फुलणारी

सदाफुली

Submitted by तायड्या on 7 July, 2011 - 13:52

सदाफुली

पाच नाजुक पाकळ्यांची
लांबट हिरव्या पानांची
बारमाही बहराची
बेताच्या उंचीची
कुठेही रुजणारी
कुठेही फुलणारी
आणि म्हणूनच काहीशी दुर्लक्षिलेली ....सदाफुली

पण तिला काय त्याचे
ती आपल्याच मस्तीत वाढते
धुंदीत फुलते वार्‍यावर झुलते
इवल्याशा शेंगातून बियांची पखरण करते....सदाफुली
म्हणते
अग नसेना का लोकांना आपले महत्व
आपण फुलत रहायचे, बहरायचे
कुठे ही कसे ही
तोच आपला धर्म
कधी कोणी येईल एखादा शास्त्रज्ञ
जाणेल आपले मोल
अन मग औषधी म्हणून
आपण ठरु अनमोल
पण हे आपल ध्येय नाही
धर्म तर नाहीच नाही....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फुलणारी