राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?


Submit to kanokani.com

अहो मी "बदली"च्या गडबडीत अन टेन्शन मधे आहे. नन्तर सवडीने लिहीन. तोवर दिनेशभौ,मास्तुरेदिकान्नी खिन्ड लढवू दे ना प्लिज! स्मित

अरे तारखा काय टाकताय! सरासरी ८०-८५ वय देते ती साईट बहुतेक.

आता अनायासे इथे तारखा टाकलेल्या बायकांची वयं ओळखता येतील इच्छुकांना.. फिदीफिदी

फचिन अनुमोडन.....

माझी २०६१ आलिये फिदीफिदी
आता बसा वय ओळखत.

आता मी आहे का नाही, हाच मला प्रश्न पडलाय !!

म्हणजे मी स्गळ्यात लहान झाले की आता! फिदीफिदी

>>>>>> माझी तारीख २२ ऑगस्ट १९४५ आलीय !!! बाप्रे !!!

>>>>>> दिनेशदा, ती तारीख तुमच्या मागच्या जन्मातल्या शेवटच्या दिवसाची असणार. स्मित म्हणजे दोन जन्मांच्या दरम्यान तुम्ही बरीच लांबलचक सॅबॅटिकल घेतली होती की. तरीच तुम्हाला या जन्मात एवढा उत्साह!!!! फिदीफिदी

माझी तारीख २२ ऑगस्ट १९४५ आलीय !!! बाप्रे !!!>>>>>>>.
पळु नका. हे भुत प्रेमळ आहे.
प्रेमाने चार घास चांगल करुन देइल खायला. स्मित

असेल, असेल. मधले जन्म नक्कीच किड्यामुंग्यांचे असतील. तरीच मला या जन्मी, झाडांनी झपाटलेय.

पळु नका. हे भुत प्रेमळ आहे.
प्रेमाने चार घास चांगल करुन देइल खायला. )))))) बरोबर.......

तुमचे महानिर्वाण कधी होणार याची इथेसुद्धा तारीख दिसते.

http://www.deathclock.com/

या संकेतस्थळानुसार मी २०३८ मध्ये गचकणार आहे.

खालील संकेतस्थळात तुम्ही मागच्या जन्मात कोण होता याचे गुपित उघड केलेले आहे.

http://www.thebigview.com/pastlife/

वर दिनेशदांनी दिलेल्या संकेतस्थळानुसार मी २०४१ मध्ये धारातिर्थी पडणार आहे. म्हणजे माझ्याकडे अजून किमान २५ वर्षे आहेत. स्मित

बास झाले आता ..शुभ बोला आता ..! स्मित

जुनी मायबोली उदा. भविष्य वगैरे नीट वाचले तर राशी स्वभाव कळतीलच की.

राज ठाकरे मिथुन चे तर नारायण राणे हे वृश्चिकेचे आहेत. शरद पवारान्ची मेष रास अन वृश्चीक लग्न आहे, षष्ठ स्थानात मेषेत चंद्र गुरु युती आहे, षष्ठातील गुरु पडद्यामागचे राजकारन दाखवतो. मग कळले ना शरदाचे चांदणे कसे आहे ते?

दिनेश चंद्र राशी पेक्षा लग्न राशी महत्वाची. म्हणून तुमचा स्वभाव मऊ आहे. पन चिकीत्सक तेवढेच आहात की नाही?

लिम्बुची मिथुन रास ना? लै मज्जा

हल्लु हल्लु सांगेनच सगले. तवर आपली रजा. हां, उपाध्ये गुरुन्ची रास धनु आहे, हे त्यांनी मी मराठी वर सांगीतले आहे.

>>> राज ठाकरे मिथुन चे

म्हणूनच राज ठाकरे बोलायला अतिशय शार्प आहे.

>>> तर नारायण राणे हे वृश्चिकेचे आहेत.

सूडबुद्धी, खुनशी स्वभाव, डूख धरणे इ. लगेच लक्षात येते

>>> शरद पवारान्ची मेष रास अन वृश्चीक लग्न आहे,

बापरे! 'मेष + वृश्चिक' हे खतरनाक कॉम्बिनेशन आहे.

माझी चंद्ररास मेष, sun sign Pisces, शुक्र उच्चीचा, लग्न रास मीन, आता सांगा फिदीफिदी

कालच पुण्यात अंनिसने जन्म्पत्रिकेंची होळी केली.

काहीच्या काही मजा चाललीये! माझी रास मेष. इथे पण दिसतच असेल.. फटकळपणा जात नाही. कुठले मणी घालावे? अ ओ, आता काय करायचं फिदीफिदी सौररास धनु. दोन्ही "फायर" तत्वाच्या राशी ना? असं काहीतरी लिंडा गुडमनने सांगितलं होतं स्मित

जी जी स्वभाववैशिष्ट्ये चांगली म्हणून समजली जातात, ती माझ्यात आहेत असं मला वाटतं. आता माझी रास सांगा बघू खो खो

माणसाने कृष्णासारखे असावे. आधुनिक काळात शरद पवारांसारखे. सार्वजनिक जीवनात किंवा जालावर लोक स्वतःला जसे प्रेझेंट करतात तसे ते नसतात. आहे तसं स्वतःला प्रेझेंट करणे आणि त्याचा अभिमान धरणे यात काही काळाने बदल आवश्यक वाटू लागतात.

युरी गागारीन अगदी अगदी माझ्या मनातलेच बोललात, पण शरद पवार नाही हं, मी कृष्णाबद्दल बोलतेय.
नताशा मोती वापरुन बघ.

चिमेघ अहो लग्नी उच्चीचा शुक्र अन धनात चंद्र मग देखणेपणाबद्दल काय बोलणार? हो ना?

पण अष्टमेश लग्नी तेव्हा तब्येतिची काळजी घ्या,( अती काळजी करु नका )

एकादि वाइत व्यक्ति भेतलि तर तिला सुदारन्याचाअ प्रयत्न करते.
लोकान्च्या वाग्नुकित बदल होइल याचि वात बघते
एकदम मत बनवत नाहि
मत बनवा तरि त्यात बदल करायचि तयारि अस्ते
तोल्याला टोला द्यायला आवदतं. आनि विसरुन जायला पन
मित्र-मैत्रिनिंच्या चुक सांगुन मोकलि होते.

माझि रास कोन्ति आहे ?

बहुत्येक भ्र.म.नि. असावी.

एक राहिलं

आधि खुप फतकल होते. मला तो माजा स्पश्तवकेपना वातायचा. आमच्या इकदे एक मुलगा होता. तो हि स्पश्तवक्ता होता. पन तो बोलायचा कमि. एकाद्याचा पॉइन्त नाहि आवदला कि सरल त्याचि धुलाइ कराय्चा. अगदि खालि पादुन मारायचा.
एक मैत्रिन होति ति शान्तपने आपला विरोध सान्गायचि. तेव्हा मला कल्ल कि स्पश्तवक्तेपना आनि आक्रस्तालेपना यात काय फर्क आहे.
आता तशि रा।इलि नाही.

भ्र.म.नि.
म्हन्जे ?

माणसाप्रमाणेच आयडीची पण जन्मवेळ असते. त्या जन्मवेळेप्रमाणे पत्रिका मांडून त्या आयडीचे स्वभावविशेष जाणून घेता येतील (का?) वर एक अगदी ताज्या अर्भकाचा प्रतिसाद आहे. त्याची रास काढाच कुणीतरी.
एकाच व्यक्तीच्या भिन्ना आयडीचे स्वभावगुणही भिन्न असतात. नाही का?

तुम्हिच सान्गा

भ्रमनि-रास फिदीफिदी

मयेकर. हा पैलाच आय्दि आहे माजा
बागुलबुवा -असि रास नस्ते हो.

तूम्ही घेण्यापूर्वी अय्या हा आयडीही नव्हता हो. आता आहे की नाही ?

इश्श