परवा अचानक लेकी ने डिक्लीयर केल , आज काहीही झाल तरी मला थ्री इडीयटस बघायचाच आहे. एरवी कधी फारशी पिक्चरच्या वाट्याला ही न जाणारी आज एकदम थ्री इडीयटस बघायच म्हणतेय ??
मला ही आश्चर्य वाटल. मी तिला कारण विचारल्यावर उत्तर मिळाल की सगळ्या मित्र मैत्रीणींनी बघीतलाय आणी व्हॅन मधे , रीसेस मधे त्याची चर्चा करत असतात आणि मला मात्र त्यात भाग घेता येत नाही, कारण मला त्यातल काही माहितीच नाही. सगळ्यांनी तिला तो पिक्चर बघीतला नाही म्हणून ऑडमॅन आउट ठरवल. खरच काय आहे अस त्या पिक्चर मधे ?? "अग काकु तो डिलीव्हरी चा सिन सोडला ना तर बाकी पिक्चर एकदम फंडू आहे " इती पुतणी इ.५ वी. बापरे !! हे ऐकल्यावर माझ्या बाळबोध विचारांना तो पिक्चर मुलीला दाखवण पटेना. "अग तु किती नाही दाखवलस तरी मुल चर्चा करतात बाहेर, सगळ माहिती होत मुलांना, किती दिवस बावळट ठेवणारेस तिला ? आज मी सीडी आणलीय मुलांना दाखवायला, पाठव तिला पण बघायला , तु जितक नाही म्हणशील तितका तिला बघायची इच्छा होइल" इती मैत्रीण, पिक्चर बघीतला नाही किंवा त्या बाबत काही माहिती नसेल तर मुल बावळट होतात हे मला नविनच ज्ञान मिळाल होत. मी म्हंटल इतक आवर्जून दाखवण्या सारख तरी काय आहे त्यात ?
ती:"अग मुलांना आपल्या आवडी प्रमाणे करीयर करु द्याव, आपल्या इच्छा आकांक्षा लादु नयेत त्यांच्यावर"
मी: हो पण मग त्या साठी पिक्चर दाखवायची काय गरज आहे ? आणि आपण लादतो ना आवडी निवडी आपण बघायचा, मुलांना कशाला दाखवायचा ??
लेकीने सांगीतल , शाळेत मुलांची चर्चा ऐकुन ,काल वर्गात टिचरने विचारल किती जणांनी थ्री इडीयटस पाहिला नाही ? तेव्हा ४० मुलांपैकी फक्त तीन मुलींनी हात वर केला. न बघणार्यांच प्रमाण अगदीच नगण्य होत.
आम्ही तो पिक्चर काही बघितला नाही. म्हणजे तशी इच्छा झाली नाही आणि वेळ ही. पण मला वाईट वाटल, त्याबद्दल तिला वाटणारी उत्सुकता ,शंकांच आपण निरसन केल नाही. मनात विचार आला की आपले हे बाळबोध वाटणारे विचार आपण थोडे बाजुला ठेऊन जर तिला दाखवला असता तर काय बिघडणार होत ?? पण तस ही तो न दाखवून काय बिघडत ? फक्त बाकी मुलांनी बावळट ठरवू नये म्हणून आपण तो पिक्चर बघावा हे मनाला पटल नाही.
परवा मुलीची एक मैत्रीण वय वर्ष १० सांगत होती "तुझ ना लव्ह मॅरेज होईल" ??????? मी चाट पडले. तिची आई म्हणाली अग काल "व्हॉटस युअर राशी " बघीतल्याचा परिणाम ग बाकी काही नाही, ती एकदम थंड पणे सांगत होती. वर "अग खर तर प्रियांका सारखा ड्रेस आणायचा हट्ट चाललाय तिचा, पण कुठे मिळालाच नाही" ( मलाच हुश्श वाटल. हे असल ऐकुन तर तिडीक जाते डोक्यात ) खरच आजकाल आईवडीलांना ह्यात काहीच वाटत नाही आपण मुलांसमोर काय बघतो ? किंवा काय बघाव काय बघु नये. तसले कपडे मुलांना आणून द्यावेत की नाही ?? असल्या पिक्चर्स ना मुलांना नेण जरुरी आहे का ? त्यांना नको त्या वयात नको ते दाखवण गरजेच आहे का ? बाकी असंख्य गोष्टी बघण्यासारख्या, वाचण्या सारख्या असताना मुद्दाहुन पिक्चर मधे दाखवला जाणारा ला स्त्री पुरुष संबंधातला नको इतका भडक पणा, जवळीक, व्हायलन्स, हाणामारी हे नको त्या वयात पदरचे १७५ रु (हल्लीच सिटी प्राईडच तिकीटआहे ) खर्च करुन त्यांना दाखवण जरुरी आहे का ?हे बघून पदरात खरच काय पडत ?? हे बघीतल नाही तर मुल खरच मागे पडणारेत का ??
मधे मटा मधे आलेल्या एका मानसोपचार तज्ञाच्या लेखात वाचल की ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या मनावर परिणाम निश्चित होतो, मुलांच्या हार्मोन्स वर परिणाम होतो. अडनिड्या वयात मुलांना काही तरी अर्धवट ज्ञान मिळत. पण आज काल एवढा विचार करायला कोणाकडे वेळच नाही, आणि जरी आपण अगदी बाहेर पिक्चर दाखवला नाही तरी घरच्या इडीयट बॉक्स वर ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतातच.
परवा एका मैत्रीणीचा फोन आला "अग निधी ला ना ते गाण बघायचय , वाजले की बारा आणि अप्सरा आली , येतेस का नटरंग ला ? " मी म्हंटल पाहिलाय मी तो पिक्चर पण शहाणी असशील तर मुलीला नेऊ नकोस तिला बघण्या सारखा अजिबात नाही. आवर्जुन दाखवण्या सारखा तर मुळीच नाही. त्यावर मला शेरा मिळाला , तु फारच विचार करतेस बुआ, अग आज जग कुठे चाललय ? आणि तु काय हे , हे दाखवु नकोस ते दाखवु नकोस असले विचार करत बसतेस. २१ व्या शतका कडे चाललोय आपण आणि तु बस अजुन १८ व्या शतकातली, बंधन घालत. मुलांना रामायण दाखवण्याचे दिवस गेले आता "
नंतर तिच्या लेकीने स्टोरी ही सांगीतली अग काही नाही तो बॉय असतो ना तो त्यांचा ऑर्केस्ट्रॉ चालवण्यासाठी गर्ल बनतो, पण तो खरा गर्ल नसतो. तु बघ बिनधास्त. माझी बोलतीच बंद झाली, तिला त्यातल काय कळल ? काय समजल ? हे माझ्या आकलना पलिकडच होत. आणि हे का बघायच नसत हे मुलीला कस समजवाव हे कळत नव्हत.
मी टिपीकल १८ व्या शतकातला विचार करुन तिला सांगीतल बघ तुला नटरंग बघण्यापेक्षा मॅड च किट आणून देते तेवढ्याच पैशात , काय हवय बोल ? (कारण मला माहिती होत ती मॅड च किटच मागणार म्हणून )
तुम्हाला सगळ्यांना काय वाटत हे सगळ मुलांना दाखवण, त्यांनी पहाण जरुरी आहे का ??
>>>> नाही म्हणलं तर ती फक्त
>>>> नाही म्हणलं तर ती फक्त आपल्यापासून लपवायला शिकतील.
अगदी अगदी
यामुळे सन्वादातील दरी वाढत जाते. अन हेच लपवत जाणे, पुढे "ज्या घटनेत त्यान्ना पालकान्च्या भावनिक्/मानसिक्/कृतिशील आधाराचि सर्वाधिक गरज अस्ते" तेव्हा ते देखिल लपवले गेल्यामुळे व स्वयंहिताचे निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर आत्महत्यादी कृत्यामधे त्याची परिणीती होऊ शकते.
खरोखर विचार करायला लावणारा
खरोखर विचार करायला लावणारा मुद्दा आहे.. मुख्यत्वे मुलं जर नकळत्या वयातील असतील तर हे सगळं हाताळणं कठीण काम आहे.कवितानं जे मुद्दे सुचवले आहेत ते योग्य वाटत आहेत.
छान लेख. बरोबर मुद्दे. आम्ही
छान लेख. बरोबर मुद्दे. आम्ही घरी आक्षेपार्ह कार्यक्रम बघत नाही. डिस्ने नेट्वर्क वरील साधे कार्यक्रम बघतो.
आचरट सिनेमे व इश्किया देवडी वगैरे टाइप सिनेमे मी घरी चर्चा पण करत नाही. हपिसात एकट्याने बघते.
एकुणच हलकट मीडीयाचे वैयक्तिक वेळावर आक्रमण होउ देत नाही. टिपरे कधी कधी बघतो. मराठी हिन्दी सीरेअल्स नाहीच. माझ्या रूम मध्ये मी ती नसताना सकाळी/ दुपारी कधीकधी बघते.
डिस्कवरी , ट्रा.लि. बघतो. त्यामुळे ती जग बघायचा हट्ट नेहमी करते पण थोडी मोठी झाल्याशिवाय काही मी तिला बाहेर नेणार नाही. अप्सरा आली गाणे तिला माहित आहे पण संदर्भ नाही. घरी कायम दोघी पुस्तके वाचत आहोत वेगवेगळी व कुत्रे आरामात पहुड्ले आहेत. शांतता आहे असे रात्री वातावरण असते. गाणी ऐकायची तीही वैयक्तिक.
मुलांबरोबर खेळणे व आर्ट क्राफ्ट करणे याला काही पर्यायच नाही. आपल्या काही गरजा बाजूला ठेवूनही ते केले पाहिजे कारण ती लगेच मोठी होउन जातील. मग आपल्या जवळ येत नाहीत तितकीशी. वी आर मेकिन्ग वंडरफुल मेमरीज ही भावना असावी. हे मोलाचे क्षण परत येत नाहीत. माझा एक खेळ आहे लहान शाळकरी मुलांसाठी: चार पाच बरोबर असावीत. मग एकच प्रशन विचारायचा: तुझा आवड्ता रंग कुठला? टीचर कुठली?
सब्जेक्ट कुठला? इतीहासातील व्यक्ती कोण आवड्ते? असे करत करत हळू हळू अवघड प्रशन विचारयचे -
तुला सगळ्यात जास्त कसली भीती वाट्ते? अंधाराला/ पोलिसाला बघून काय विचार येतात? शाळेत कोणाची भीती वाट्ते? शाळेत तुला कोण त्रास देते? तुला मॅगीची रेसीपी येते का? असे मुलांच्या कलाने विचारायचे व त्यांची उत्तरे मनापासुन न जजमेन्ट पास करता ऐकायची. ती अगदी उत्साहाने उत्तरे देतात. पण आपण आपली मते त्यांच्यावर ठोकायची नाहीत. तीच एकमेकांना उपाय सुचवायला लागतात. मुलांना वेळ, प्रेम, लक्ष जरुरीपेक्षा थोडेसे जास्त द्यावे.
स्मिता.. खरंच खुप खुप सुंदर
स्मिता.. खरंच खुप खुप सुंदर आहे लेख!
कविताचे पोस्टही खुप भावले
मी parenting आणि
मी parenting आणि sex-education या विषयावर दोनतीन वेळा workshops अटेंड केलेत. मला साडे सतरा वर्षाची मुलगी आणि साडे दहा वर्षाचा मुलगा आहे. या workshops चा पालकांना आणि मुलांना नक्कीच फायदा होतो. त्यात इथे विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आणि ते प्रसंग कसे handle करावेत या विषयी मार्गदर्शन केलं जातं. पण आपण या साठी वेळ देणं महत्वाच आहे. शाळेने compulsory करुन देखील कित्येक पालक सुट्टीच्या दिवशी ठेवूनही या workshops ना येत नाहीत. येतात त्या पालकांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय आणि पुरुषांची नगण्य असते. अजुनही आपल्याकडे संगोपन किंवा sex-education या विषयाला महत्व दिले जात नाही आणि ह्याला फारसं काही डोकं, training लागतं नाही असा ठाम समज आहे. पालक-शिक्षक संघटनेची प्रेसिडेंट म्हणुन मी बर्याच जणांना या गोष्टीचं महत्व पटवून देते. ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित एक ग्रूप, "संवाद", या विषयावर उत्तम मार्गदर्शन करतो.
स्मिता, तू जरुर त्यांना भेट. कारण इतके वर्ष parenting करुनही बर्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात (म्हणजे मला माहित नव्हत्या). आपलाही प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि त्या योग्य पद्धतीने handle करता येतात.
या वर स्वतंत्र बीबी काढला तर बरे होईल. मला पण खूप माहिती share करता येइल.
>>या वर स्वतंत्र बीबी काढला
>>या वर स्वतंत्र बीबी काढला तर बरे होईल.
अगदी अगदी.... अनुमोदन!
स्मिता तुम्ही खरेच पालकांसाठी
स्मिता तुम्ही खरेच पालकांसाठी एक वेगळा ग्रुप बनवा म्हण्जे आमचा एकटे पालक बीबी पण त्यातच घालता येइल. खूप बाबी आहेत ज्यावर अशी चर्चा होणे जरुरीचे आहे.
हम्म...........
हम्म...........
ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित एक
ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित एक ग्रूप, "संवाद", या विषयावर उत्तम मार्गदर्शन करतो.>>>>स्मी ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित म्हणजे जुयली नक्की असणार त्यात. मी तिला लेखमाला लिहायची विनंती केलेय. तू पण एकदा कॉल तिला म्हणजे इथे आपण आधी चर्चा केली होती तसा "पालक गृप" करता येईल
हल्लि नुसते सिनेमेच नाहि तर
हल्लि नुसते सिनेमेच नाहि तर टि.व्हि. , आजुबाजुच्या बातम्या ह्यांचा मुलांवर नक्किच परिणाम होतो. विषय खुपच छान मांडला आहे. ह्यातुन काहि चांगले विचारमंथन व्हावे हिच इछा.
बहुतान्श चर्चा सिनेमा भोवती
बहुतान्श चर्चा सिनेमा भोवती फिरते आहे, पण एकन्दरीतच वृत्तपत्रादि टीव्ही इत्यादिक मिडीया वर, त्यान्च्या सादरीकरणावर, त्यातल्या तथ्यावर आम्हि सडेतोड चर्चा करतो मुलान्समोरच! चिकित्सा करण्याची सवय लावणे महत्वाचे असते. >>>> लिंबूला मोदक
सगळ्यांचे म्हणणे पटले...
ऑडमॅन आउट ठरवल>>> त्यापेक्षा आपल्या पिल्लाला आपणच जग योग्य पद्धतीने पहाण्याची दृष्टी द्यावी... एखादी गोष्ट वाईट आहे म्हणून ती त्याच्यां पासून लपवून ठेवणे म्हणजेच त्याला अंधारात / अज्ञानात ठेवण्यासारखे आहे...
प्रत्येकाची स्वतःची एक प्रतिभा असते आणि तेच तर ३ इडी. मधे दाखवलयं... प्रत्येकाने ते आपआपल्या प्रतिमे आणि प्रतिभेनुसार स्विकारावे...
(No subject)
प्रयोग, ललीचं हे वाक्य 'तो
प्रयोग, ललीचं हे वाक्य 'तो सीन मला तत्वत: पटला' हे पूर्णपणे तिचं मत आहे. त्यावर 'मी सुद्धा मूर्ख ठरलो' असा उपरोधिक प्रतिसाद कशासाठी?
माझं दाद आणि कविताला 200%अनुमोदन.
मुलांच्यात सद्सद्विवेकबुद्धी रुजवण्यासाठी त्यांना काय चांगलं ह्याबरोबरच काय वाईट अन् का वाईट ह्याची त्यांचा एक मित्र बनून चर्चा करायला हवी. ह्यासाठी 'संवाद' महत्वाचा.. केवळ आपली तत्व जपण्यासाठी त्यांच्यावर बंधनं घातली तर ती नक्कीच बंड करून पाहतील. त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणं महत्वाचं..
(No subject)
चर्चा वाचतेय, चांगली चर्चा
चर्चा वाचतेय, चांगली चर्चा चालली आहे.
खुपच छान लेख..आणि उत्तम
खुपच छान लेख..आणि उत्तम चर्चा..मुलांनी काय बघितल्यावर त्यांची काय मन:स्थिती होते यावर बोलायचा माझा अधीकार नाही..कारण त्या संगोपनाच्या अनुभवातुन जायला मला वेळ आहे अजुन.
पण दाद, लिंबुटिंबु, कविता आणि डुआयचं म्हणणं अगदी पटलं...जे नाही आवडलं ते विसरुन जायचं आणि सगळीकडुन चांगलं तेवढंच घ्यायचं हे सुत्र आमच्यावरही लहानपणापासुन कोरल्यामुळे मला ३ इडी. आणि नटरंग मधले चांगले संदेश तेवढे लक्षात राहीलेत...बाकी स्पेसीफिक प्रसंग तिथल्या तिथे हलकेच घेऊन सोडुन दिले.
स्मि खरेचच तु खुपच छान लेख
स्मि खरेचच तु खुपच छान लेख लिहित आहेस.. कुठलाहि पिक्चर मुलांना बघु द्यावा कि नाहि ह्यावर खरतर प्रत्येक पालकाची वैयक्तिक मत असतील जी त्यांना मिळाले संस्कार, अनुभव ह्यातुन बनलेली असतात...बर्याच जणांनी म्हणल्याप्रमाणे हल्ली मुलांना इतके एक्स्पोजर मिळते कि त्यांना कितीहि प्रमाणात आयसोलेट केले तरी काहि नको त्या गोष्टि त्यांच्या पर्यंत पोचतातच्..आणि वर म्हणल्याप्रमाणे एखाद्या गोष्टितुन जे काहि चांगले शिकायला मिळेल ते मुलांना शिकुन द्यावे आणि वाईट सोडून द्यायला सांगावे.कारण कुठलीच गोष्ट हि पुर्ण वाईट किंवा पुर्ण चांगली असे नसते.आता त्यातुन निर्माण होणारे प्रश्न ..तर वयाप्रमाणे मुलांना त्या त्या गोष्टिची सायंटिफिक उत्तरे देण्यात काहिच गैर नाहि..अर्थात वय हे महत्वाचे..काहि गोष्टि ह्या तुला आत्ता कळणार नाहित पण मोठे झाल्यावर मात्र नक्कि सांगीन ..उदाहरणार्थ तु आत्ता ३रीत आहेस आणि मी तुला १०वीच गणित सांगितले तर ते कळेल का एवढे स्पष्टिकरण छोट्या मुलांना पुरेसे असावे..किंवा असायलाच हवे.शिवाय काहि गोष्टि ह्या मुलांच्या दुर्लक्ष कराव्यात किंवा लहान मुलांचे लक्ष दुसरीकडे वळवावे...ह्याच्याहि पुढे जाऊन लहान मुलांना प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टिचे स्पष्टिकरण देणे हे चुकिचे आहे तु हा पिक्चर मी म्हणत आहे म्हणुन बघायचा नाहि फक्त त्यावेळिस कुठलाहि प्रकारे आवाज न चढवता किंवा न चिडता फक्त ठामपणे आपली बाजु सांगणे हे पण तितकेच महत्वाचे..कारण मुलांना पालकांकडुन नाहि ऐकायची सवय लागणे पण महत्वाचे असते. ह्यातुनच पुढे विषय येतो तो शिस्तीच्या पद्धती म्हणजेच डिसिप्लिनरी मेथडस त्याबद्दल तर एक मोठा लेखच होईल..
कविता मी समुपदेशक ह्या नात्याने जे पालकांना सांगते ते इथे सांगितले आहे शिवाय ह्यातील बरेचसे मुद्दे आपल्यातीलच सुजाण पालकांनी आधीच मांडले आहेत
जुईली, कृपया यावर नवा बीबी
जुईली, कृपया यावर नवा बीबी सुरु करुन संवाद साधला तर सर्वानाच फायदा होईल. कारण बर्याच लोकाना या विषयी बरेच प्रश्न पडतात.Especially "sex-education" या विषयावर नीट मार्गदर्शन मिळत नाही. लोक बोलायलाही संकोचतात. पुर्वीच्या हितगुजवर मीच "मुलांशी (सु)संवाद" हा बीबी चालू केला होता तो तसाच continue करता आला असता तर बरं झालं असतं त्याची लिन्क देतेय http://www.maayboli.com/hitguj/messages/46/59207.html
माझी मुलं आता मोठी आहेत. पण
माझी मुलं आता मोठी आहेत. पण मी विचार करत होते की आम्ही हे कसं हँडल केल?
१. मुलांना बर्याच इतर अॅक्टीव्हीटीजमध्ये गुंतवलं होतं लहानपणापासून. कराटे, पियानो लेसन्स, स्वीम टीम पारटिसिपेशन्स वगैरे त्यामुळे सिनेमा पहाणं वगैरेकडे खूपच लक्ष कमी व्हायच.
२. वीकेंडला फॅमिली स्केटिंग किंवा मित्र मैत्रिणींना घेऊन पिकनीक वगैरे. लायब्ररीतून हवी तेवढी पुस्तके आणणे.
३. घरात एक नियम होता की रोज टिव्हीचा एकच शो पहायचा. अर्धा तासापेक्षा वीक्डेजमध्ये टिव्ही पहायचा नाही. मला स्वतःला पॅसिव्ह एंटरटेनमेंट आवडत नसल्यामुळे मीही खूप कमी टिव्ही/सिनेमा पहाते. मुलांसाठी मीही कधी जास्त टिव्ही पाहिला नाही.
हेल्दी अॅक्टिव्हीटिजमुळे मित्र मैत्रिणीपण तसेच केले गेले. मला वाटत इथे भारतासारखं सिनेमाबाबत पिअर प्रेशर जाणवत नाही. निदान माझी मुलं लहान असताना आम्हाला जाणवलं नाही.
आर्च, चांगले उपाय आहेत. वर
आर्च, चांगले उपाय आहेत. वर स्मिताताईंनी पण लक्ष divert करण्यासाठी activities बद्दल सुचवलय.
आर्च इथे सिनेमाचे प्रेशर नाही
आर्च इथे सिनेमाचे प्रेशर नाही पण गेम्सचे भरपुर आहे.
पण तिला त्याचे काही वाटत नव्हते. पण आता म्हणलं जाउ देत गाडीत येता जाता खेळेल म्हणून घेउन दिला. तर त्या तिला यु आर लकी म्हणाल्या म्हणे ! त्यातही गेम मारधाडीचे नाही तर ब्रेन एज सारखे घेतले. नाहीतर बेन टेन चे फार प्रस्थ आहे. माझ्या मित्राच्या केजीतल्या मुलाकडे गेल्या तो ४ वर्षाचा असल्यापासून डि एस आहे. हे गेम्स इतक्या लहान वयात तर भरपुर परिणाम करुन जातात.
माझ्या मुलिला DS मी मागच्या आठवड्या पर्यंत घेतला नव्हता. पण तिच्या मित्र-मैत्रीनींना अगदी किन्डरगार्टन / पहिली पासून आहे. त्याबद्दल तिच्या मैत्रिनी तिला यु आर नॉट लकी असेही म्हणत.
पिढी फास्ट आहे हे मान्य केले तरी निव्वळ मारामारी करणारे गेम्स घेउन देणे, सासू-सून इतर नातेवाईक ह्यांचात भांडणे होणार्या हिंदी-मराठी मालिका पाहू देणे म्हणजे पालकांचा मूर्खपणा ठरेल. पण ती ही हल्ली फॅशन झाली आहे.
जेंव्हा आपण घरी असतो तेंव्हा जास्तीत जास्त वेळ ( मग मायबोलीवर येता आले नाही तरी ) त्यांना देणे हाच त्यांचा जवळ जाण्याचा उपाय.
मी माझे अनुभव सांगते - माझ्या
मी माझे अनुभव सांगते - माझ्या लहानपणी माझ्या अवती भोवती सगळ्यानांच सिनेमा, नाटक वगैरेचा शौक होता. आई, बहिणी, मावश्या यांच्या चर्चेमुळे नकळतच एक आवड निर्माण झाली. मी लहान असताना आई, बहिणी 'अर्थ' सिनेमा पाहुन त्यावर चर्चा करत होते की शबाना आजमी कसे शेवटी त्या हिरोला नकार देते त्याच्यासोबत जायला, त्याचबरोबर राजकिरण बरोबरपण रहात नाही वगैरे पण अश्या संवादामुळेच मी तो पिक्चर विडिओवर मुद्दाम आणुन पाहिला होता.
मी सिनेमा पाहते, त्यावर आम्ही मी व सासरे पत्रे पण लिहितो. आमच्याकडे सगळ्यानाच प्रचंड वेड आहे सिनेमाचे. पण त्याचबरोबर त्यावर चर्चा करतो.
>>>> पिअर प्रेशर याचा
>>>> पिअर प्रेशर
याचा मराठीतून नेमका काय अर्थ घ्यायचा?
तु हा पिक्चर मी म्हणत आहे
तु हा पिक्चर मी म्हणत आहे म्हणुन बघायचा नाहि>>>>>जुयले पण मला माझ्या लहानपणीच आठवतय. मला अस "मी म्हणते/तो म्हणुन ऐकायला लागल की खुप म्हणजे खुप राग यायचा. पण तेच जर मला समजावुन सांगितल अगदी थोडक्यात जरी म्हणजे नुसती आज्ञा न करता थोडं समजुत घातल्यासारख तर मी आईला हवी तिच गोष्ट पण पटकन "ताई" बनुन मनापासुन करायचे.
तुझ्या डिसिप्लिनरी वरच्या लेखाची वाट बघतोय लवकर टाक
डिसिप्लिन एक बर्यापैकी मोठा इश्यु होतो कधी कधी आमच्या दोघांमधे.
आणि वर अजुन विषय आलेत बघ तुला पुरेपुर एंगेज ठेवायला
त्याच्यावर पण जमेल तेव्हा लिहीच
http://www.maayboli.com/node/14067 शिवधनुष्य पेलताना (हे पण वाच तो ही एक मला सतावणारा भुंगा आहे. त्यावर पण समुपदेशक म्हणुन तुझ मत महत्वाच ठरेल)
सगळ्यांच्या पोस्ट्स वाचल्या.
सगळ्यांच्या पोस्ट्स वाचल्या. खुप विचार करायला लावणारा लेख आहे.
थ्री ईडि मी भारतात पाहिला तेव्हा माझा मुलगा भारतात माझ्याजवळ नव्हता. थ्री ईडि मला आवडला. पिकचरला मैत्रिण आणि तिची सात वर्षांची मुलगी सोबत होते. भाषणातल्या शब्दांचा अर्थ तिने विचारला तेव्हा मैत्रिणीला काय सांगावे तेच सुचले नाही. शिवाय डिलिव्हरीचा सीन बघतांना मैत्रिणीला भयंकर घोर लागला होता आता ही काय काय विचारणार आणि मी तिचे समाधान कसे करु
तो सीन सुरु असतांना तिचे सारखे सुरु :"सांग ना आई ते काय करताय ई." शेवटी बाळ पाहिल्यावर एकदम चकित आणि म्हण्ते "बाळ असे बाहेर येते का?" आता काय बोलणार
कविता तू म्हणते तसे पृथ्वी , ग्रह तारे समजावणे सोपे. पण पिक्चरच्या सीन्सचा अर्थ समजावणे मात्र कठीण आहे. अगदी सहा सात वर्षाच्या मुलांना काय समजावणार.
माझ्यापुरते मात्र मी ठरवलेय की मुलाला हा पिक्चर इतक्यात दाखवायचा नाही. किंवा दाखवलाच तर तेवढे सीन्स वगळुन दाखवेन.
ह्म्म्म्म्म, विचार करायला
ह्म्म्म्म्म, विचार करायला लावणारा लेख आहे.
त्याचा उहापोहही करते. आणि असंच रिलेशन असावं पालक-मुलांच्यात, ज्यात मुलांना आईवडलांपासून काहीही लपवायची गरज भासू नये.
मला वाटतं जे आपल्याला योग्य वाटत नाही, त्यापासून मुलांना लांब ठेवणे योग्यच आहे. पण असे करताना त्याची कारणंही नीट समजावुण सांगणे आवश्यक आहे. आपण आपल्या वडीलधार्यांना कारणं विचारत नव्हतो, पण आजची पिढी विचारते.
इतर मुलांप्रमाणे आपण एखादी गोष्ट करत नाही आहोत तर 'तसे का' याविषयी मुलं ठाम असावीत नाहीतर 'ऑड मॅन ऑऊट' ठरल्याने न्युनगंड निर्माण व्हायची शक्यता असते. हे फक्त सिनेमा, टीव्ही बघण्याबाबतच नाही तर सर्वच बाबतीत लागू पडते.
माझाच अनुभव सांगते. मी इंजि.ला सातार्याला आले तर पहिल्याच महिन्यात बहुतेक मुलींनी मला वाळीत टाकले, कारण? मी मुलांशी बोलते. मला माझ्या आईबाबांनी कधीच मुलांशी बोलण्यापासून रोखले नव्हते. त्यात काही वाईट आहे असे बिंबवले नव्हते. मैत्रीणींप्रमाणेच मित्र बनवायचे आम्हांला स्वातंत्र्य होते. आणि त्या स्वातंत्र्यामुळेच आमच्यावर अंकुशही होता. आईबाबांच्या देखत मित्र घरी येणे, त्यांचे फोन, पत्रं येणे चालायचे, त्यामूळे, मुलांशी बोलून आपण काही थ्रिलींग करत आहोत हा विचार नव्हता. मग आई बाबांपासून काही लपवायची गरजच भासली नाही. त्यातून केवळ निर्मळ मैत्रीच मिळाली, जी अजूनही टिकून आहे. तेव्हा आपल्या मतावर, विचारांवर ठाम राहिल्याने मुलींचे वाळीत टाकणे मला जास्त प्रभावित करू शकले नाही. हळूहळू समविचारी मैत्रीणी (इतरांच्या भाषेत बिघडलेल्या)मिळाल्या आणि मग मी मजेत
कवे पिक्चर च्या बाबतीत
कवे पिक्चर च्या बाबतीत म्हणशील तर - आपल्या लहानपणी ही वेळ खुपच कमी वेळा यायची, तेव्हा केबल ,डीश टीव्ही असले प्रकार ही नव्हते, संध्याकाळचा वेळ ग्राऊंडवर खेळण्यात जायचा, त्यामुळे तसही आयांना आपल्याला जास्त समजावण्याची गरज पडली नाही, हल्ली घरी एकेकटीच मुल, भरमसाठ अभ्यास , क्लासेस, सतत दिसणारे इडीयट बॉक्स वरचे पिक्चर, सिरीयल्स, काँप्युटर गेम्स, त्यामुळे मला वाटत ,त्यांच्यात असलेली प्रचंड उर्जा , उत्सुकता योग्यजागी खर्च होत नाही ,त्यांच शंका निरसन करण अगदी गरजेच आहे, पण माझ्या मते ह्या सगळ्या शंका त्यांच्या मनात आपण का निर्माण होऊ द्यायच्या ??? दुसर्याही अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्यांच्या वयाच्या बुद्धीला खाद्य पुरवु शकतात, मग आपणहुन ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कशाला दाखवायच्या ?? जरी हल्ली मुलांना सगळ कळत, खुप फास्ट आहेत, इ इ आपल्या सोयी साठी आपण म्हणतो. आपणहे सगळ बघायचा थोडासा मोह बाजुला सारुन त्यांना वेळ दिला तर हे प्रश्ण्च उद्भणार नाहीत, योग्य वयात योग्य गोष्टी कळण म्हत्वाच असत अस मला वाटत.
दुसर्याही अनेक गोष्टी अशा
दुसर्याही अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्यांच्या वयाच्या बुद्धीला खाद्य पुरवु शकतात, मग आपणहुन ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कशाला दाखवायच्या ?? जरी हल्ली मुलांना सगळ कळत, खुप फास्ट आहेत, इ इ आपल्या सोयी साठी आपण म्हणतो. आपणहे सगळ बघायचा थोडासा मोह बाजुला सारुन त्यांना वेळ दिला तर हे प्रश्ण्च उद्भणार नाहीत,>>>>>>>>>>>>>
स्मिते, माझं या बाबतीत थोडं वेगळं मत आहे....... एकतर मुलांना उत्सुकता ही असतेच, मित्रमैत्रिणींकडून ऐकल्यामुळे, टिव्ही वर काही दृश्य पाहण्यात आल्यामुळे इ.इ. आपण त्यांना ते दाखवणं टाळलं तर अर्धवट वयात मुलांना असल्या फालतू गोष्टीमुळे पण आईवडिलांबद्दल राग निर्माण होऊ शकतो. त्यांना वाटायला लागू शकतं की, इतरांचे आईवडिल नेतात सिनेमाला, फक्त आपलेच नेत नाहित. उलट, मला तर असं वाटतं की, आपल्याबरोबरच बघू द्यावा पिक्चर त्यांना नाहितर पुढे थोडं मोठं झाल्यावर ते पालकांना न सांगता परस्पर मैत्रिणीकडे, प्रसंगी खोटं बोलून पण सिनेमा पाहून येऊ शकतात आणि आपल्याला पत्ता पण लागणार नाही. त्यापेक्षा हे जरुरी आहे की मुलं अजून आपल्याला विचारतायत 'जाऊ या का पिक्चरला' ......... परस्पर कारभार सुरु होण्यापेक्षा हे चांगलं!
कविता, http://www.maayboli.co
कविता,
http://www.maayboli.com/node/14067 शिवधनुष्य पेलताना (हे पण वाच तो ही एक मला सतावणारा भुंगा आहे. त्यावर पण समुपदेशक म्हणुन तुझ मत महत्वाच ठरेल)
इथे फक्त सदस्यांनाच जाता येते. हा कोणता ग्रुप आहे सांगु शकाल का?
लिंक दिलीत तर फारच छान!
अश्विनी "मुलांच संगोपन" ह गृप
अश्विनी "मुलांच संगोपन" ह गृप आहे तो. त्याची लिंक खाली देतेय.
http://www.maayboli.com/node/2600
स्मी काही अंशी पटतय तुझ म्हणणं मी बरेचसे पिक्चर विशेषतः HBO वरचे थीम चांगली (आपल्या दृष्टीने) असुनही टाळते (तसही मला फार कमी इंटरेस्ट आहे पि. बघण्यात म्हणुनही सोप जातसेल अस टाळण)
३डी तले दोन्ही सीन आले तेव्हा माझीही ती सिच्युएशन हाताळताना थोडी भंबेरी उडाली होती. (आधी review न बघितल्याचे परिणाम) पण एका वेळी आम्हा दोघींना बाहेर fresh room मधेच जाव लागल नेमक आणि दुसरा प्रसंग तिला काहीच कळला नाही. घरी आल्यावर आम्ही पि. बद्दल डिस्कस करताना फक्त चांगल्या गोष्टी तेव्हढ्या हायलाईट करत डिस्कस केल बाकी पिक्चर वाल्यांचा मुर्खपणा अस प्रत्यक्ष काही नसत म्हणुन जेव्हढ्यास तेव्हढ उत्तर देऊन त्यावर तेव्हढा जोर दिला नाही
नटरंग मी बघितला नाही स्वतः पण ती आजी बरोबर हट्ट करुन जाऊन आली (सायीचा हट्ट मग काय) पण त्यातुन तिचे प्रश्न सध्या तरी उत्तर न देण्यासारखे काहीच आले नाहीत. त्या पेक्शा मी नंतर झालेली मुलाखत दाखवुन तिला भलतच डोक्यात घालुन दिल त्यामुळे सध्या तरी तिच्या दृष्टीने त्याने केलेली मेहनत हाच एक विषय आहे त्यातल्या गाण्यांच्या नंतर
Pages