Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23
भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
४. मालक/नवरा
४. मालक/नवरा
४. मालक/नवरा >>नाही.
४. मालक/नवरा >>
नाही.
इतरांशी जुळणार नाही.
म्हणून पहिल्यांदा २ अर्थ एकदम शोधा
४ >>> खाजगी स्तरावर नका बघू.
४ >>> खाजगी स्तरावर नका बघू.
जरा व्यापक...
७.सूक्ष्म
७.सूक्ष्म
७.सूक्ष्म >> नाही.
७.सूक्ष्म >> नाही.
यात नीट बघायला.....
७ सुई
७ सुई
७ सुई >>> जवळ आलात. थोडा
७ सुई >>> जवळ आलात. थोडा बारीक विचार करा !
4. ईश्वर 5. कल्पवृक्ष
4. ईश्वर
5. कल्पवृक्ष
७ सुईचे अग्र / टोक / नेढं
७ (सुईचे) अग्र / टोक / नेढं
4. ईश्वर
4. ईश्वर
5. कल्पवृक्ष >>>
नाही.
ईश्वर >> इतकेही व्यापक नाही. हे दोन्ही 'सुई' शी निगडीत आहेत का ?
नेढं बरोब्बर ! शाब्बास ...
नेढं बरोब्बर !
शाब्बास ...
३ सत्ता / राज्य
३ सत्ता / राज्य
२ गोदी / कोठी
२ गोदी / कोठी
३ सत्ता / राज्य >>> नाही.
३ सत्ता / राज्य >>> नाही. (नेढे हा संदर्भ घेउनच विचार हवा)
२ गोदी / कोठी >>> नाही.
धान्यावरची विशेष जागा. धान्याचे नीट निरिक्षण करा !
३ दाभ
३ दाभ
दाभ = गवत
दाभ = गवत
>>> नाही.
धान्याचा दाणा हातात घेऊन नीट पाहा !
कूस
कूस
दर्भ
दर्भ
दोन्ही नाही
दोन्ही नाही
कूस नाही पण दिशा योग्य.
कूस प्राणी/ माणसात वापरतात. तसेच धान्यावर ?
पाखडताना उडते त्याला कूस
पाखडताना उडते त्याला कूस किंवा बारीक बोटात घुसते धान्य हाताळताना कुसं असेल कदाचित.
ती कूस नाही ते कुसं आहे
ती कूस नाही ते कुसं आहे खात्री नाही पण ऐकलयं
कुसळ असते ना ते..
कुसळ असते ना ते..
कुसेतून निर्मिती होते ! तसेच.
कुसेतून निर्मिती होते ! तसेच....
सुंदर प्रयत्न !
७ कडे नीट पाहत राहिले तर १ जमायला पाहिजे !
उद्या भेटू
शुभेच्छा
आम्ही कुसं पण म्हणतो श्रवु ,
आम्ही कुसं पण म्हणतो श्रवु , मराठवाड्यात नेहमीच
2. साल 5.स्वर्गलोक
2. साल
5.स्वर्गलोक
२ लोंबी / ओंबी / तुरा
२ लोंबी / ओंबी / तुरा
२. तूस
२. तूस
अस्मिता डोळ्यात कुसळ असे
अस्मिता डोळ्यात कुसळ असे बोलतात ते माहित आहे.. कुसें माहित नव्हते.. प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते ना..त्यातलाच प्रकार असेल हा..
१. आरपार
१. आरपार
शक्य आहे ...
शक्य आहे ... श्रवु
Pages