Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन लोकाना एखाद्या लेखाची
नवीन लोकाना एखाद्या लेखाची लिन्क दिली अन ती त्याना ग्रूप चे सदस्य नाहीत म्हणुन पाहता आली नाही... हे प्रकार टाळण्यासाठी, जर ग्रुप चे सदस्य होण्यापेक्षा ' हा विषय .. लोकांना आवडला' असा संदर्भ दिला अन तेथील सर्व लिखाण खुले ठेवले तर चालेल का?
मायबोली चे लिखाण वाचायला मायबोलीकरच व्हावे लागणे, ही अट आहे असे वाटते. अन अनेकांना ते शक्य होत नाही. मग ते लिखाणाला मुकतात अन आपण एका संभाव्य वाचक/लेखकाला!
ऑनलाईन कोण आहे हे कळण्याची
ऑनलाईन कोण आहे हे कळण्याची काही सोय होऊ शकेल का? धन्यवाद !
मायबोलीवरच लिखाण - क्वालिटी
मायबोलीवरच लिखाण - क्वालिटी वाढवण्यासाठी मला सुचलेले काही उपाय
१) नाव नोंदवल्यावर लगेच लेख, कविता लिहायची परवानगी न देता काही दिवस राखुन ठेवावे. म्हणजे नाव नोंदवल्यावर १ महिन्यानंतरच (उदा.) नविन लिखाण करता येईल. तो पर्यंत फक्त वाचता, प्रतिसाद देता, वाहत्या धाग्यांवर लिहिता येईल.
२) नविन साहित्य लिहिण्याची परवानगी मिळाल्यावरही सुरुवातीला दिवसाला प्रत्येक प्रकारच एकच लिखाण टाकता येईल.
३) लिखाणाला रेटिंग ठेवावे. प्रतिसाद देता येतात ते हि तसेच ठेवावे. पण रेटींग ची सुविधा असावी.
४) या रेटिंग नुसार ऑटोमॅटिकली दिवसाचा लिखाणाचा कोटा वाढावा.
उदा. एखाद्याला एकुण १० रेटिंग मिळाले तर त्याला दिवसा २ कविता टाकता येतील वगरे अस.
याचे फायदे:
-अशा थोड्या बंधनामुळे घाईघाईत लिखाण टाकण्यापेक्षा नीट वाचुन टाकण्यात भर पडेल कारण दिवसाचा कोटा थोडाच आहे.
-त्यात इथे चांगलच टाकाव अस वाटेल. कोटा वाढवण्यासाठी चांगल लिहिणे गरजेचे असेल.
-कायम खराबच लिहिल तरी एका दिवसात इथे येणार्या खराब लिखाण संख्येवर निदान निर्बंध बसेल
ऑन्लाईन साईट जिथे कंटेंट टाकण्यावर इतर काही लिमिटेशन नसतात तिथे बर्याच वेळा दिवसाचा कोटा असा ठरवलेला अस्तो. (जनरली फोटो साईट इ. चा पॅटर्न आहे हा. पण इथेही वापरता येईल अस वाटत. )
Report Abuse ची लिंक असणे आता
Report Abuse ची लिंक असणे आता मायबोलीवर आवश्यक झाली आहे असे वाटते कारण आता पसारा एवढा वाढला आहे की अॅड्मिन नी स्वयंसेवकांना सगळीकडे लक्ष पुरवणे अवघड आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी एखादी खटकणारी पोष्ट असेल आणि तिला ५/१० वेगवेगळ्या आयडीजनी रिपोर्ट केले असेल तर ती आपोआप अदॄश्य (invisible / hide) व्हावी आणि अॅड्मिन ना त्याची सूचना जावी.
बरेचदा एखादी पाककृती कोणी
बरेचदा एखादी पाककृती कोणी लिहिली हे आठवत असतं पण कीवर्ड सर्च ने ती मिळत नाही. तर पाककृती विभागात ज्यांनी पाककृतींचे धागे उघडलेत अशा आयडीज ची लिस्ट देता येईल का. मग त्या आयडीवर क्लिक केलं की त्यांच्या सगळ्या पाककृतींची लिस्ट दिसेल असा ट्री व्ह्यू करता येईल का?
मेधा - एक सजेशन. पाककृती
मेधा - एक सजेशन. पाककृती विभागात गेल्यावर विषयवार यादी मध्ये खालीलप्रमाणे वर्गवारी दिसते
आहार विभागात खालीलप्रमाणे वर्गवारी आहे
तर विषयवार यादीत खालीलप्रमाणे वर्गीकरण दिसते
यातले काही उपयुक्त ठरेल काय?
मायबोली वरचे लोड कमी
मायबोली वरचे लोड कमी होण्यासाठी सुचलेला एक उपाय.
लिस्ट मधे जिथे लेखनाची लिंक दिसते तिथे त्या लिंक वर क्लिक केल्यावर लेखन आणि प्रतिक्रिया दोन्हि दिसते. "4 नवीन " अशा लिंक वर क्लिक केल्यावर पण लेखन सगळ लोड होत आणि प्रतिक्रिया पण लोड होतात.
त्याऐवजी "4 नवीन " अशा लिंक वर क्लिक केलं तर फक्त प्रतिक्रियाच दिसाव्यात. आणि त्याच्यावर "गे लेखन वाचा" अशी लिंक टाकावी. या लिंक वर क्लिक केल्यावर Ajax वापरुन त्याच जागि लेखन पण दाखवावे. यामुळे प्रत्येक वेळि नुसत्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी पुर्ण लेख लोड करावा लागणार नाही आणि सर्वर लोड कमी होईल.
प्रतिक्रियांच्या पुढच्या पानांवर जाण्यासाठी सुद्धा वरचा उपाय वापरता येईल त्या मुळे पुढच्या पानावरच्या प्रतिक्रिया वाचताना, लेखन पुर्ण लोड करावे लागणार नाही.
'नवीन लेखन' मध्ये 'साहित्य
'नवीन लेखन' मध्ये 'साहित्य प्रकार' या उभ्या रकान्यात फक्त गुलमोहरातल्या लेखनाचाच प्रकार दिसतो. पण हितगुजमधले लेखनाचे धागे (ले.धा.) किंवा गप्पांचे पान (ग.पा.) किंवा मग रंगीबेरंगी पान वगैरे लेखन प्रकार यासाठी हा रकाना रिकामा दिसतो. हितगूज मध्ये 'लेखन प्रकार' म्हणून एक रकाना दिसतो त्यात बघून ग.पा. आहे की ले.धा. हे कळते. त्यामुळे होते काय की 'नवीन लेखन' मध्ये काही नवीन बा.फ. आल्यास त्या त्या ग्रूप मध्ये जाऊन पाहिल्याशिवाय कळतच नाही की ग.पा. आहे की ले.धा. आहे.
तर 'नवीन लेखन' मध्ये 'साहित्य/लेखन प्रकार' अशा शीर्षकाचा रकाना ठेवून त्यात योग्य तो साहित्य अथवा लेखन प्रकार दाखवता येणे शक्य होईल काय????
मी गेले एक वर्षे फेसबुक हि
मी गेले एक वर्षे फेसबुक हि सोशल नेटवर्किंग साईट वापरतो आहे. तेथील फिचर्स नुसार मायबोली ने ही काही बदल करावेत असे वाटते. तेथील 'लाईक' आणि 'इव्हेंट' (आर एस व्ही पी) प्रकार मायबोलीवर आल्याचे लक्षात आले आहे. धन्यवाद!
आर एस व्ही पी मध्ये 'मे बी अटेंडिंग' ची सोय आपल्याकडे करता येईल का? म्हणजे जे, रेषेवरचे आहेत, त्यांना सोयीचे!
प्रत्येक ग्रूपमधले काही धागे
प्रत्येक ग्रूपमधले काही धागे सार्वजनिक तर काही धागे फक्त ग्रूपपुरते मर्यादित असतात. ते चटकन ओळखू येण्यासाठी धाग्याचे शीर्षक वेगवेगळ्या रंगात दाखवता येईल का?
सध्या नवीन लेखन किंवा त्या त्या ग्रूपमध्ये गेल्यावर दिसणार्या यादीत सगळे धागे निळ्या रंगात दिसतात त्याऐवजी सार्वजनिक धागे निळ्यात आणि ग्रूपपुरते मर्यादित हिरव्या किंवा दुसर्या एखाद्या रंगात.
हे सुचवण्याचे कारण हे की संयुक्ता/मराठी उद्योजक सारख्या ग्रूपमध्ये जिथे फक्त ठराविक लोकांनाच प्रवेश आहे तिथे कधी कधी तो धागा सार्वजनिक आहे हे लक्षात न घेता वैयक्तीक माहिती लिहीली जाते, बरेचदा लोक नंतर पोस्ट एडीट करतात पण जर धागा दिसतांनाच जर रंग कळला तर लिहीणार्यांना सोईचे होईल.
अजुन एक सुचना, मायबोलीवर कोणी
अजुन एक सुचना, मायबोलीवर कोणी विचारपूस इमेलने मिळवण्याचे ठरवले असेल तर इमेलमधे मिळालेली विचारपून नक्की कोणी केली आहे ते कळत नाही. ते पहाण्यासाठी मायबोलीवरच यावे लागते. इमेलमधे आयडीचे नाव तरी कळाले तरी बरे पडेल.
याचा जास्त उपयोग कोणत्याही कार्यक्रमाचे संयोजक वगैरेना होईल. आम्हाला गणेशोत्सवाच्यावेळी हे खुप जाणवले होते.
आहारशास्त्र मधे विषयवार खुणा
आहारशास्त्र मधे विषयवार खुणा जवळ जवळ २००० आहेत. खानदेश, खांदेश, खान्देश किंवा लोणचे, लोणचं यातली नक्की खूण वापरली आहे ते शोधायचं असेल तर पानामागून पाने स्क्रोल करण्यावाचून पर्याय नाही . त्या खुणांच्या पानावर अ ते ज्ञ अशा लिंक्स देता येतील का ?
मला वाटते माझ्या रंगीबेरंगी
मला वाटते माझ्या रंगीबेरंगी पानावर मी एकदा संपूर्ण म्हणून प्रकाशित केले तर ते मला संपादित करता येत नाही, तसे असेल तर त्याबद्दल काही करता येईल का?
तसेच माझे रंगीबेरंगी पान असेल तर त्यावर कुणि काही लिहीलेले उडवून टाकण्याचा मला तरी अधिकार हवा, नाहीतर उगाचच पानाची लांबी वाढत जाते, नि एव्हढी जागा खाण्याच्या लायकीचे निदान माझ्या लिखाणात तरी मला काही आढळत नाही!
खरे तर मी आजच तुम्हाला विनंति केली आहे माझे सध्याचे पान उडवून द्या. त्यात काहीहि जपून ठेवण्यासारखे नाही. नवीन पानावर काहीतरी चांगले लिहीन म्हणतो (म्हणजे 'तरहि' गझला वगैरे??!!
बापरे.)
झक्की संपादन हा पर्याय आहे ना
झक्की संपादन हा पर्याय आहे ना प्रत्येक लिखाणाच्या डोक्यावर. तुम्हाला स्वतःचे लिहीलेले लेखन अथवा प्रतिसाद संपादित करता येतील. इतरांनी लिहीलेले नाही. ते तसेच रहातील.
पण रंगीबेरंगी पानावर येते का?
पण रंगीबेरंगी पानावर येते का? मला जमले नाही. नाहीतर एव्हढी बोंबाबोंब होण्यापूर्वीच मी माझा लेख संपादित करून जरा तुमच्यासारख्या लोकांना विचारून चांगल्या शब्दात, नि चांगल्या रीतीने लिहीणार होतो. जाउ दे झाले, आता उडवून टाका माझे पान, मग नवीन सुरुवात!
ते हसणारे, डोळा मारणारे, दात
ते हसणारे, डोळा मारणारे, दात विचकणारे, रागावलेले, दु:खी झालेले, असे निरनिराले चेहेरे पटकन टकता येण्यासाठी कुठेतरी अश्या ठिकाणी ठेवता येईल का की जिथून पटकन उचलून, लिहीता लिहिता मधेच टाकता येतील?
आज तरी मी शोध शोध शोधून मला कुठे सापडले नाहीत. निदान मायबोलीवरील अनेक धाग्यात एक धागा त्यांचा करावा, जिथे ते लवकर सापडतील.
त्याचबरोबर काही नवीन चेहेरे तयार करावेत अशीहि सूचना मागे आली होती, तसे चेहेरे कुणाला तयार करता येतात का?
धन्यवाद.
गुगल क्रोममध्ये मायबोलिवर
गुगल क्रोममध्ये मायबोलिवर मला लिहायला त्रास होतो
ultimatebipin कशा प्रकारचा
ultimatebipin कशा प्रकारचा त्रास होतो? क्रोममध्ये अक्षरे खोडताना, बॅकस्पेस वापरून चालत नाही. त्यासाठी, जिथे खोडायचे आहे तिथे कर्सर नेउन स्पेसबार द्या आणि मग डिलीट वापरून खोडले असता, अगम्य अक्षरे उमटत नाहीत. असा माझा अनुभव आहे.
जिथे खोडायचे आहे तिथे कर्सर
जिथे खोडायचे आहे तिथे कर्सर नेउन स्पेसबार द्या आणि मग डिलीट वापरून खोडले असता, अगम्य अक्षरे उमटत नाहीत. असा माझा अनुभव आहे. >>> हो मी पण असंच करते.
नवीन मायबोली: असे सुधारता
नवीन मायबोली: असे सुधारता येईल>>>हा सल्ला देण्याएवढ मला कळत का ते ठाऊक नाही, पण कालपासून या जाहिराती डोक्यावर बसल्या आहेत असं वाटतय इथे का त्या जाहिराती? हेडरच्या वरतीच होत्या ते बरं होतं की.
गुलमोहर मधे खालील विभाग सुरू
गुलमोहर मधे खालील विभाग सुरू करता येतील का ?
१. स्फुट
२. संवादिका
३. एकांकिका
४. नाटक / नाटिका / पथनाट्य
५. मुक्तक
नवीन आय डी येऊन धुमाकूळ
नवीन आय डी येऊन धुमाकूळ घालतात.. त्यावर उपाय म्हणजे धागा हा ज्या प्रमाणे सार्वजनिक अथवा ग्रुपचा असतो, त्याप्र्माणेच सर्वाना किंवा फक्त जुन्या लोकाना असे ऑप्शन ठेवावेत. सहा महिने होऊन गेलेत तो म्हणजे जुना सदस्य.. यामुळे रोज रोज उगवणार्या आय डी ना टाळता येईल.
-मांजर ( दोन दिवस झाले येऊन)
कशा प्रकारचा त्रास होतो?
कशा प्रकारचा त्रास होतो? क्रोममध्ये अक्षरे खोडताना, बॅकस्पेस वापरून चालत नाही. त्यासाठी, जिथे खोडायचे आहे तिथे कर्सर नेउन स्पेसबार द्या आणि मग डिलीट वापरून खोडले असता, अगम्य अक्षरे उमटत नाहीत. असा माझा अनुभव आहे. >>>>>>>>>>>> त्यापेक्षा EPIC BROWSER वापरा........... त्यात काही ही प्रोब्लेम नाही होत
नाटक अथवा एखाद्या स्टोरीची
नाटक अथवा एखाद्या स्टोरीची स्क्रिप्टरायटिंग (पटकथा) लिहिण्या करिता कोणता विभाग चालु करता आला तर...
इथे असणारे लेखक यांचीच कथा घेउन ... तिची पटकथा बनवण्यास प्रोत्साहन मिळेल असा काही उपक्रम बनवला तर फार जणांना तिचा लाभ सुध्दा होईल......बरेच जणांना अनुभव सुध्दा मिळेल.
अनेकानेक पानं असलेल्या मोठ्या
अनेकानेक पानं असलेल्या मोठ्या मोठ्या बाफांवर त्या बाफांतर्गत शब्द शोधण्याची सोय हवी असं वाटतं.
आहारशास्त्र ग्रुपची लिंक वर
आहारशास्त्र ग्रुपची लिंक वर असावी असं मला वाटतं. दरवेळेस.आधी पहिल्या पानावर आहे का ग्रुप ते शोधा नसेल तर हितगुज, मग खाली स्क्रोल करा, मग पुढे पाकृ शोधा. पाक्रुमधील शोध तर अवघड्च आहे, निदान तिथपर्यंत जाणे सोपे होइल.
आहारशास्त्र ग्रुपची लिंक वर
आहारशास्त्र ग्रुपची लिंक वर असावी असं मला वाटतं. दरवेळेस.आधी पहिल्या पानावर आहे का ग्रुप ते शोधा नसेल तर हितगुज, मग खाली स्क्रोल करा, मग पुढे पाकृ शोधा. पाक्रुमधील शोध तर अवघड्च आहे, निदान तिथपर्यंत जाणे सोपे होइल.<< +१
-------(खादड) विज्या
अनेकानेक पानं असलेल्या मोठ्या
अनेकानेक पानं असलेल्या मोठ्या मोठ्या बाफांवर त्या बाफांतर्गत शब्द शोधण्याची सोय हवी असं वाटतं.<<<
+१
गझला आणि तरहींसाठी वेगळा क्लोज्ड ग्रुप हवा. आणि त्या ग्रुपात धागे सार्वजनिक करण्याची सुविधा असू नये.
ठराविक आयडींचे लिखाण सबस्क्राइब करण्याची सोय हवी. त्यातही त्या त्या आयडींच्या लिखाणाच्या प्रकारात चॉइस मिळाला तर फारच उत्तम.
आहारशास्त्र व पाकृ मधे पाकृ
आहारशास्त्र व पाकृ मधे पाकृ टाकताना मूळ किंवा महत्वाचा घटक असा एक विभाग असावा. आणि त्यात लिहिलेला घटक हा कीवर्ड मधे धरला जावा. विषयवार यादी मधे महत्वाचा घटक असाही भाग असावा. जेणेकरून एका वस्तूच्या विविध पदार्थांची यादी एकत्र मिळेल.
उदाहरणार्थ: वांग्याची भाजी असेल तर महत्वाचा घटक यामधे वांगे असे लिहिले जाईल. बाब गनोश मधेही महत्वाचा घटक वांगे लिहिला जाईल. मग जेव्हा नी कडे वांगीच वांगी मुबलक असतील तेव्हा नी वांगे या घटकपदार्थावरून वांगे महोत्सव करू शकेल
हेच विविध सगळ्या भाज्या, पिठे, डाळी, मासे, कोंबडी, बकरे यांच्याबद्दल करता येईल.
येईल का?
<अनेकानेक पानं असलेल्या
<अनेकानेक पानं असलेल्या मोठ्या मोठ्या बाफांवर त्या बाफांतर्गत शब्द शोधण्याची सोय हवी असं वाटतं.>
एका पानावर तो शब्द आहे का हे control F वापरून शोधता येतंय. तो शब्द आधीच कुठूनतरी देवनागरीत टाइप करून क्लिअबोर्डवर ठेवायचा.
Pages