वादात या कुणीही सहसा पडु नये

वादात या कुणीही सहसा पडू नये..

Submitted by मी मुक्ता.. on 17 February, 2011 - 03:38

घालोत वाद नेते, आपण चिडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये..

असतात भास सारे, काही खरे नव्हे
येता सुगी जराशी, कोणी उडू नये..

येईल दु:ख आता, जळता उगाच का?
पण तोवरी सुखाचा, डंका झडू नये..

आहेच अंत याला, सोसायचे किती
रामायणे पुन्हा रे, असली घडू नये..

का आज टोचली रे, मजला मिठी तुझी
पैलूस रे हिर्‍याचे, कोंदण नडू नये..

तो देश चांदण्यांचा अन् वाट दूरची
घालेल घाव नियती, आपण अडू नये..

करुया करार आता नात्यात आपल्या,
तू बोलवू नये अन् मी तडफडू नये..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - वादात या कुणीही सहसा पडु नये