गुजगोष्टी

Submitted by Sanjeev.B on 16 May, 2011 - 07:40

"अहो तो ओबामा बिन लादेन ला त्या बराक ओसामाच्या लोकांनी मारलं म्हणे, नाही काल आमच्या ऑफिसात आमच्या लंच टाईम मधे हाच विषय होता, एव्हढं काय अवडंबर" इति : सौ.

अगं ओबामा बिन लादेन नाही, ओसामा बिन लादेन, आणि बराक ओसामा नाही, बराक ओबामा, डोकं नको खाऊ माझं, बातम्या पाहु दे.

तेच हो नावात काय आहे एव्हढं, विल्यम भाऊ नी बोलुन ठेवलंय ना "Whats there in the name".

विल्यम भाऊ, मी एकदम दचकुनच बोललो.

काय हा विल्या कधी भाऊ बिजे ला तुला काही पाठवल्याचं आठवत नाहिये.

ते राहु द्या हो, आता त्या जॉन इब्राहिम ला आमच्या हवाले करा असे त्या मनमोहन देसाई ने त्य रझा मुराद गिलानी ला सांगितलं आहे, नाही तर आम्ही सुध्दा तुमच्या वर हल्ला करु आणि त्या जॉन इब्राहिम ला अटक करु.

अग जॉन इब्राहिम नाही, दाऊद इब्राहिम आणि रझा मुराद गिलानी नाही, युसुफ रझा गिलानी, आणि आपल्या पंतप्रधानांचे नाव मनमोहन सिंग आहे, मनमोहन देसाई नव्हे, कळ्ळं.

अहो पण आपल्या देशाचे पंतप्रधान तर सोनिया गांधी आहेत ना, हे मनमोहन सिंग कोण आहेत, नाही काही झालं तर तिलाच दाखवतात ना टिव्ही वर म्हणुन विचारलं.

मग जॉन इब्राहिम कोण आहे;

जॉन इब्राहिम नाही ग, जॉन अब्राहम, तो ग, आपण तो सिनेमा पाहिला होता बघ, बँक लुटुन फटफटी वरुन पळुन जातात तो सिनेमा, धुम, आठवलं का ?

फटफटी काय म्हणताय, बाईक म्हणा कि, फटफटी काय एव्हढं सुसाट वेगाने जाऊ शकतं का, एव्हढं सुध्दा कळत नाही तुम्हाला, सौ ने माझीच अक्कल काढली.

हो माहीत आहे ना तो सिनेमा, त्यात अमिताभ बच्चन आणि प्रेम चोपडा आहे ना.

अगं अमिताभ नाही अभिशेक, आणि प्रेम नाही आदित्य.

अहो, आदित्य नाही, उदय, काय हो किती गल्लत करता तुम्ही नावां मधे.

पण मला सांग तुला कसं आठवतंय त्याचं नाव, अहो आमच्या लंच टाईम मधे किनै गप्पा गोष्टी चालु असतात कोणाचं लफडं कोणाशी चालु आहे, मागे एकदा त्याचं लफडं आपल्या त्या तनु च्या मुली बरोबर होतं ना, म्हणुन त्याचं नाव लक्षात आहे.

अहो, ते आदेश भाऊजी तरी नक्की आपले होम मिनिस्टर आहेत ना, ते परत निवडुन आलेत ना, रोज त्यांची विजयी मिरवणुक दाखवताहेत झी मराठी वर, म्हणुन आपलं विचारलं.

अगं, तो काय विधान सभे वर निवडुन नाही आलाय परत, झी मराठी वाले त्याचे पुनर्वसन करत आहे, तुला नाही कळणार ते.

अहो......

आता काय.

ऐका ना, त्या पर्वा च्या मॅच मधे तो बॉलर होता ना शेट्टी मलिंगा.....

शेट्टी मलिंगा नाही गं, लसिथ मलिंगा, काय झालं त्याचं.

हो हो लसिथ मलिंगा, त्याला काय लहाणपणी लस दिलं नव्हतं का, असं का बॉलिंग टाकतो तो, आणि मला सांगा परवाच्या फायनल मॅच मधे त्यांनी आपल्या सच्चु ची विकेट घेतली होती ना, मग त्याला आपल्या इंडियन क्रिकेट टीम मधे का घेतले. केनिया च्या टीम मधुन त्याला काडुन टाकले ना, तर इकडे आला होय.

अगं, केनिया चा टिम मधे नव्हता तो, श्रीलंका च्या टीम मधे असतो तो, आणि त्याला इंडियन टीम मधे नाही, मुंबई इंडियन्स मधे घेतले आहे.

असं होय, मला वाटलं तो कुठल्यातरी केनिया च्या जंगलातुन त्याला पकडुन आणले असणार, म्हणुन मला वाटले कि केनिया च्या क्रिकेट टीम मधे आहे का.

पण मला सांगा........

बस्स, बस्स कर आता प्लिज.

तर मित्रांनो असल्या गुजगोष्टी सगळ्यांच्याच घरी होत असतील नाही का. Wink

- संजीव बुलबुले / १६ मे २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

पेराग्राफीन्ग जरा बदला..
तुम्ही काय म्हणत आहात आणी सौ. काय म्हणत आ हेत हे कळत नाहीये..

धन्यवाद इन्द्रधनु, पॅरेग्राफ्स केले आहेत.
Normally, मी असे लिहतो :-
मी : ....
सौ : ...
मी : ....
सौ : ...

पण ह्या वेळेस सलग लिहले होते. Happy

म्हमईकर जामच हिम्मत वाले दिसतात. एकावेळी सौ.च्या एवढ्या चुका तिच्या तोंडावर बोलून दाखवायच्या म्हणजे काय खायची गोष्ट आहे? Lol

मस्त

आणि आपल्या पंतप्रधानांचे नाव मनमोहन सिंग आहे, मनमोहन देसाई नव्हे, कळ्ळं.>>> खीक खीक खीक!

झी मराठी वाले त्याचे पुनर्वसन करत आहे>>> Lol