परवा अचानक लेकी ने डिक्लीयर केल , आज काहीही झाल तरी मला थ्री इडीयटस बघायचाच आहे. एरवी कधी फारशी पिक्चरच्या वाट्याला ही न जाणारी आज एकदम थ्री इडीयटस बघायच म्हणतेय ??
मला ही आश्चर्य वाटल. मी तिला कारण विचारल्यावर उत्तर मिळाल की सगळ्या मित्र मैत्रीणींनी बघीतलाय आणी व्हॅन मधे , रीसेस मधे त्याची चर्चा करत असतात आणि मला मात्र त्यात भाग घेता येत नाही, कारण मला त्यातल काही माहितीच नाही. सगळ्यांनी तिला तो पिक्चर बघीतला नाही म्हणून ऑडमॅन आउट ठरवल. खरच काय आहे अस त्या पिक्चर मधे ?? "अग काकु तो डिलीव्हरी चा सिन सोडला ना तर बाकी पिक्चर एकदम फंडू आहे " इती पुतणी इ.५ वी. बापरे !! हे ऐकल्यावर माझ्या बाळबोध विचारांना तो पिक्चर मुलीला दाखवण पटेना. "अग तु किती नाही दाखवलस तरी मुल चर्चा करतात बाहेर, सगळ माहिती होत मुलांना, किती दिवस बावळट ठेवणारेस तिला ? आज मी सीडी आणलीय मुलांना दाखवायला, पाठव तिला पण बघायला , तु जितक नाही म्हणशील तितका तिला बघायची इच्छा होइल" इती मैत्रीण, पिक्चर बघीतला नाही किंवा त्या बाबत काही माहिती नसेल तर मुल बावळट होतात हे मला नविनच ज्ञान मिळाल होत. मी म्हंटल इतक आवर्जून दाखवण्या सारख तरी काय आहे त्यात ?
ती:"अग मुलांना आपल्या आवडी प्रमाणे करीयर करु द्याव, आपल्या इच्छा आकांक्षा लादु नयेत त्यांच्यावर"
मी: हो पण मग त्या साठी पिक्चर दाखवायची काय गरज आहे ? आणि आपण लादतो ना आवडी निवडी आपण बघायचा, मुलांना कशाला दाखवायचा ??
लेकीने सांगीतल , शाळेत मुलांची चर्चा ऐकुन ,काल वर्गात टिचरने विचारल किती जणांनी थ्री इडीयटस पाहिला नाही ? तेव्हा ४० मुलांपैकी फक्त तीन मुलींनी हात वर केला. न बघणार्यांच प्रमाण अगदीच नगण्य होत.
आम्ही तो पिक्चर काही बघितला नाही. म्हणजे तशी इच्छा झाली नाही आणि वेळ ही. पण मला वाईट वाटल, त्याबद्दल तिला वाटणारी उत्सुकता ,शंकांच आपण निरसन केल नाही. मनात विचार आला की आपले हे बाळबोध वाटणारे विचार आपण थोडे बाजुला ठेऊन जर तिला दाखवला असता तर काय बिघडणार होत ?? पण तस ही तो न दाखवून काय बिघडत ? फक्त बाकी मुलांनी बावळट ठरवू नये म्हणून आपण तो पिक्चर बघावा हे मनाला पटल नाही.
परवा मुलीची एक मैत्रीण वय वर्ष १० सांगत होती "तुझ ना लव्ह मॅरेज होईल" ??????? मी चाट पडले. तिची आई म्हणाली अग काल "व्हॉटस युअर राशी " बघीतल्याचा परिणाम ग बाकी काही नाही, ती एकदम थंड पणे सांगत होती. वर "अग खर तर प्रियांका सारखा ड्रेस आणायचा हट्ट चाललाय तिचा, पण कुठे मिळालाच नाही" ( मलाच हुश्श वाटल. हे असल ऐकुन तर तिडीक जाते डोक्यात ) खरच आजकाल आईवडीलांना ह्यात काहीच वाटत नाही आपण मुलांसमोर काय बघतो ? किंवा काय बघाव काय बघु नये. तसले कपडे मुलांना आणून द्यावेत की नाही ?? असल्या पिक्चर्स ना मुलांना नेण जरुरी आहे का ? त्यांना नको त्या वयात नको ते दाखवण गरजेच आहे का ? बाकी असंख्य गोष्टी बघण्यासारख्या, वाचण्या सारख्या असताना मुद्दाहुन पिक्चर मधे दाखवला जाणारा ला स्त्री पुरुष संबंधातला नको इतका भडक पणा, जवळीक, व्हायलन्स, हाणामारी हे नको त्या वयात पदरचे १७५ रु (हल्लीच सिटी प्राईडच तिकीटआहे ) खर्च करुन त्यांना दाखवण जरुरी आहे का ?हे बघून पदरात खरच काय पडत ?? हे बघीतल नाही तर मुल खरच मागे पडणारेत का ??
मधे मटा मधे आलेल्या एका मानसोपचार तज्ञाच्या लेखात वाचल की ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या मनावर परिणाम निश्चित होतो, मुलांच्या हार्मोन्स वर परिणाम होतो. अडनिड्या वयात मुलांना काही तरी अर्धवट ज्ञान मिळत. पण आज काल एवढा विचार करायला कोणाकडे वेळच नाही, आणि जरी आपण अगदी बाहेर पिक्चर दाखवला नाही तरी घरच्या इडीयट बॉक्स वर ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतातच.
परवा एका मैत्रीणीचा फोन आला "अग निधी ला ना ते गाण बघायचय , वाजले की बारा आणि अप्सरा आली , येतेस का नटरंग ला ? " मी म्हंटल पाहिलाय मी तो पिक्चर पण शहाणी असशील तर मुलीला नेऊ नकोस तिला बघण्या सारखा अजिबात नाही. आवर्जुन दाखवण्या सारखा तर मुळीच नाही. त्यावर मला शेरा मिळाला , तु फारच विचार करतेस बुआ, अग आज जग कुठे चाललय ? आणि तु काय हे , हे दाखवु नकोस ते दाखवु नकोस असले विचार करत बसतेस. २१ व्या शतका कडे चाललोय आपण आणि तु बस अजुन १८ व्या शतकातली, बंधन घालत. मुलांना रामायण दाखवण्याचे दिवस गेले आता "
नंतर तिच्या लेकीने स्टोरी ही सांगीतली अग काही नाही तो बॉय असतो ना तो त्यांचा ऑर्केस्ट्रॉ चालवण्यासाठी गर्ल बनतो, पण तो खरा गर्ल नसतो. तु बघ बिनधास्त. माझी बोलतीच बंद झाली, तिला त्यातल काय कळल ? काय समजल ? हे माझ्या आकलना पलिकडच होत. आणि हे का बघायच नसत हे मुलीला कस समजवाव हे कळत नव्हत.
मी टिपीकल १८ व्या शतकातला विचार करुन तिला सांगीतल बघ तुला नटरंग बघण्यापेक्षा मॅड च किट आणून देते तेवढ्याच पैशात , काय हवय बोल ? (कारण मला माहिती होत ती मॅड च किटच मागणार म्हणून )
तुम्हाला सगळ्यांना काय वाटत हे सगळ मुलांना दाखवण, त्यांनी पहाण जरुरी आहे का ??
स्मिते, आणि शिवाय...... हे
स्मिते, आणि शिवाय...... हे सगळं बघायचं थोडंसं टाळून जरी आपण मुलांना वेळ दिला आणि इतर अॅक्टीव्हिटीज मधे गुंतवले तरी ती अॅक्टिव्हिटी झाल्यावर मुलांचं तेच टुमणं परत चालू होईल आणि त्यात अजून एका वाक्याची भर पडली असेल की " आता एवढा वेळ मी तू सांगितलंस ते केलं की नाही, मग आता मी म्हणते/तो तसं एकदाच, फक्त याच वेळी मला त्या अमूक तमूक पिक्चर ला घेऊन चल ना ग आई, प्लीsssssssssज!
३ इडियट्स मधला डिलिव्हरी चा
३ इडियट्स मधला डिलिव्हरी चा सीन बघत असताना आमिर खान माउथ टू माउथ रेस्पिरेशन देतो बाळाला त्यावेळी माझ्या १० वर्षाच्या राधाने मला खूप घोर लागल्यासारखं विचारलं होतं की " आई, बाळाला इन्फेक्शन होईल ना आता? "
म्हणजे, सांगायचा मुद्दा हा की, आपण ज्या अँगल ने मूव्ही पाहात असतो त्या अँगलने मुलं पहात नाहीत. नविन उमराव जान बघताना त्यातल्या एका गाण्याच्या वेळी माझ्या मते मुलांनी बघू नयेत असे सीन आले तेव्हा मी चॅनल बदलणार इतक्यात माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणाली, "वॉव, काय मस्त दागिने घालायला मिळतात ना या हिरॉइन्स ना! त्यांना ज्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात त्याकडे कदाचित पालकांचं लक्ष पण जात नाही कारण वयामुळे आणि अनुभवामुळे आलेलं ज्ञान आपलं लक्ष वेगळ्याच गोष्टीकडे खेचून घेत असतं.
या बाबतीत ते एक फेमस चित्र आहे ना.......... दोन फ्लॉवरपॉट त्या चित्रात अश्या पद्धतीने ठेवले आहेत की, जे अॅडल्ट आहेत त्यांना ते नग्न स्त्री पुरुष वाटतात आणि १५ वर्षाखालच्या मुलांना कधी तो एखादा प्राणी वाटतो, कधी दगड वाटतात, कधी २ ग्लास वाटतात. पूर्णपणे आपल्या आणि मुलांच्या मानसिकतेतला फरक सांगणारं चित्र आहे ते!
Pages