माबोकरांचे प्रचि दालन.. (सूर्योदय आणि सूर्यास्त..)

Submitted by अ'निरु'द्ध on 10 October, 2020 - 10:08

माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..

प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..

मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.

तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..

जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.

चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..

मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..

जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.

सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.


टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<ढगांतून सूर्यकिरण खाली येतात हे दृष्य मोबाइल क्याम्राने कुणाला मिळाले आहे का? >>>
@ srd, देतो लवकरच.. गोव्याला मिळाले होते कारवार वरुन येताना..

पालोलिम बिच, सूर्यास्त..


सुंदर आहेत प्रचि. माझ्याकडे अशी अनेक सुर्योदय (आधीच्या घराची बाल्कनी पूर्वेला होती म्हणून ) आणि आता सूर्यास्ताची प्रचि आहेत.

खालील फोटो २४ जुलैला संध्याकाळी ७.२० वाजता घेतला आहे. मोबाईल सॅमसंग S8. कोणताही फिल्टर वापरलेला नाही.

0ab17f5c-e954-4b12-9df6-bd531b4206d9.jpg

ढगांतून सूर्यकिरण खाली येतात हे दृष्य मोबाइल क्याम्राने कुणाला मिळाले आहे का? >> आहे आहे. इथे प्रचि १७ पहा.
घरबसल्या उत्तरायण - दक्षिणायन : https://www.maayboli.com/node/51637

उत्तरायण दक्षिणायनच्या या धाग्याचा विषय वेगळा असला तरी त्यावर सर्व सुर्योदयाचे फोटो आहेत.

हायला सगळ्यांचे फोटो इतके भारी आहेत की आमच्यासारख्या बिलो सर्वसामान्य फोटोग्राफरसाठी हा धागा नाही असं वाटायला लागलंय.

द्या हो बोकलत फोटो...
हा धागा सर्वांसाठी आहे... आणि मुख्य म्हणजे सगळेच आपले आहेत...

IMG_20201011_103329.jpg
झाला upload फोटो... मुंबईजवळ एलिफंटा caves आहेत.. तिथे समुद्रातून बोटीने जाताना काढलेला फोटो...

मामी,मोक्षु,निरू, माबो वाचक सुपर्ब फोटोज.

बोकलत माझे साध्या मोबाईल मधे काढलेले फोटो आहेत. प्रत्यक्षात रंग खूप छान आहेत,फोटोत परफेक्ट नाही आले.
द्या तुम्ही पण फोटो.

अजून एक संध्याकाळ
IMG_20201011_103642.JPG

मामी, छान फोटो..

मोक्षू, फोटोमधला पक्षी सुंदरच.. त्या सूर्याचा एक तिरका किरण पक्षी आणि एक तिरका किरण जहाजाशी एका मस्त अदृश्य रेषेने छान जोडला जातोय.. Nice Balancing..

माबो वाचक... नभ ऊतरु आलं...

अजून एक सुर्यास्त. ढग आणि क्षितीजाच्या फटीतून डोकावणारा सूर्य. हा 'निसर्ग' वादळानंतरचा सूर्यास्त आहे. तारीख ३ जून २०२०

9cc4b5f8-3043-431f-bb48-293d9614e4b2.jpg

मोबाईलचे पाहिले सर्व। आवडले.
सामसंग 7,8,9 , one plus, Nexus मोबाईल क्याम्रांंबद्दल ऐकून होतो. ते खरंच आहे. सुंदर.
निरु, किरण छान आलेत. मामी तो पूल मस्त आहे.

3f43a985117135380f178df374e2e972.jpg

या फोटोतील सूर्याच्या बाजूचा चमकणारा ठिपका म्हणजे landing होत असलेले विमान आहे. बराच वेळ समजतच न्हवते की इतके प्रकाशमान नेमके काय येते आहे आकाशातून. मग जरा जवळ आल्यावर काय ते कळले Lol

20201011_161010.jpg

अंधारबन जंगल ट्रेकच्या स्टार्टींग पॉइंटला एक छोटासा तलाव आहे.... त्याच्या काठावर पाहिलेला हा सुर्यास्त!

मस्त धागा...

बेलापूर पारसिकच्या टेकडीवरचा सूर्योदय..

Pages