सोनार

सांगा कोण ?

Submitted by वर्षा_म on 14 March, 2011 - 06:37

थंडगार पाण्यासाठी माठ-रांजण
दिवाळीत पणत्यांनी उजळते अंगण
सांगा कोण देतो मातीला आकार
बघता बघता होतात भांडी साकार
>>>>> कुंभार

सुंदर दागिने आणि बाप्पाचा मुकुट
चांदीच्या उंदराला मोठ्ठी शेपूट
सांगा कोण घडवतो नाजुक बाळी
कलाकुसर करतो फुंकुन नळी
>>>>> सोनार

छोटेसे कपाट नको पसारा
देवबाप्पा साठी सुंदर देव्हारा
सांगा कोण बनवतो कृषी अवजारे
रंधा करवत याची हत्यारे
>>>>> सुतार

बनवतो तो चामडी चप्पल
पॉलिश करतो बुट आणि बक्कल
सांगा कोणाला म्हणतात चर्मकार
तुटता चप्पल याचाच आधार
>>>>> चांभार

तप्त लोखंडाला देउन बाक

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सोनार