपे असते.

माझ्या लहानपणी माझ्या दाढा डेंटिस्ट कडे जाऊन काढून घेतल्याच्याच आठवणी आहेत. Sad ते झाले की आईस्क्रीम वा पेप्सी कोला द्यायची आई.
<<

टॉन्सिलचे ऑपरेशन झाल्यावरही थंड आईसक्रीम (व्हॅनिला. यात कडक कण नसतात) खाऊ घालतात. थंड वस्तूने रक्तवाहिन्या अकुंचन पावतात व रक्तस्त्राव होत नाही. वा कमी होतो. याच साठी दात काढल्यानंतर अर्धा दिवस तरी गरम जेवण/कडक वस्तू खाऊ देत नाहीत.

अग जीभ घासु दे ईल तर ना
अतिशय चावते ,
तो फिंगर ब्रश आणलेला ति ८ महिन्याची आसताना पण दुसर्यांदा घासताना इतक्या जोरात चावला की ब्रश तुट्ला आजुन नविन आणला नहिये
आणते आता

काल पाहाटे ३ दा उल्ट्या झाल्या तिच्या
पित्त बाहेर पडले
आज झोपताना परत उल्टी केली काय करु समजेना आता उद्या डो कडे घेउन जाते

माझ्या मुलिला जन्मानन्तर १५ दिवसाने खालचे दोन दात आले. आज ती दोन वर्षाची आहे. इतर दात, तीची इतर वाढ सर्व normal आहे .गुगल वरुन ते neonetal teeth असल्याचे समजले. पण त्या दातन्चे काय होइल? तेथे दुधाचे दात(milk teeth) कधी येतील? या बाबत काही माहीति वा असा कुणाला अनुभव अस्ल्यास सान्गावा.

देवकू, माझ्या मुलीला जन्मतः खालचे २ छोटेसे दात होते. इतर दुधाचे दात इतर मुलांप्रमाणेच आले व हे दात दुधाच्या दातांबरोबर पडले, दुसरे आले.

धन्स अनघा.. हायसे वाटले.
.माझ्या मुलीचे हे दात दुधाच्या दातांबरोबर पडले, नवीन आले तर वेगळ्याने ते दात dentist कडे जाउन काढायची गरज राहणार नाही.. कारण ते दात बगीतल्यावर अनेकानी ते काढावे लागतील असे सान्गीतले होते .. even Dr. ने पण..

भारतात लहान मुलांचे फिंगर ब्रश मिळतात का?>> हो मिळतात. मी सुनिधी सहा महिन्याची वगैरे असल्यापासून वापरतेय. आता दुसर्‍या वर्षापासून बेबी टूथब्रश मिळतात त्याच्याने तिचे दात घासते. जेव्हा सकाळी वेळ असतो तेव्हा तिच्या हातात ब्रश् देऊन शिकवते. नाहीतर मी घासून घेते. आमच्याकडे पाठीमागे अंगण असल्याने त्या अंगणात फिरत फिरत दात घासायला तिला फार आवडतं. (तेवढंच सूर्यप्रकाश पण मिळतो) नंतर चूळ भरणे नावाचा पाणी सांडणे कार्यक्रम पण असतो. Happy

सुनिधीला पहिला दात दीडवर्षाची असताना आला. अजून दाढा येतच आहेत!!!

लहान मुलाना (5 years) constipation problem साठी Fiber powder देता येते का? Benefiber/Miralax यासारखे काही जणानी suggest केले आहे.

मस्तानी, कॉन्स्टिपेशन साठी मी नेहमी प्रून्स किंवा प्रून ज्यूस दिला आहे माझ्या मुलाला. वर दिलेले प्रॉडक्ट्स तुम्हाला कुणी सुचवले ? मुलाच्या डॉक्टराशी बोलला का ? त्यांनी काय सांगितले ?

आहारातले फायबरचे आणि फ्लुइड्सचे प्रमाण वाढवणे हे आयडियल उपाय आहेत. पण सिव्हिअर कॉन्स्टिपेशन झाले असल्यास प्रूनसारखे घरगुती उपाय न करता डॉक्टरच्या सल्ल्याने इलाज करावा असं माझं मत.

माझा भाचा भारतात असतो. त्याला हा chronic problem आहे. मी त्याच्यासाठी अमेरिकेतुन काही पाठ्वावे असा विचार करत होते. Prunes पाठ्वून झाले आहेत पण खूप फायदा झाला नाही. हे वरचे उपाय मैत्रिणीनी सुचवलेले आहेत.

सिव्हिअर कॉन्स्टिपेशन झाल्यास ईथे घरीच एनिमा द्यायला सांगतात. Miralax चांगले आहे(डॉ.च्या सल्ल्यानुसार)

अन्न पचन नीट न झाल्याने पण तोंडाला वास येतो. अन्न चावुन चावुन खाणे म्हणजे लहान मुलांना खायला लावणे खुप गरजेचे असते. भात तर बहुतेक वेळा नुसताच गिळतात मुलं. बडिशेप खुप खरपुस भाजुन जेवणानंतर चावुन चावुन खायला दिली तरी तोंडाला वास येण्याचा प्रॉब्लेम कमी होतो.

माझी लेक अता 5 वर्ष १० महिन्यांची आहे. खूप ऍक्टिव आणि खेळकर आहे. तिला सद्या heat boils येत आहेत. त्यावर काहि घर्गुती उपाय आहेत का? मि तिला उष्ण पदार्थ देत नाहि. गुल्कंद देते.
मुळात heat boils येउ नयेत यासाठी काय करावे? प्लीज उपाय सुचवा.
तसेच उष्ण व थंड पदार्थ कोण्ते याची यादि मिळेल काय?
धन्यवाद.

हे सुरुवातीपासुन वाचायला सुरुवात केलीयी कारण..
इथल्या सिजनप्रमाणे सगळे धडाधड आजारी पडत आहेत त्यानुसार माझ्या ८ वर्षाच्या मुलीला बराच खोकला व कफ झाला आहे. डॉ.नी सांगितल्याप्रमाणे गेले ३-४ दिवस बेनेड्रील देत आहे पण म्हणावा तसा फरक पडला नाही. ताप नाही व बाकीपण खायची, थकव्याची तक्रार नाही. खोकताना छातीत दुखते म्हणाली. सतत खोकत नाहिये. आज पुन्हा डॉ.ना फोन केलाय पुढेचे विचारायला. पण काही घरगुती उपचार सांगितले गेलेत का ते पहायचे होते.

अश्विनीला विपु केली होती व लगेच उत्तर मिळाले ते पण लिहिते,

सध्या सगळीकडेच चालू आहे, सर्दी, खोकला, ताप इ.
कफ मोकळा होण्यासाठी जरा छाती, पाठ, पोट गरम कापडाने शेक. सितोपलादी चूर्ण, गुळवेल सत्व अश्या औषधांचा उपयोग होईल. पण ती नसतील तर लवंग, दालचिनी, खडीसाखर, हळद, सुंठ mix करून अगदी दिवसातून ३ ते ४ वेळा दे. मध असेल तर मधातून दे नाहीतर नुसते दिलेस आणि वर गरम पाणी पाजलेस तरी चालेल.
हळदीचे दुध किमान दोनदा दे. हळद दुधात उकळली गेली पाहिजे. चवीसाठी साखर आणि वेलची घाल.
कोरफडीचे पान तुला इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळेल. ते भाजून त्याच्या गरात मध घालून सकाळी आणि संध्याकाळी दे. खोकला लगेच थांबेल.
मला इतरही ईमेल्स येताहेत सिमीलर प्रश्नांसाठी तर प्लीज मायबोलीवर योग्य जागी हे पोस्ट करशील का म्हणजे सगळ्यांनाच उपयोग होईल. धन्यवाद.
हळदीचे दुध गरम, म्हणजे कोमटपेक्षा जरा जास्त गरम पिणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला पूर्ण बरा होईपर्यंत फक्त गरम पाणीच प्यायला दे. गार अजिबात नको.
पावडर केलीस तरी चालेल किंवा सहाण असेल तर उगाळून दे. त्याचा फायदा जास्त होईल पण थोडे कटकटीचे आहे. कारण ते सगळे नीट सुकवून ठेवावे लागेल प्रत्येकवेळी वापरल्यावर. सुंठ मात्र अगदी किंचीत घाल, उष्ण पडू शकते.

अश्विनी ला प्रमाण विचारले आहे ते मिळाले की लिहीतेच.

प्रमाण -
प्रमाण असे विशेष काही नाही. लवंग, दालचिनी, हळद, खडीसाखर, ज्येष्ठमध एकेक चमचा. सुंठ पाव चमचा. ह्या प्रमाणात एकत्र करून ठेवणे. देताना १ ते २ चिमूट व्याधीअवस्थेनुसार देणे.
आलं आणि तुळशीचा काढा करून त्यात मध घालून तो दिवसातून २ वेळा चमचाभर देणे.
चेहेर्‍यावर फोड येणे, तोंड येणे अश्या तक्रारी सुरू झाल्या तर समजावे काहीतरी उष्ण पडते आहे, मग आलं किंवा सुंठीचे प्रमाण कमी करणे.

कोरफेडीचा बरोबर वापर - कोरफडीचा गर आणि काळा बोळ हे वेगळे प्रकार आहेत. काळा बोळ हा गरावर प्रोसेस करून मिळतो. पण तूर्तास त्याची चिंता नको. कोरफडीचे पान आधी झाडापासून तोडावे. एका वेळी लागेल तेव्हढाचे तुकडा कात्रीने कापलास तरी चालेल. मग तो गॅसवर भाजावा (दोन्ही बाजूंनी). मग मधे चीर देऊन दोन्ही बाजू अलग कराव्यात आणि मग बटर नाईफने किंवा चमच्याने गर खरवडून काढावा. हवे तर नंतर तो गर मिक्सरमधून काढू शकतेस. मग त्यात मध मिसळून देता येइल. फक्त कपड्यांना त्याचे पिवळे डाग पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.

अश्विनी, धन्यवाद धन्यवाद.

जयु, मला ते थंड-गरम जास्त माहीत नाही. पण अनुवांशिकतेने मी नेहेमीच इतरांपेक्षा अंगाने 'उष्ण'/'गरम' असते... अगदी शेकहँड केल्यावर ताप आहे का, असं समोरचा विचारतोच. तोच त्रास माझ्या मुलाला आहे, असं सध्या वाटतंय. त्याच्यासाठी मी हे करते.
उष्णता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे - ज्या ज्या मार्गाने शक्य होईल त्या त्या मार्गाने द्या. शिवाय पोट साफ होईल आणि झोप गाढ लागेल हे बघा. या चांगल्या सवयी असल्याने तसाही दुष्परिणाम काहीच होत नसतो.

थंडी जास्त नसेल तर नाचणी सत्व, नाचणीची भाकरी वै. देऊन बघू शकता. गरम नको म्हणजे बाजरी, मिरची, मिरी, वांगे, बेसन, साबुदाणे वै. कमी/बंद करून बघा. कधी कधी दूध आणि तत्सम पदार्थ पचायला जड पडतात, ते कमी जास्त करून बघा. तिच्या जेवणाकडे आणि जेवलेले कसे मानवतेय, यानुसार अंदाज यायला हरकत नाही.

Pages