छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'विविध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत. ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.
बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)
बारा महाल
१) पोते (कोशागार)
२) थट्टी (गोशाळा)
३) शेरी (आरामशाळा)
४) वहिली (रथशाळा)
स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते.
सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडाओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये चुकीच्या पद्धतीने राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
होय दोस्तांनो... हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?