सुधिर

मध्याचा प्याला

Submitted by सुधिर मते on 29 May, 2011 - 07:21

हा मद्याचा प्याला
उबडा का ठेवला
अर्क शीशीतला,
माणुस मीशीतला, ओठातच हसला

एक मद्याचा प्याला
अर्काने भरला
हलकेच झलकला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

घोट नरडिचे घेत,
अर्क सोडिला पोटात
लागला डोलायला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

कोम्बडी केली फस्त
ढेकरही दिली मस्त
समतोल सावरावयाला
अन माणुस मीशीतला, ओठातच हसला

पाहुनी उबडा प्याला
तो दु:खाने हसला
का! चाखले जहालाला ?
म्हणुन माणुस मीशीतला, ओठातच हसला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझा सहवास

Submitted by सुधिर मते on 27 May, 2011 - 10:26

भावना व्यक्त करन्याचा
धोका पत्करायचा असतो

वाईटात वाईट काय घडेल
याचा विचार करायाचा नसतो

चालतं... बोलतं .... स्वप्न (dream) पाहिले
तो दिवस विसरायचा नसतो

तुझ्या सहवासामुळे मी
माझे आयुष्य घडवु शकतो !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मैत्री चा जोश

Submitted by सुधिर मते on 26 May, 2011 - 10:38

परस्पर विरोधी स्वभावाच्या मीत्रांची
मैत्री जमली होती
एक सागर अथांग, तर..
ती खळखळती नदि होती

शुक्राच्या चांदण्यात त्यांची
वाटचाल सुरु होती.....
शेकोटीच्या शेजारी बसुन
ती, हलकेच त्याचा जोश वाढवीत होती ..!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - सुधिर