प्रकाशचित्र"गीत" — ४

Submitted by जिप्सी on 23 January, 2011 - 23:40

हा चंद्र तुझ्यासाठी हि रात तुझ्यासाठी
आरास हि ता-यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अश्या वेळी मज याद तुझी आली
येना... ओव्हरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहारू दे
नाव तुझे माझ्या ओठांवर येते फुल जसे कि फुलताना दरवळते
इतके मज कळते अधुरा मी येथे चंद रात हि बघ निसटून जाते
बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला

हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे विलगुनीया तू मजला ते ऐकावे
होउन कारंजे उसळी मन माझे पाउल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला दे आता हाक मला

स्वर : स्वप्नील बांदोडकर

=================================================
=================================================
वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजूबाजूच्या पानांनी, वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग, मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे, बावरी तनू

द-यांतुनी आनंदला, पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो ग, गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग, इंद्राचे धनू

स्वर - सुमन कल्याणपूर

=================================================
=================================================
दीप लाविले ज्योती गाती, शुभंकरोती बोल रंगती
जा रे जा रे मना माझिया माहेरा....

मायमाऊली ओवी गाई, गायने रंगुनी सुर ग राहिले
स्मृती हासती डोळ्यामधुनी, दर्पणे दिसत असे घर सानुले
अशाच वेळी माझ्या भोवती
दीप लाविले..........

दिवा आकाशी खुण सांगतो पाहुनी थांबती पाऊली काय गं
ओट्यावरती बालपणीचे खेळते स्वप्न का सारखे सांग गं
अशाच वेळी माझ्या भोवती
दीप लाविले..........

स्वरः सुमन कल्याणपूर


=================================================
=================================================

का हासला किनारा पाहुनी धुंद लाट
पाहुनिया नभाला का हासली पहाट

होती समोर माया गंभीर सागराची
संगीतमय मनाचे किलबिल पाखरांची
काठावरी उभी मी तो न्याहळीत पाठ
का हासला किनारा पाहुनी धुंद लाट........

चाहुल जाणीवेची स्पर्शातुनी गळाली
भारावलेल्या कळीला जणु पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात
का हासला किनारा पाहुनी धुंद लाट......

स्वर: अनुराधा पौडवाल

=================================================
=================================================वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी
पल्याड माझं गाव रे मला पोचीव घरा

आज रात पुनवेची गाणं गात नाचायची
आयली भरती समिंदरा.....

चारी दिशा रंगलेलं आभाळ हे निळ निळ
चांदण्याच्या मेळाव्यात चांदराजा आज फुलं
लाटासवे ताल धरी शिडामंदी वारा
वार्‍यासंगे मन जाई माझिया माहेरा
वल्हव वल्हव रे........

घर माझं सोन्यावाणी नाही मला काही कमी
भाग्य माझं साधंभोळं आज अमृतात न्हालं
देवाजीची किरपा झाली आयली लक्ष्मी घरा
सर्वसुखी आनंदाचा तुच रे निवारा
वल्हव वल्हव रे........

स्वरः सुमन कल्याणपूर

=================================================
=================================================
प्रकाश"चित्रगीत" – नाविका चल तेथे . . .
http://www.maayboli.com/node/22470

प्रकाश"चित्रगीत" – २
http://www.maayboli.com/node/22535

प्रकाशचित्र"गीत" – ३
http://www.maayboli.com/node/22708

गुलमोहर: 

दिव्यांसाठी मला, तबकामधे इथे तेविती निरांजनाच्या वाती आवडलं असतं, पण इथे पणत्या आहेत.
काल साहित्य संघात सुमन कल्याणपूरच्या गाण्यांचा कार्यक्रम होता, तूला एस एम एस केला होता, गेला होतास का ?

प्रतिसादाबद्दल धन्स Happy

काल साहित्य संघात सुमन कल्याणपूरच्या गाण्यांचा कार्यक्रम होता, तूला एस एम एस केला होता, गेला होतास का ?>>>>>दिनेशदा, तुमचा एस एम एस मिळाला तेंव्हा मी राजमाचीला होतो. Sad जर आधी माहिती असते तर खास या कार्यक्रमासाठी राजमाचीला जाणे रद्द केले असते.
२८ जानेवारीला सुमनजींचा वाढदिवस असतो. तेंव्हा एखादा असाच कार्यक्रम असण्याची शक्यता असेल. Happy

मस्त रे एकदम..

ती स्वप्नातली वाट पाहुन एकदम आंबोलीचा घाटच आठवला.. तिथलाच आहे फोटो बहुतेक Happy

शेवटचे गाणे आवडले पण होडीत एखादी कोळीणही पाहिजे होती Happy

ह्म्म्म.. आंबोलीचा फोटो कुठल्याही अँगलमधुन ओळखुन दाखवेन मी.. इतकी डोक्यात बसलीय आंबोली. हा फोटो पाहिल्याबरोबर तो परिसर डोळ्यासमोर आला. माझ्या स्वप्नातली वाट तिथेच संपते ना.. Happy

चंद्र पण छान आहे, कालचा फोटो आहे काय?? काल असाच होता चंद्र..

चंद्र पण छान आहे, कालचा फोटो आहे काय?? काल असाच होता चंद्र..>>>>होय साधना कालचाच फोटो आहे Happy राजमाचीवरून काढला आहे. Happy

योगेश, कधीतरी गगनबावड्याच्या गगगगिरी गडावर जा. तिथे काही अशी वळणे आहेत. (मला तो फोटो तिथलाच वाटला होता) करुळ घाटाच्या पायथ्याशी, पावसाळ्यात मोठा धबधबा असतो. कोल्हापूर-वैभववाडी रस्त्यावर नापणे धबधबा लागेल. गगनबावड्याहून, भूई बावडा मार्गे, खारेपाटणला उतरलास तर तिथे एक नदीचा मस्त चंद्राकार झालाय. या सगळ्या जागा, एख्याद्या गाण्याचा विषय होतील.

व्वा मित्रा खुपच छान!!! आणि तो चन्द्राचा प्रची. तर सुरेखच रे !!!!.....आणि हो मि मराठीत टाय्पीन्ग करायला शीकलो मायबोलीवर.

व्वा.. क्या बात है!!!!!!!!!! तुझ्यामुळे माझं मराठी गाण्यांचं ज्ञान बरंच वाढलंय रे Happy

योगेश२४ , लेट्स टेक अ ब्रेक फॉर अ लॉन्गड्राईव्ह अ‍ॅडव्हेंचर !

अर्थात तुझी प्रकाशचित्रे अफाट असतात त्याबद्दल वादच नाही. पण अपेक्षा उंचावल्या आहेस तू तेव्हा हि सिरीज आणखी एका गुढ वळणांच्या गाण्यांवर नेऊन सोडेल हि आणखी एक अपेक्षा.

कारण तुझ्या "तपश्चर्येला" माझा नित्याचा सलाम आहे मित्रा.

मनापासुन धन्स नादखुळा Happy

खरंतर या पुढची हि सिरीज हि अंतिम असणार आहे. Happy

कारण मला स्वतःलाच कुठेतरी थोडासा तोचतोचपणा जाणवत आहे. त्यामुळे पुढचा भाग शेवटचा असणार. Happy माझ्या इतर थीमप्रमाणे काहितरी वेगळं सादर करायचं आहे, पण सध्या कामाच्या व्यापात सुचत नाही/जमत नाही. Sad

Pages