हिंदी चित्रपट संगिताच्या सुवर्णकाळातले सर्वच संगितकार हे जनमानसातले हिरो होते. पडद्यावर कुणीही माठ असला तरी त्याची रसिकांना पर्वा नसायची. पण ही सगळी गाणी आपण ऐकतो तेव्हा एखाद्या गाण्यातला एखादा बासरीचा, व्हायोलीनचा, सतारचा किंवा अगदी ढोलकचा तुकडा आपल्याला घायाळ करून जातो आणि आपण त्या संगितकाराला दुवा देतो. पण प्रत्यक्षात चाल बांधणे या पलीकडे कित्येक संगितकारांचे कर्तृत्व नव्हते हे नंतर लोकांना माहिती होत गेले. गाण्यातल्या वाद्यांचे तुकडे, त्यांचे स्वरलेखन हे काम अॅरेंजर्स करायचे. त्याही पलीकडे जाऊन हे तुकडे (म्युझीक-पीसेस) प्रत्यक्ष वाजवणारे कलाकार मात्र कायमच उपेक्षीत राहीले. चित्रपटाच्या नामावलीत एखाद्या सेकंदासाठी झळकलेलं नाव एवढीच त्यांची ओळख. अर्थात हे कलाकार अपरिचित नव्हते. पण फक्त या क्षेत्रातल्या लोकांसाठीच. सामान्य रसिकापर्यंत त्यांची ओळख कधीच पोचली नाही. या "अनसंग अनहर्ड" नायकांबद्दल जाणून घेण्याची तिव्र ईच्छा आहे. नेटवर देखील फारशी माहीती उपलब्ध नाही. माझा या क्षेत्राशी असलेला एकमेव दुवा मी दोन वर्षांपुर्वी गमावला. ही नोट (चुकून) वाचणार्यांना या बाबत काही मदत करता आली तर मी त्यांचा ऋणी राहीन.
अनसंग अनहर्ड
Submitted by टवाळ - एकमेव on 26 April, 2012 - 07:56
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा, चांगली माहिती मिळेल यातून
वा, चांगली माहिती मिळेल यातून
http://books.google.co.in/boo
http://books.google.co.in/books?id=Jx1R5rgjaigC&printsec=frontcover&sour...
म्युझिक अॅरेंजर्स- संगीत संयोजकांबद्दल एक लेख मायबोलीवर वाचल्याचे आठवते.
तुम्हाला नक्की कोणाबद्दल
तुम्हाला नक्की कोणाबद्दल माहिती गोळा करायची आहे.. संयोजक की वादक..
बरेच वादक सामान्य लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलेच.. आण्णा जोशी, प्रभाकर जोग, इनॅक डॅनियल्स, मनोहरी दास, नितीन शंकर, शिवमणी, अमर ओक, विजय चव्हाण..... असे अनेक आहेत...
प्रः तुम्हाला नक्की कोणाबद्दल
प्रः तुम्हाला नक्की कोणाबद्दल माहिती गोळा करायची आहे.. संयोजक की वादक ?
उ: खरंतर दोघांबद्दल ! पण त्यात ही वादकांबद्दल जास्त ! तुम्ही उल्लेख केलेल्या वादकांबद्दल मलाही थोडी माहीती आहे ! पण नुसत्या नावाऐवजी त्या वादकाच्या कलेचा ठळकपणे वापर केलेले एखादे गाणे ही नावाबरोबर दिले तर ते जास्त प्रत्ययी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे वर भरत मयेकरांनी दिलेली लिंक मी आधीच पाहीली होती. पण एकतर त्या पुस्तकाचे "निरुपयोगी" फुकट प्रोमोज नेटवर उपलब्ध आहेत. उपयोगी माहिती जाणिवपुर्वक गाळलेली आहे. अर्थात हा मार्केटींग स्ट्रॅटेजीचा भाग आहे. कारण पुस्तकाची किंमत भारतीय चलनात साडेसहा हजार रुपयाच्या आसपास आहे. एवढं करूनही मला हवी असलेली माहिती त्यात मिळेलच याची खात्री नाही. त्यापेक्षा थोडेसे पैसे जास्त खर्च करून मी भारतातही ही माहिती मिळवू शकतो !
@ भरत मयेकर :- म्युझिक अॅरेंजर्स- संगीत संयोजकांबद्दल एक लेख मायबोलीवर वाचल्याचे आठवते.
हो ! ही माहिती मलाही मिळाली आहे. तुमच्याकडे किंवा दुसर्या कुणाकडे त्याची लिंक असल्यास कृपया देणे ! धन्यवाद !
हा तो लेख ते गूगल बुक जमल्यास
हा तो लेख
ते गूगल बुक जमल्यास वाचा. अँथनी गोन्सालिव्हिस हे नाव दिसलं त्यात.
एफेम गोल्ड मुंबईवरच्या आरजे शुभांगी या नेहमी गाण्यांमधले संगीताचे तुकडे कोणत्या वादकांनी वाजवलेत ते सांगत असतात. आरडी बर्मन यांच्यावर केलेल्या कार्यक्रमांत त्यांनी आरडीचे वादक मनोहारी सिंग, केर्सी लॉर्ड यांच्यापैकी एकाशी (नक्की कोण ते आठवत नाही) दूरध्वनीवरून संवाद साधला होता.
टवाळ अशोक पाटील ना विपु करून
टवाळ अशोक पाटील ना विपु करून इथे यायला सांग,
ते भरपूर माहिती देतील.
टवाळ अशोक पाटील ना विपु करून
टवाळ अशोक पाटील ना विपु करून इथे यायला सांग
ठिक आहे ! सांगतो !
पण नुसत्या नावाऐवजी त्या
पण नुसत्या नावाऐवजी त्या वादकाच्या कलेचा ठळकपणे वापर केलेले एखादे गाणे ही नावाबरोबर दिले तर ते जास्त प्रत्ययी होईल.>>
ओके पटकन आठवत असलेले लिहितो आहे, अॅड करत राहिन.
जब अंधेरा होता है- तबल्याचा पीस- मारुतीराव कीर
मेरा कुछ सामान- इंटरल्यूड मधले संतूर- पं. उल्हास बापट.
चुरा लिया है तुमने- सुरवातीचे गिटार- भूपेंद्र सिंग.
आरडीच्या गाण्यात जिथे जिथे 'मादल' वाजले आहे उदा. तेरे बिना जिया जाए ना; ते रणजित गजमेर यांनी वाजवले आहे.
@ आगाऊ - हेच अपेक्षित होतं
@ आगाऊ - हेच अपेक्षित होतं (थोडंसं).
पण मला वाटतं, या धाग्याची व्याप्ती आणखी थोडी वाढवून एखाद्या गाण्याच्या जन्माबाबतचा एखादा किस्साही ईथे शेअर करायला काय हरकत आहे ?
ज्या गाण्यामुळे मला हा धागा
ज्या गाण्यामुळे मला हा धागा सुरु करायला प्रवृत्त केले त्या गाण्याविषयी प्रथम -
चित्रपट - बसंत बहार - गाणे - मै पिया तेरी तु माने या ना माने -
गाण्याच्या सुरवातीला - कॅसेट/सी डी मधे हे गाणे व्हायोलीनच्या रनिंग पिस ने सुरु होते पण चित्रपटात त्या पिसच्या आधी आणि व्हा.पिस संपला की बासरीचा एक घायाळ करणारा तुकडा आहे. तो जिथे संपतो तिथे त्या नोटला लताचा मनीचे गुज सांगणारा स्वर कानावर पडतो. आणि नंतर पुर्ण गाणेभर ती बासरी लताच्या आवाजाला फॉलो करत रहाते. ती बासरी वाजवली होती - जयवंत कुमार या कलाकाराने.
चित्रपट नागिन (जुना) - पुर्ण चित्रपट भर जो स्वर पुंगीचा म्हणून दाखवला गेला आहे ते सगळे पिसेस क्ले व्हायोलीन वर वाजवले आहेत कल्याणजी विरजी शाह म्हणजे कल्याणजी-आनंदजी मधल्या कल्याणजीने.
शोलेमधला प्रसिद्ध "चल धन्नो" हा पाठलागाचा सिन - पार्श्वभुमीवरचा तबला पं. सामता प्रसाद मिश्रांचा
चला मी सुरवात केली आहे.