विही वॉटरफॉल रॅपलिंग

विही वॉटरफॉल रॅपलिंग — एक थरारक अनुभव

Submitted by जिप्सी on 16 July, 2011 - 12:37

काही अनुभव हे शब्दातीत असतात. ते सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त गम्मत असते. असाच एक चिंब भिजलेला दिवस १० जुलैचा. मुसळधार पावसात ७०-८०च्या स्पीडने धावणारी मोटारबाईक. कोसळता पाऊस पिऊन निघालेले बाईकवीर, अर्जुनाच्या तीरासारखा अंगावर येणारा पाऊस, चिंब पावसात भिजुन खाल्लेली गरमागरम कांदाभजी, तीन टप्प्यात कोसळणारा विहिगावचा धबधबा. तिसर्‍या टप्प्यातील १२० फूट उंचीच्या सहस्त्रधारातुन केलेले रॅपलिंग. मध्यावर येताच वर-खाली, आजुबाजुला फक्त पाणी पाणी आणि फेसाळते पाणीच आणि मी. निसर्गावर केलेली हि एक प्रकारची मातच होती. पण त्याच निसर्गासोबत अनुभवलेला १५ मिनिटांचा "तो" कालावधी थरारक होता.

विषय: 
Subscribe to RSS - विही वॉटरफॉल रॅपलिंग