सात अब्ज

मनोगत

Submitted by शिलमित on 31 October, 2011 - 14:24

मनोगत
बाई, तशी तूही सहनशीलच!
अनंत काळचे उन्हाळे, पावसाळे,
किती उठली असतील वादळे.
त्यातून तावून सुलाखून
तूही इथवर पोचलीसच.
निसर्गाचे रागलोभ अन चमत्कार
तुझ्याही अंगणात हक्कानं येऊन नांदतात.
त्यांच्या खाणाखुणा, माझ्यासारख्याच
तूही जपतेस, दागिन्यांसारख्या अंगाखांद्यावर.
पण तुझ्या इच्छाआकांक्षांची ठिणगी
ओंजळीत ठेवतेस घट्ट मिटून.
त्यासाठी आभाळासारखं शक्तिशाली
करावं लागतं मन.
(मलाही हे चांगलंच माहित आहे!)
अगं, सात अब्जांना जन्म देणारी मी ,
अन, त्या सात अब्जांचा भार वाहणारी तू.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सात अब्ज