दुसरे गांधी

'दुसरे गांधी'

Submitted by आनंदयात्री on 15 April, 2011 - 12:18

आमच्या पिढीने गांधी पाहिलेलेच नाहीत. आमच्या पिढीने आणीबाणीही पाहिलेली नाही. इतकंच काय, पण देशाने पहिलावाहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हाही आम्ही एकतर पाळण्यात खेळत होतो, किंवा मग अजून जन्मालाच यायचो होतो. आम्ही फाळणी पाहणं तर सोडाच, त्याचे पडसादही थेट अनुभवलेले नाहीत. "मजबूरी का नाम" असंच ज्यांच्याबद्दल ऐकत आलो ते गांधी आम्हाला कळले असं आम्हाला वाटलं ते दिलीप प्रभावळकरांनी चेहर्‍याला रंग लावला आणि सोनूने गायलेलं ’बंदे मे था दम’ काळजापर्यंत पोहोचलं तेव्हा! जेव्हा अजयने ’लिजंड...’ मध्ये फासामध्ये मान अडकवत डोळे आमच्यावर रोखले तेव्हा भगतसिंग ही काय चीज होती हेही आम्हाला कळलं!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दुसरे गांधी