फुलबाग

माझी फुलबाग

Submitted by पाषाणभेद on 16 September, 2011 - 19:04

माझी फुलबाग

किती हौसेने फुलझाडे लाविली
पाणी देवून वाढवली जपली
काही कळ्या आल्या मुक्या
तर काही रंगीत फुले उमलली ||

परीसरात माझी फुलबाग एकटी
नव्हती तसली दुसर्‍या कुणाची
शोभेचे लावली तरूवर तेथे
काही झाडांना लपेटल्या वेली ||

अपेक्षीले न मी जरी काही
निसर्गाने तिला साथ दिली
कोंब तरारून आले वरती
अनेक कुसूमे भरभरून आली ||

येता जाता सारे बघती
कष्टाचे कुणी कौतूक करती
आनंदाचा ठेवा हा अनमोल
परी नव्हता तयांच्यासाठी ||

अशीच एकदा वेळ ती आली
नजर फुलांवर पडली काळी
दृष्ट काढली त्याच फुलांची

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमची फुलबाग

Submitted by प्रभा on 28 March, 2011 - 09:46

आमचे नातवन्ड--='' सीया, स्वरा व श्रेयस
उर्फ
जुई , जाई व श्रावण'' यान्नी फुलविली
आमची फुलबाग
=========
आमच्या जीवन-प्रवासात सुखाची झाली बरसात
आनन्दाने चिम्ब झालो नातवन्डाच्या सहवासात
नातीन्ची लागताच चाहूल,
आयुश्यात उगवली हिरवळ
बहरल्या जाई-जुई ,
दरवळला परिमळ
जाई-जुई च्या सुगन्धाने, निशिगन्ध झाला मोहीत

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फुलबाग