नवी गाडी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्‍या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.

आम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.
मी, "हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस ?"
ती, "का ग ? आज काय विशेष ?"
मी, "नवी गाडी घेतली ते सांगायला."
ती, "अरे व्वा, मस्तच बातमी, कुठली घेतली ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड"
ती, "मस्तच...आई-बाबांना सांग बाई आधी फोन करुन. अमेरिकेत सध्या काय गोंधळ आहे. त्यांना फार काळजी पडलीये तुमची (:अओ:). बरं रंग कुठला ?"
मी, "काळा.."
ती, "अर्र काळाच का ?"
हे ऐकल्यावर मी फोन ठेऊनच दिला. कारण आमच्या आख्या खानदानात पहिली काळी गाडी ह्यांची. माझ्या भाच्याचा मुंजीत ह्या गाडीला कल्पकतेने थर्माकोलची सोंड वगैरे लावुन वरातीसाठी हत्ती बनवला होता. हत्ती करायची कल्पनाच मुळी गाडीच्या काळ्या रंगावरुन आली. म्हणतात ना, आपला तो बाब्या !!!

त्या दिवशी रात्री काही मला घरी फोन करणे झाले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी-
मी, "हॅलो बाबा"
बाबा, "बोला..." बाबांना कधीही मी कोण बोलते सांगावे लागत नाही. ते बरोबर ओळखतात. ह्याविरुद्ध मी, एकदा खुद्द आईला "बाई तुम्ही कोण बोलताय ते आधी सांगणार का ?" असे म्हणाले होते.
मी, "काल गाडी घेतली. तेच सांगायला फोन केला"
बाबा, "गाडी घेतली ? नवी ?"
मी- बारीक आवाजात, "हो, नवीच आहे"
बाबा, "वा छान छान. आम्ही इथे काळजी करतो. ओबामा निवडुन येइल तर बरे म्हणतो आणि तुम्ही तर गाडी घेतली !!!"
मी, "आता हिवाळा आला ना. दोन गाड्या हव्याच. पहिली विकुनही वर्ष-सहा महिने होत आले की आता."
बाबा, "ते ही खरच, बरं झालां घेतली. रंग कुठला ?"
मी (चाचरत), "काळा...."
बाबा, "तुझी आई बाहेर गेलीये. सकाळी फोन कर."
"काळा रंग ह्या मॉडेलला खूप छान दिसतो.." हे माझे शब्द ओठातुनच पोटात जातात. काळा रंग म्हणजे बाबांची साफ नापसंती असते. ते नेहेमी म्हणतात, "आपली गाडी रंग पांढरा असल्यामुळे कशी सगळ्यांच्या गाड्यांपेक्षा भारी दिसते."

ऑफिसमधील माझी मैत्रिण शीतलला आम्ही गाडी घेणार हे आधीच ठाऊक होतं. गाडी घरी आणल्याची सांगावं म्हणुन मी तिला मेसेज पाठवला. आता हा संवाद जसाच्या तसा दिला नाही तर त्यातली गंम्मत उरणार नाही म्हणुन इंग्रजीत.
"Hi"
"Hey...whatz up ?"
"have a news to share with u.."
"so soon ? Ishan is just a year old...;)"
"ha...sooner than u can expect...the baby is home already..."
"really...which one ?"
"Honda Accord..2009.."
"noooooooooo..."
"yessssssss.."
"I was so proud of you guys..."
"you have many other reasons to be proud of us :)"
आधीच आम्ही इतकी मस्त स्पोर्ट्स कार विकून मोठ्याच पापाचे धनी झालो होतो. त्याबदल्यात होंडा ऍकॉर्ड म्हंटल्यावर तर जगबुडी नक्की !!! आणि मग जसे काही आम्ही केलेल्या पापाचा धक्का सहन न झाल्याने ती तरातरा माझ्या डेस्कपाशीच येउन उभी राहिली आणि "How can you do this..." वगैरे वगैरे बोलायला लागली.

मग जेवणाच्या सुट्टीत बाराकर वैद्यांच्या बायकोला फोन केला. आम्ही गाडी घ्यायचे ठरवले तेव्हापासून सर्व शोधाशोधी वगैरे ह्या नवरा बायकोला माहिती होती.
मी, "कामात आहेस का ?"
ती, "बोल.."
मी, "गाडी घेतली बरं एकदाची..."
ती, "कुठली घेतली शेवटी ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड २००९..."
ती, "तू तुझ्या खतरुडपणाने नवर्‍याचं स्टँडर्ड* घालवलं आहेस.."
मी, "ठेऊ का फोन ?"
ती, "बाय"

* हे स्टँडर्डचं समीकरण अगदी सोप्पं आहे.
माझ्या नवर्‍याने उकरुन काढलेले खर्च + वैद्य कुटुंबीयांचा पाठिंबा = स्टँडर्ड. वैद्य पाठिंबा देतील नाहीतर काय.

एव्हाना मी रचना, आरतीला इपत्र पाठवले होते. रचनाने गेल्याच महिन्यात काळ्याच रंगाची वॅगन-आर घेतली. मी चुकुन सँट्रोला मोठी बहिण झाली असे लिहिले. त्यावर त्यांचे उत्तर-
आरती- हो ? कस्स्काय ? पण जबर्‍या !!!

रचना- सहीSSSSS लेकीन येह सँट्रो कौन है भाय ? काळा रंग बाबांना सांगितलास का ?

हे लिहिताना रचना खुदुखुदु हसत असणार आणि तिच्या नव्या गाडीवर बाबांनी टाकलेला तु. क. आता मला झेलावा लागणार ह्या विचाराने तिला आसूरी आनंद होत असणार हे मला शंभर टक्के माहिती होते.

आई आदल्या दिवशी भेटली नाही म्हणुन मी परत फोन केला.
मी, "आई..."
ती, "ह्म्म मला कळालं नवी गाडी घेतली...रचनाने सांगितलं मला..."
मी, "रचनाने ? अगं मी काल बाबांना फोन केला होता...त्यांनी नाही का सांगितलं ?"
ती, "अगं बाई काही बोलले नाहीत मला. बाबांचं हे असंच आहे. बागेत घोसाळ्याला घोसाळी लागली की सगळ्या गावाला बातमी आणि महत्वाचं ते सांगायच नाही. आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?" इथे मी काहीच बोलत नाही. मागे एकदा मी आईची बाजुन घेउन कायसं म्हणाले तर बाबा दुसर्‍या लाइनवर ऐकत होते.
मग आईच पूढे म्हणाली, "छाssssन झालं...आम्हाला आपली काळजी वाटते रोज बातम्या ऐकुन...तुम्ही नवी गाडी घेतली म्हणजे मग आम्हाला चिंता नको. रंग कुठलाय ?"
मी, "काळा"
आई, "तरीच बाबा काही बोलले नाहीत बरका. काळा का घेतला ? बाळाला आवडेल असा घ्यायचा ना."
आता आजीबाईंचा नातू आहे सव्वा वर्षाचा. त्याला आवडणारे रंग म्हणजे भडक लाल, पिवळा, निळा. अशा रंगाची गाडी घ्यायची का ? पण त्याच्या आजीला कोण समजावणार. मांजराच्या गळ्यात घंटा !!!

नवरा आणि त्याचा मित्र. ह्या दोघांनी संगनमताने पहिल्या महागडया गाड्या घेतल्या होत्या. प्रत्येकवेळी भेटल्यावर आपापल्या गाडीच्या कौतुकात तासनतास घालवले होते. त्याने ही थोडे दिवसांपुर्वीच पहिली गाडी विकुन "क्यामरी" घेतलीये.
हा, "हाय.."
तो, "क्यु बे साले बाप बन गया तो फोन करना बंद कर दिया.."
हा, "तु है ना लाइन मे..सब समझ जायेगा..."
तो, "हा यार...मेरी बिवी तो अभी से मम्मी मोड मे आ गयी है | मै फस गया यार तीन तीन मम्मीयों के बीचमें |" तीन मम्म्या म्हणजे ह्याची आई, सासू आणि बायको.
हा (अत्यंत केवीलवाण्या आवाजत), "अच्छा सुन, कल नयी गाडी ले आये यार.."
तो, "अबे तो रो क्यु रहा है ? कौन सी ?"
हा, "होंडा ऍकॉर्ड.."
तो, "साला देसी...आ गया ना औकात पे..."
आणि मग इशान दचकुन उठला इतकं हा मोठ्याने हा हा हा करुन हसला !!!

प्रकार: 

काळ्या गाड्या माझ्या मते जास्त देखण्या दिसतात<<<<
अगदी सहमत. मलाही काळ्या गाड्याच जास्त आवडतात.
बा़की लेख छान जमलाय.
"साला देसी...आ गया ना औकात पे..."<<< हे पण पटेश. Proud

अरेरे किती वाईट अवस्था झाली..लक्झरी गाडी सोडुन भिक्कारडी मध्यमवर्गीय होंडा घ्यावी लागली!

पुर्वी अर्थव्यवस्था "चांगली" असताना तुम्हाला कोणी होंडा घेतल्याचा फोन आला असता तर तुमची त्या वैद्यांसारखीच प्रतिक्रिया होती का?

आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?" >>smiley36_0.gif
ह्याविरुद्ध मी, एकदा खुद्द आईला "बाई तुम्ही कोण बोलताय ते आधी सांगणार का ?" असे म्हणाले होते.>> सिंडे, कठिण आहेस..smiley2.gif

पण मग ते गुलाबजामुनच काय झाल? केले की नाही?

>>>चम्प्याच्या गाडीच्या झमेल्यात सालं ते गुलाबजामुनचं मीही विसरूनच गेलो होतो काय झालं खरेच त्या गुलाबजाम्बूचं? (आता मला बाहेर जाऊन गरम गरम गुलाबजाम्बू आणावे लागतील....(चम्प्याच्या गावाकडं गुलाबजाम्बूच म्हणतात...)) Proud

मस्त लिहिलयस....
गेल्या वर्षी लिहिलयस तरीच.. Ishan is just a year old हे वाचुन मी कधी पोस्ट्लाय ते लगेचच पाहिल म्हंटल हायला अजुन इयर ओल्ड कसा??

सिंडे, मस्त लिहीलयस.

"साला देसी...आ गया ना औकात पे..."<<<
हे मात्र मनापासून पटलं. Happy

तसे आम्ही हाँडाचे लॉयल कस्टमर. नवर्‍याची पहिली अ‍ॅक्युरा इंटीग्रा होती (पण ती मात्र ब्राईट रेड स्पोर्टस कार होती), नंतर हाँडा अकॉर्ड, आणि हॉडा ऑडीसी. नंतर म्हंटलं जरा वेगळी गाडी घेऊ. मग खूप रिसर्च केला आणि शेवटी घेतली... टोयोटा कॅम्री. Proud

मी तेच म्हणतोय, हा लिहीलेला लक्षात नाही आला, आता प्रकाशित केला म्हणजे बरोबर आहे.
आमचा पाठिंबा Lol तुझ्या नवर्‍याला माझा, आणि मला त्याचा सतत पाठिंबा असणार आहे. पण आमच्या पाठिंब्या नी होतय काय? शेवटी तुम्ही महिला मंडळ जे म्हणता तेच होतं की नाही? फुकट सालं आमचं नाव खराब.

सिंडे - खल्लास डायलॉग्ज Lol

काळी अ‍ॅकॉर्ड काय जबर्‍या दिसते !!

मी पण खूप रीसर्च नंतर निस्सान अल्टीमा घेतली Happy

जबरी.. Happy

मी पण खूप रीसर्च नंतर निस्सान अल्टीमा घेतली >> ज्या देसींना आपण फार देसीपणा करतोय असे वाटते होंडा/टोयोटा घेऊन ते लोक निसान/माझदा घेतात.. Happy ~D

>>ते लोक निसान/माझदा घेतात
Lol मी घेतली तेव्हा माझ्या ओळखीतला ती गाडी घेणारा मी एकटाच होतो.
आता हे वाक्य अगदी लागू पडते Lol

आम्ही पण खूप रिसर्च नंतर टोयोटा सिएन्ना घेतली. आधी नवर्‍याचीही अ‍ॅकॉर्ड होती पण ती अ‍ॅक्सिडेंटमध्ये टोटल झाल्यावर त्याने इन्फिनिटी घेतली पण परत जॅपनीज कंपनीचंच लक्झरी मॉडेल.

काळी अ‍ॅकॉर्ड काय जबर्‍या दिसते !! >>>
नकुल पण थोड्याशा उन्हात पण ती तेवढीच जबरी तापते. अगदी एसी लावेपर्यंत पण धीर धरवत नाही.

हेहे सही लिहीलयं Happy
<साला देसी...आ गया ना औकात पे..." > Proud
आम्हीपण जेट्टा विकली आणि नंतर टोयोटा कोरोला घेतली, तेव्हा हाच सेम डायलॉग सगळ्यांनी ऐकवलेला Happy

तो, "साला देसी...आ गया ना औकात पे..."
ही ही... हे मात्र खर आहे. अमेरिकेत ९९% देसी होंडा, टोयोटा आणि निस्सान याच गाड्या घेतात (आणि हा देसी म्हणजी मी ही त्याला अपवाद नाही). लोकांना काळा रंग का आवडत नाही तेच कळत नाही. मी भारतात असताना पण काळा रंग सोडून कुठाल्याही रंगाची कार घे म्हणून सांगितलं होतं . मग मी रागाने लालभडक झेन घेतली होती. Happy

सिंडे, फर्मास जमलंय स्फु.! पंचेस सही आहेत.

>>>बागेत घोसाळ्याला घोसाळी लागली की सगळ्या गावाला बातमी आणि महत्वाचं ते सांगायच नाही. आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?"
Rofl

मस्तच लिहिलंयस. काळ्या गाडीला का नावं ठेवतात कळत नाहीत!
होंडा अकॉर्ड ला पुढच्या वर्षापासून अमेरिकेत हिंदी अकॉर्ड म्हणणार आहेत म्हणे Happy

काले है तो क्या हुआ दिलवाले है Happy
मस्तं लिहिलय सिन्डे. आम्ही गाडी घेतली तेव्हा माझ्या सासुबाईंनी (त्या इथे होत्या तेव्हा) कुणालातरी भारतात फोन केला होता. त्या बिचार्‍या म्हणाल्या व्वा हे मॉडेल का?छानै वगैरे.
सासुबाई त्यावरः आम्ही घेतलीये त्याला छान म्हणतील त्यांनाच फोन करून सांगतोय...
मी हसून हसून पडले होते... जबरी आहेत त्या.

सही एकदम Happy बाकी, 'अ‍ॅकॉर्ड'' ऐवजी 'ऍकॉर्ड' लिहिल्यामुळे कळलंच होतं, की हा लेख जुना असावा. Proud

काळी गाडी हॉट दिसते खरेच. (पण भारतातल्या उन्हात लवकर हॉट होते, हेही खरे). यावर्षी नवीन आलेले अ‍ॅकॉर्डचे मॉडेल सही आहे अगदी. काहींच्या मते, काळ्यापेक्षा पांढर्‍या गाड्या प्रशस्त, मोठ्या दिसतात. मला मात्र तसं काही वाटत नाही.

मी जानेवारीत आलेली नवीन 'फियाट' घ्यायचे ठरवले, तेव्हा अश्शाच आठ्या चढल्या होत्या घरात अन मित्रांत. आता लक्षात आले, की तोही लिहिण्यासारखाच फार्स आहे. (देऊ का झब्बू, देऊ? Proud )

Pages