सपेरा

गारुड ...

Submitted by vaiddya on 10 March, 2011 - 12:48

एक मस्त हवेशीर संध्याकाळ .. मार्च महिना असूनही उन्हाळ्याची चाहूलही नसलेली ही संध्याकाळ .. कारण आम्ही आहोत दिल्ली मधे. आमची गाडी मस्त मोठ्या मोठ्या रस्त्यांवरून कधी वळणं आणि कधी वेग घेत मानसिंग रोड्वरच्या ताज मधे येते .. आज इथे आहे महिंद्र एक्सलन्स इन थियटर अवॉर्डस् चा अंतिम सोहळा .. आम्ही त्यात नामांकनं मिळवलेले काही जण या गाडीतून इथे आलो आहोत. ताज मधे पूल साइड लॉन्स वरती हा सोहळा रंगणार आहे. निळ्या प्रकाशात न्हायलेलं स्टेज एका बाजूला आणि दुसरीकडे खान“पान” व्यवस्था .. सोहळ्याच्या अर्धा तास आधी कॉकटेल्स सुरू झाली आहेत .. उंची मद्यं ओतली आणि रिचवली जात आहेत ..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सपेरा