संगितकार

अनसंग अनहर्ड

Submitted by टवाळ - एकमेव on 26 April, 2012 - 07:56

हिंदी चित्रपट संगिताच्या सुवर्णकाळातले सर्वच संगितकार हे जनमानसातले हिरो होते. पडद्यावर कुणीही माठ असला तरी त्याची रसिकांना पर्वा नसायची. पण ही सगळी गाणी आपण ऐकतो तेव्हा एखाद्या गाण्यातला एखादा बासरीचा, व्हायोलीनचा, सतारचा किंवा अगदी ढोलकचा तुकडा आपल्याला घायाळ करून जातो आणि आपण त्या संगितकाराला दुवा देतो. पण प्रत्यक्षात चाल बांधणे या पलीकडे कित्येक संगितकारांचे कर्तृत्व नव्हते हे नंतर लोकांना माहिती होत गेले. गाण्यातल्या वाद्यांचे तुकडे, त्यांचे स्वरलेखन हे काम अ‍ॅरेंजर्स करायचे. त्याही पलीकडे जाऊन हे तुकडे (म्युझीक-पीसेस) प्रत्यक्ष वाजवणारे कलाकार मात्र कायमच उपेक्षीत राहीले.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - संगितकार