Submitted by सुभाषिणी on 20 January, 2015 - 03:08
दोडक्याच्या सालीची कुरकुरीत
साहीत्य - दोन मोठ्या दोडकयांच्या किसुन काढलेल्या साली, किसलेले खोबरे-दोन चमचे, तीळ-एक चमचा, दाण्याचा कुट-एक चमचा.लसुण-दोन पाकळ्या ठेचुन.तेल, मोह्ररी , हळद फोडणीसाठी
क्रती- दोडकी धुवुन किसणीने साले किसुन घ्यावी.तेल तापवुन मोहरी , हळद घालुन फोडणी करावी. लसुण ठेचुन फोडणीत घालावा. लागेच दोडक्याची साले घालुन पारतावे. साले थोडी कोरडी होताच खोबर्याचा किस, तीळ, दाण्याचा कुट घालुन मंद गॉसवर परतावे. कुरकुरीत झाले की गैस बंद करावा. मग मिठ, साखर, लाल तिखट घालावे.सर्व पदार्थ कोरडेच असल्याने कुरकुरीत होण्यास अजीबात वेळ लागत नाही. वास्तविक हयासाठी काटकोर असे प्रमाण नाही. आपल्या आवडीनुसार आपण कामीजास्त करु शकतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतेय .. मैत्रिणीकडे
मस्त दिसतेय .. मैत्रिणीकडे पहिल्यांदा खाल्ली होती..
खरंच कुरकुरीत दिसतेय
खरंच कुरकुरीत दिसतेय चटणी..छान .
सोप्पी वाटतेय पाककृती, करून
सोप्पी वाटतेय पाककृती, करून खाण्यात येईल.
मग मिठ, साखर, लाल तिखट घालावे.>>>> रच्याकने, तुम्ही हे पदार्थ साहित्यात दिलेले नाहीत, ऐच्छिक आहेत का?
वॉव! मस्तच दिसतेय चटणी.
वॉव! मस्तच दिसतेय चटणी.
मस्तच लागते ही चटणी. मी नेहमी
मस्तच लागते ही चटणी. मी नेहमी करते ह्या कृतीनेच. नवल म्हणजे माझ्या मुलाला ही आवडते.
मस्तच! यमी असणार ही एकदम.
मस्तच! यमी असणार ही एकदम.
Mane kharach. Anavdhanane
Mane kharach. Anavdhanane rahile khar sahityatlihayche.
सुभाषिणी मस्त आहे फोटो. मी
सुभाषिणी मस्त आहे फोटो. मी फोडणीत हिरवी मिर्ची घालते, लसुण नाही. छान होते ही चटणी. मोठा तवा असेल तर त्यावर करावी, मस्त होते. दूधी भोपळयाच्या सालीची सेम होते, फक्त लगेच करावी लागते, नाहीतर दूधी काळा पडतो.
Kharay rashmi dodkyache pan
Kharay rashmi dodkyache pan tasech hote.