तरही गझल क्र. ३

का तुला तेव्हा हसावे वाटले होते?

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 January, 2011 - 06:55

हसावे तू .., तुझ्यासाठी रडावे वाटले होते
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते

कशाला तीच खोटी कारणे (?) भांबावलो आहे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते

जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते

जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते

अताशा वेड हे माझे मलाही पेलणे नाही
विशाला, का तुला तेव्हा हसावे वाटले होते?

डॉ. कैलास यांनी दिलेल्या "कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते" या ओळीवरून खरडलेल्या काही ओळी. Happy

शब्दखुणा: 
Taxonomy upgrade extras: 
Subscribe to RSS - तरही  गझल क्र. ३