Submitted by जो_एस on 16 April, 2013 - 06:22
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं,... रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं तोडून प्रगती होते
विकासाला गती येते
परत एकदा विकासाची
व्याख्या तेवढी करून घ्या
आहेत तोवर……
झाडं तोडा रोलर फिरवा
स्टेडियम बिल्डींग सेझ उगवा
सगळ्यात आधी श्वासासाठी
मास्क तेवढा करून घ्या
आहेत तोवर …..
एकेकाळी पृथ्वी वरती
लहान मोठी झाडं होती
फोटो सहित इतिहासात
नोंद मात्र करून घ्या
आहेत तोवर…..
“झाडं लावा झाडं जगवा”
कागदावरती लिहून घ्या
त्या कागदांनी येताजाता
कृती विसंगत झाकुन घ्या
आहेत तोवर…..
प्रोजेक्ट लिहून भागणार नाही
कायदे करून वाचणार नाही
निसर्ग प्रेमाचा मनांमधे
अंकुर एखादा फुटू द्या
आहेत तोवर…..
सुधीर
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देव करो व हे खरे न होवो. मस्त
देव करो व हे खरे न होवो. मस्त (असे म्हणताना पण कसेसे होतेय खरे तर).
जो-एस.. खूपच छान आहे रे
जो-एस.. खूपच छान आहे रे कविता.. मोनालिप + १००
monalip धंन्यवाद देव करो व हे
monalip धंन्यवाद
देव करो व हे खरे न होवो>> खरच
वर्षू नील अभारी आहे.
वर्षू नील
अभारी आहे.
सुंदर अभिव्यक्ति. झाडांवर,
सुंदर अभिव्यक्ति.
झाडांवर, निसर्गावर खरेखुरे प्रेम असलेलाच असे लिहू शकेल - हृदयातून..
प्रोजेक्ट लिहून भागणार नाही
कायदे करून वाचणार नाही
निसर्ग प्रेमाचा मनांमधे
अंकुर एखादा फुटू द्या >>>>>> सोला आने सच.
शशांक थँक्स
शशांक थँक्स
जो_एस, खास कविता
जो_एस,
खास कविता ..
(निसर्गाविषयीची तळमळ दिसुन येते )
जो_एस, अगदी अगदी माझ्या
जो_एस,
अगदी अगदी माझ्या मनातलं सगळं.
अनिल, आशिगो धंन्यवाद गेल्या
अनिल, आशिगो
धंन्यवाद
गेल्या काहि दिवसांत बरीच झाडं कमी झालेली दिसली त्यामुळे हे सुचलं
असच पुर्वी एक वृक्ष तोडलेला पाहून ही कविता लिहीली होती.
http://www.maayboli.com/node/7021
एक झाड लावले की कविता
एक झाड लावले की कविता लिहण्यापेक्षा अधिक आनंद मिळतो.(स्वानुभव)
कविता आवडली.विक्रांत
कविता आवडली.विक्रांत प्रभाकरांचा प्रतिसाद आपल्या सगळ्यांसाठीच.
विक्रांत, भारती अभारी आहे खरच
विक्रांत, भारती अभारी आहे
खरच आहे विक्रांत झाडं लावून जो आनंद मिळतो त्याला सिमा नाही. तो तर मिळवतच असतो. पण कित्त्येक वर्षांची झाडं तोडलेली पाहिली की तितकाच खेदही वाटतो.
आशय, विषय चांगला
आशय, विषय चांगला मांडलाय.
शेवटच्या कडव्यातला संदेश विशेष.
उल्हास धंन्यवाद
उल्हास धंन्यवाद
सद्यस्थिती.
सद्यस्थिती.
मस्त रचना !
मस्त रचना !
शोभा१२४, मुक्तेश्वर
शोभा१२४, मुक्तेश्वर धंन्यवाद
सुधीर