नेवैद्य

बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 15:51

गणपती बाप्पाच्या प्रसादाची एक आगळीच मजा असते. विशेषत: मंडळाचा अथवा सोसायटीचा गणपती असेल तर रोजचा प्रसाद म्हणजे उत्सुकतेचा विषय. एखाद्या सुगरण काकू असतात ज्या अगदी कल्पकतेने दरवर्षी नवनवा नैवेद्य बनवतात. त्यांच्या हातच्या प्रसादाची गोडी काय वर्णावी असेच सर्वांना वाटते. एखादे आजोबा असतात जे हौसेने गावातल्या प्रसिद्ध हलवायाकडचे चांगले तळहाता एव्हढे पेढे प्रसादाला आणतात. हे पेढे एरवी कितीही खाल्ले तरी गणपतीच्या दहा दिवसात प्रसाद म्हणून हातावर टेकलेला एकच पेढा किती गोड लागतो.

विषय: 
Subscribe to RSS - नेवैद्य