गुजगोष्टी
Submitted by Sanjeev.B on 16 May, 2011 - 07:40
"अहो तो ओबामा बिन लादेन ला त्या बराक ओसामाच्या लोकांनी मारलं म्हणे, नाही काल आमच्या ऑफिसात आमच्या लंच टाईम मधे हाच विषय होता, एव्हढं काय अवडंबर" इति : सौ.
अगं ओबामा बिन लादेन नाही, ओसामा बिन लादेन, आणि बराक ओसामा नाही, बराक ओबामा, डोकं नको खाऊ माझं, बातम्या पाहु दे.
तेच हो नावात काय आहे एव्हढं, विल्यम भाऊ नी बोलुन ठेवलंय ना "Whats there in the name".
विल्यम भाऊ, मी एकदम दचकुनच बोललो.
काय हा विल्या कधी भाऊ बिजे ला तुला काही पाठवल्याचं आठवत नाहिये.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा