"जाता जाता एवढ कर"
Submitted by Trupti Amberkar on 13 May, 2011 - 03:29
"जाता जाता एवढ कर"
जाता जाता एवढ कर
एकदा मागे वळून पहा
तुज्यासाठी कोणी थांबल आहे
याची जाणीव घेऊन जा
जाता जाता एवढ कर
प्रीत तू तुझी माझी
आठवणीच्या रुपात देऊन जा
सार काही तसाच आहे याची एक जाणीव देऊन जा
जाता जाता एवढ कर
मिठीतले ते क्षण माजी ओटित घालून जा
जाता जाता एवढ कर
भेट आपली आठवून जा
डोळ्यातले थेब माझ्या पुन्हा एकदा
टिपून जा
जाता जाता एवढ कर
हळूच तुझी सावली देऊन जा
हिरमुसलेल मन माझ
काही काळ घेऊन जा
जाता जाता एवढ कर
तुझा हात माज्या हाती पुन्हा एकदा देऊन जा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा