ती, तिचं बाळ आणि मी.
पुण्यामधे माझी एक पक्की जागा आहे.
माझा एक कट्टा म्हटलं तरी चालेल.
माझ्या मित्र-मैत्रिणींचा जमायचा अड्डाच आहे तो.
’डेक्कन’ वरुन कोणी जाणार असेल तर जाता-जाता ’तुलसी’कडे बघुन जातोच.
आमच्यापैकी कोणीतरी तिथे भेटायची शक्यता जास्त असते.
’तुलसी’ म्हणजे डेक्कन वरच फेमस चहाच होटेल. इथल्या ’चहा’ पासुन ते तुलसीच्या मालकापर्यंत प्रत्येक गोष्टच वेगळी.
म्हणजे सगळच वेगळं,’तुलसीच्या चहाची चव’,’तुलसीचा मालक, तुलसीचे कामगार आणि तिथे बसणा-यापर्यंत सगळच वेगळ.
माझा एक मित्र नेहमी म्हणतो,"तुलसीचा चहा गरम असतो तो पर्यंत मसालेदार, पण जर का तो थंड झाला तर त्याच चहाची ’रम’ बनते. असो...