तीळ आणि गुळ संक्रांतीचे, विचारांच्या उत्क्रांतीचे..
          Submitted by वरुण on 14 January, 2011 - 14:25        
      
    तीळ आणि गुळ संक्रांतीचे, विचारांच्या उत्क्रांतीचे..
तीळ आणि गुळ संक्रांतीचे, विचारांच्या उत्क्रांतीचे...
कोष्टकात मोजता न येणाऱ्या, व्यक्तीवरल्या भक्तीचे 
निष्ठा अपार मेहनतीवर, आधिपत्य इच्छाशक्तीचे
सामंजस्याने जोडू नाती, अडचणींवर तोडगे प्रयुक्तीचे.
घ्यावे न्याहाळून बंध, पवित्र रेशीम भावनांचे
तपासून गुण माणूस म्हणून, क्षमता न पात्रतांचे 
संवादाचे बळ हे मोठे, चर्चा होणे गरजेचे
सर्वांसमक्ष दर्शन घेवू, न लपणार्या सत्याचे 
तीळ आणि गुळ संक्रांतीचे, विचारांच्या उत्क्रांतीचे..
गुलमोहर: 
शब्दखुणा: 
शेअर करा