गावठा
Submitted by शाबुत on 13 May, 2011 - 09:25
गावठा
"आता जाता-जाता शेवटच्या दिवसात, मले ह्या गावात हेही पाहावं लागींन असं वाटलं नव्हतं!" आपल्या तोंडात शेवटचे दाठीचे पाच-सहा दात बाकी असलेला, सार्या अंगावरचे केस पांढरे झालेला म्हातारा, गावठ्यावर पाच-सहा जण पाहुन बोलला. म्हातार्यानंच सुरवात केली म्हटल्यावर, आपलं धोतर सावरत तो एका दगडाला रेटुन जमिनीवरच बसला, कारण दगडावर बसणं आता त्याच्या प्रकुतीला परवडणारं नव्हतं, तसचं मागच्या कितीतरी वर्षापासुन हि जागा त्याच्याच नावावर होती.
गुलमोहर:
शेअर करा