दुर्ग कलावंतीण
Submitted by इंद्रधनुष्य on 30 November, 2011 - 05:36
'यशवंतराव चव्हाण द्रुतगती' मार्गवरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पुर्वेला माथेरानच्या रांगेत दिसणारा प्रबळगड आणि कलावंती दुर्गाचा 'V' Shape नेहमीच लक्ष वेधून घेतो. मुंबई पासून जवळ असूनही काही ना काही कारणांनी या किल्ल्याची मोहिम बर्याच वेळा रद्द झाली. जवळच तर आहे मग आज नै तर उद्या होईलच... असे मनाशी घोटवून पुढे गेल्यावर पाच एक मिनिटांत इरशालगडाचा 'W' Shape दिसतो. या दोन्ही गडांकडे बघताना मन नेहमी खट्टू होतं... कधी कधी वाटे शेडूंग फाट्यावर गाडीतून उतरावे नी थेट 'ठाकूरवाडी'कडे कूच करावी.
विषय:
शब्दखुणा: