शीलवंत

ओला मजकूर...

Submitted by शीलवंत सिरसाट on 14 March, 2012 - 08:28

'' मनाची घालमेल
भावनांची वादळं
आसवांचे पूर
सखे...
विसरलो नाही अजूनही
तुझ्या त्या शेवटच्या पत्रातला
ओला मजकूर!

' माझं लग्न ठरलंय...! '
कुठलीही आळीबिळी न देता
स्पष्टपणे लिहिलेलं
तुझं ते वाक्य
घुसलं सरळ छातीत
धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं;
अन
ध्वस्त झालं
माझं आयुष्य
पत्त्यांच्या मकानासारखं
क्षणात!!! ''

- शीलवंत सिरसाट
मु. वाघजाळी
मो. ९३२६७५५२७५

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शीलवंत