मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे मी कसं काय मिस केले. मी सुध्दा फॅन क्लबात. Happy

जागूताई, सरंग्याला काही ठिकाणी खापरी पापलेट सुध्दा म्हणतात.

रश्मी Lol

अरे वा त्याला वर खवलांची खापर अस काहीतरी असेल. ज्ञानात भर पडली.

पेण मध्ये अशी छोटी तळी आहेत. त्यात मासे सोडलेले असतात. कधीही पाहुणे गेले की काढून देतात लगेच तळ्यातून. अजुन मी काढताना पाहिले नाहीत.

सारेगम खुप खुप धन्यवाद. असे काही वाचले की सगळ्या श्रमांचे, इथे दिलेल्या वेळेचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

जागु पण हा फॅनक्लब चा बाफ काढुन नवशिक्यान्साठी बरे केलेस. सगळ्या पाकृ एकाच ठिकाणी पटकन सापडतील.

रश्मी २०११ ला काढलेला हा धागा. २०१६ उजाडले. उपवास घडला मधल्या काळात ह्या धाग्याला.

ही जागुतै, वर दिलेल्या कुठल्याही धाग्यात वा, छान, तोपासु वगैरे काहीही म्हणताना आढळत नाही. उम्म......!!!!!

का ???????
बाकीचे नाय का अपने मुह मिया मिठ्ठु बनुन फिरतात ईथे !!!!!!

(ते खी खी खी करायचा राहिलं म्हणुन पुन्हा संपादन करत आहे Wink )

आह्हा.. हा धागा तर केंव्हापास्न माझ्या आवडत्या दहात आहे.. 'जागु सप्ताह' ही रेग्युलरली साजरा केला जात असतो आमच्या कडे कधी कधी... Happy

कालपासून फक्त ह्या fan क्लबातल्या रेसिपीज वाचतेय. पण खरंच अतोनात दुखः हि होतंय कारण आमच्या बोरिवलीत ह्यातली बरीचशी मच्छी (मासे) मिळत नाहीत सध्या. सगळ्या शेल फिश माझ्या खास आवडीच्या आहेत पण गेले जवळ जवळ वर्षभर मी मनासारखी खेकडी खाल्ली नाही आहेत. जागू ताईना माझी अगदी कळकळीची विनंती आहे काही हि करा पण थोडी तरी दया दाखवा मज पामरावर आणि थोडेसे खेकडे पाठवा प्लीझच. Sad Sad Sad

पण नळ माखुल सारखीच आहे.>>> तरीही वेगळा धाग्यात केलेले फोटो टाक ना प्लीज,, हे स्व्कीड दिसते आहे.

पवनपरी, फ्राईड कॅलामारी - तळलेली माखली- हा प्रकार जबरदस्त चविष्ट असतो. अर्थात तळलेला कुठला पदार्थ वाईट लागतो म्हणा! Wink

तशी आणखी एक डेलिकसी म्हणजे कच्चे शिंपले - रॉ ऑयस्टर्स! ते प्रकरण कितपत झेपेल अशी आधी शंका होती. पण आता शिजवलेले ऑयस्टर्स ऑप्शन ला पडले आहेत.

भरपूर रेसिपीज आहेत की इथे. आता वाचते.

मी पण फॅन क्लबात. >> +१

रॉ ऑयस्टर्स! >>> खाल्ले आहेत बर्‍याचदा पण शिजवलेले जास्त आवडतात. ऑयस्टर्सला मराठीमध्ये कालव म्हणतात ना??

अरे असाही फॅन क्लब आहे होय.

मी पण बरं का या फॅन क्लबात. Happy

मला सर्व प्रकारचे मासे करायला नि खायलाही खूप खूप आवडतात.
म्हाकूळ तळलेले लयच भारी लागतात.

फेरफटका, कच्चे शिंपले खाऊन पोटाला त्रास होत नाही का?? मी कधीच खाल्ले नाहीयेत.

जागू, वागळीची (स्टींग रे - इथे रत्नागिरीत त्याला वागळीच म्हणतात. बाकी ठिकाणी वेगळी नावे आहेत पण माझ्या लक्षात नाही एकही.) रेसिपी द्या ना. मला मटणासारखी करतात ती एकच येते.

निधी,
अहो, तुम्ही चुकीची म्हणत आहात असे माझे म्हणणे नाही.
मी फक्त माझा दृष्टीकोण मांडला.
जौद्या.
चुकीचा वाटतोय, तर उडवतो. तसंही त्याला काही महत्व नाही.

ऑयस्टर्सला मराठीमध्ये कालव म्हणतात ना??
>> नसावे. ऑयस्टर्स एक एक वेगळे असतात ना? कालवं एकाच दगडात असतात, वेगळी नाही करता येत. किंवा ती सख्खी भावंडं असतील.

bivalve प्रकारातले सीफूड

तिसर्‍या - क्लॅम्स
कालवं - ऑयस्टर्स
mussels - यांना मराठीत काय म्हणतात माहीत नाही
स्कॅलप्स - यांना पण मराठी काय म्हणतात माहीत नाही

कच्चे शिंपले खाऊन पोटाला त्रास होत नाही का? >> जनरली होत नाही. ताजे असावेत ,समुद्रातून काढल्यापासून ताटात पडेपर्यंत नीट हँडल केलेले असावेत . आमच्याकडे मुलं सुद्धा आवडीने रॉ ऑयस्टर्स खातात

Pages