नजाकत नदी

नदीची नजाकत - ३

Submitted by भाऊ नमसकर on 15 May, 2011 - 12:31

मार्क ट्वेन हा प्रसिद्ध अमेरिकन लेखक त्याच्या कोवळ्या वयात मिसिसीपी नदीवर प्रवासी वाहतुक करणार्‍या बोटीचा पायलट होण्यासाठी तशाच एका बोटीवर उमेदवारी करत होता. तिथल्या अनुभवांवर आधारित "लाईफ ऑन मिसिसीपी" हे त्याचं गाजलेलं पुस्तक. त्यांत मिसिसीपीच्या पात्रात सतत होणारे बदल व रात्रीं सावल्या व प्रतिबिंब यांचा नदीत चालणारा खतरनाक, चकवा देणारा खेळ याचं अचूक वर्णन त्याने केलंय. महानद्यांत अग्रेसर असलेल्या मिसिसीपीची तुलना परकर्‍या पोरींसारख्या अवखळ, उनाड असलेल्या कोकणातील नद्यांशी करायला मी - कोकणवेडा असलो तरीही - कोकणातला वेडा नक्कीच नाही !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नजाकत नदी