लक्ष्मीकांत प्यारेलाल

हँसता हुआ नुरानी चेहरा - लक्ष्मीकांत

Submitted by टवाळ - एकमेव on 25 May, 2012 - 01:02

सन १९७२-७३ ची गोष्ट. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमधे "वचन" या चित्रपटाच्या गाण्यांचे (कैसी पडी मार) रेकॉर्डींग चालले होते. फावल्या वेळात संगीतकार शंकर (एस्.जे.) हे एका निवांत जागी पान जमवत बसले होते. भोवती शारदा आणि ईतर गोतावळा होताच. ईतक्यात मशहूर ट्रंपेटवादक पं. रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजींचे वडील) तिथे आले. शंकर-जयकिशन (जयकिशन तोपर्यंत हे जग सोडून गेले होते) हे ईंडस्ट्रीतल्या बर्‍याच जणांचे श्रद्धास्थान. त्यामुळे सहाजिकच शंकरजीना बघून ते थांबले. नमस्कार्-चमत्कार झाले. बोलता-बोलता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विषय निघाला. शंकरजींच्या आजूबाजूचे चमचे (शारदा सकट) अकारण कुचेष्टा करण्यात रमले.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लक्ष्मीकांत प्यारेलाल