राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या बागेची उलटी गंगा आहे..... लोक रास सांगून स्वभाव विचारतायत... ही स्वभाव सांगून रास विचारतेय...... आता लिंबूदा हिचे नक्षत्र ओळखून दाखवा Proud

खरं तर मायबोलीवरच्या पोस्ट्स, या थोड्याश्या शिष्ट्पणे (म्हणजे डिप्लोमॅटिकली. बरोबर आहे ना शब्द ?) लिहिलेल्या असतात. पण एकादी प्रत्यक्ष भेट, किंवा एखादा संवाद, त्या सभासदाबद्दल बरेच काही सांगून जातो.
हा अनुभव मी अनेक मायबोलीकरांच्या बाबतीत घेतला आहे.
खरं तर कुठलाच स्वभाव म्हणजे कुठलीच रास वाईट असे नाही. फक्त तूम्ही त्या व्यक्तीशी कसे वागायचे, हे तूमचे तूम्ही ठरवायचे असते. आणि तेही तूमच्या स्वभावानुसारच ना !

अगदी साधा मुद्दा. मला दिलेली वेळ पाळणे, हे अतिशय महत्वाचे वाटते. (हा अनुभव माझ्याबाबतीत अनेकांनी घेतला असेल.) पण एखादा मित्र वेळेबाबत तितका काटेकोर नसतो. आणि हे जर मला आधीच माहित असेल, तर माझी चिडचिड होत नाही.

अनेकांना निवड करणे जमत नाही. मला ते सहज जमते. हॉटेलमधे गेल्यावर काय मागवायचे, याचा निर्णय करु न शकणारा सोबती असेल, तर त्याच्या वतीने (अर्थातच त्याची आवड निवड लक्षात ठेवून ) हा निर्णय मी घेऊन टाकतो. आणि त्या सोबत्याच्या मनावरचे दडपण क्षणात दूर होते. आपण निर्णय घेऊ शकत नाही, याची कल्पना त्याला असतेच.

> मला नाही वाटत राशीवरुन तुमचा व्यवसाय ठरत असेल ..

असतेच तसे! म्हणून तर म्हणतात की स्त्रीचे वय व ज्योतिषाची रास विचारु नये - १२ पैकी ११ चूकीचे असतात. प्रॉब्लेम हा आहे की १२ पैकी एक कोणती रास योग्य याबद्दल बाराही ज्युरी अजुन भांडताहेत.

aschig Lol Proud

व्रुश्चिक राशिला नाहक बद्नाम केले गेले आहे. नांगी मारतात असे. ते खरे परिवारावर प्रेम करणारे असत्तात. परिवाराला प्रोटेक्ट करणेसाठि ते इतरान्पासून फटकून असतात.
कन्यालाही संशै म्हणून लेबल केलेले चुक आहे. संशय सगळेच घेतात. कन्या उलटे संशयावर मात करून पर्फेक्शन कडे जाते.
तुलाला आणि चढ्वोन ठेवलेले आहे. इतक्या काहि बेलन्स्ड नसतात. राग त्यांनाही येतो. ते सगळे काही साधू नसतात.
कुम्भ कमी दिसतात.

>>>> आता माझ्याविषयी - मी आणि बायकोचं षडाष्टक योग (प्रीती) आहे. माझी राशी - कर्क (आश्लेशा) चंद्ररास, सिंह - लग्न रास, मीन - सूर्यरास.. बायकोची राशी - धनु (पूर्वाषाढ) - चंद्ररास, मिथून - लग्न रास, वृश्चिक - सूर्यरास
-चला ओळखा स्वभाव! झंपीताई/ लिंबूदादा/ दिनेशदा/ मास्तुरेजी आणि नवोदित

तुमच्या घरी तुमच्या सौं.कडे सर्वाधिकार असणार. म्हणजे ते अधिकार त्यांनी खेचून घेतले असणार. सर्व निर्णय सौ.च घेणार. तुम्ही फक्त "मम" म्हणायचं. Biggrin

तुमच्या (म्हणजे कर्क + सिंह) देवभोळेपणाला, सात्विकतेला, शांत स्वभावाला व सज्जनपणाला तुमच्या सौं.चे (धनू + मिथुन) भक्कम संरक्षक कवच आहे. त्यामुळे तुमच्या सौ. कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देणार नाहीत. कर्क नवरे अगदी आनंदाने व स्वखुषीने 'धनू+मिथुन' असलेल्या बायकोच्या मुठीत राहतात. ह्या जोडीचा संसार सुखाचा होतो. Happy

>>> मकर-वृश्चिक काँम्बीनेशनबद्दलही सांगा

जबरदस्त कॉम्बिनेशन!

मकर अतिशय कठोर परिश्रम करणारी, दीर्घोद्योगी, ध्येयावर लक्ष ठेवून वाटचाल करणारी पण काहीशी अरसिक आणि वृश्चिक म्हणजे प्रचंड आत्मविश्वास असणारी, कठोर, 'अरे' ला लगेच 'कारे' म्हणणारी! कोमलता, शांतपणा, रसिकता इ. दोन्ही राशीत कमी प्रमाणात असतात.

>>> मी वृषभ आणि माझा नवरा तुळ..
खूपच छान कॉम्बिनेशन आहे हे. दोन्ही शुक्राच्या राशी. एकीकडे रसिकता तर दुसरीकडे कलाप्रियता असते.>> धन्यवाद, मास्तरजी

नुसते धन्यवाद नको. सांगितलेलं पटतंय का की काही चुकीचं सांगतोय ते सांगा. Happy

>>> तुमच्या राशीवरुन जर तुमचा व्यवसाय ठरत असेल तर सर्व ज्योतीषी एकाच राशीचे का?

बरेचसे ज्योतिषी वृश्चिक, धनू किंवा मीन राशीचे आढळतात.

मीन राशी ज्योतिषी ( निर्णय क्षमता कमी असते असे वाचून आहे त्यावरून ) - तुम्ही लग्न करा किंवा मग नका करु . . नै नै करा करा गुण जुळतायत .. फक्त शडाष्टक आहे .. थोड्या थोड्या कूरबूरी होतील . . कडाक्याचे भांडू नका . . . self-control जमत नसेल तर मग नका करू .. . मग काय करताय ?? ... <<दिवे घ्या . कोणाला नेम धरून नाही लिहिले>>

लिंबूदा आणि मास्तुरे

लई धन्यवाद!! बहुतेक सर्व मते पटली आपली मकर, सिंह आणि वृश्चिकबद्दलची!

मुलग्याची रास मेष आहे... मेषवाली मुलं मुलींमध्ये लोकप्रिय असतात म्हणे :फिदी:....

मेषवाली मुलं मुलींमध्ये लोकप्रिय असतात म्हणे >> हो असे मि मझ्या मित्र्-मैत्रिणिंच्या ग्रुप वरून म्हणू शकतो Happy

मी वृषभ आणि नवरा तूळ ........ !!

मास्तुरे........ तुम्ही जे लिहिलंय ते अगदी तंतोतंत खरंय Happy

निंबुडा ......... तू अगदी माझंच वर्णन लिहिलंस असं वाटलं.

बागेश्री........ सेम पिंच Happy पण माफ करणं अशक्य असं जे तू लिहिलं आहेस.......... ते मात्र माझ्या बाबतीत खरं नाही. मी सहज माफ करु शकते कोणालाही Wink

मी वृषभ आणि नवरा तूळ ........ !!
मास्तुरे........ तुम्ही जे लिहिलंय ते अगदी तंतोतंत खरंय>> हो मास्तुरेजी, खरेच खरे आहे Happy

ते मात्र माझ्या बाबतीत खरं नाही. मी सहज माफ करु शकते कोणालाही >> अरे, ह्या वाक्यानंतर : डोमा :.. नक्की काय समजावे, जयश्रीजी Wink आणि माफ करण्याबद्दल नव्हते म्हणाले मी, फक्त गमावलेला कम्फर्ट पुन्हा मिळवणं मला जड जातं, असे म्हणालेय, माफ करून जातेच पुढे Wink

माफी के लिये शुक्रिया बागेश्री Wink

आणि आता अर्थ......... मी त्या व्यक्तीशी तितक्याच सहजतेने आणि विश्वासाने वागते. त्यामुळे कधी कधी मला गृहीतही धरल्या जातं Sad

अ‍ॅक्चूली, जयश्रीजी..
कटू अनुभव आले की ठोकताळे बदलतातच.. त्यातलाच भाग, बदललेले ठोकताळे Happy

आणि माफ करण्याबद्दल नव्हते म्हणाले मी, फक्त गमावलेला कम्फर्ट पुन्हा मिळवणं मला जड जातं, असे म्हणालेय, >>> अगदी अगदी! बागे! तू पण वृषभच का? वा वा! Happy

हो Happy

सानी एकदा काय ते ठरव..... एकदा म्हणते माझ्या घरी नास्तिक म्हणून माझी कुंडलीच नाही..... एकदा म्हणते वृषभ...... हा पण असा वृषभेचाच गुण की काय Proud

>>आणि माफ करण्याबद्दल नव्हते म्हणाले मी, फक्त गमावलेला कम्फर्ट पुन्हा मिळवणं मला जड जातं, असे म्हणालेय, >>> अगदी अगदी! बागे! तू पण वृषभच का? वा वा!

उशीतून कापूस बाहेर आला की तो परत आत टाकत नाहीत ते आठवलं Wink Proud Rofl

Pages