अजय देवगण

सिंघम - परीक्षण

Submitted by फारएण्ड on 31 July, 2011 - 13:49

बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो.

विषय: 
Subscribe to RSS - अजय देवगण