सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

Submitted by सेनापती... on 30 December, 2010 - 02:46

होय दोस्तांनो... हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?

************************************************************************************************************
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नल नाम संवत्सरे माघ शुद्ध ५ क्षत्रिय कुलावत्वंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांणी समस्त ब्राह्मण वेदपाठी व ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा प्रभू ग्रह्स्थान व वैश्यजाती व शुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा महालांनी (सुभा) व देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यास आज्ञा केली ऐसीजे.

हिंदू जातीत अनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात येवनी अंमल जाहल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छीन्न-भिन्न केली. हिंदू जातीत हाहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त जाहला.त्याजवरून श्रीईश्वरी कृपेने आमचेहोत श्री शिवाजीने यवन वगैरे दृष्टास शासन करवून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील.

परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून धर्म स्थापना जाहली. त्यास श्रीकाशी क्षेत्ररथ ब्राह्मणात काही तट पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले. त्याजवरून हल्ली पुन्हा शास्त्रीपंडित व मुत्सद्दी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाति विवेक व स्कंद पुराणांतर्गत श्याद्रीग्रंथ ((सह्याद्रीग्रंथ?) आदी महानग्रंथी निर्णय सर्व झातीविशी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे आगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्मास अधिकार असून येवनी जाहल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही द्वेषबुद्धीने शास्त्रानुरूप काही कर्मे न चालविता मलीन झाली असतील ती त्या ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचाराने. ज्या ज्ञातीत जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालविणे. जो कोणी द्रवे लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल.

हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणेजे.
************************************************************************************************************

.
.
सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा मी त्रिव्र निषेध करत आहे. जे लोक हे करत आहेत त्यांना समजत नाही आहे की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते थेट शिवरायांचा अपमान करीत आहेत...

"जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..."

मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :

तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
बदअमलाबद्दल कड़क शासन...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा
पण त्यासाठी खरा शत्रू कोण हे उमगलं तर पाहिजे ना ..
सगळे एकजूटीने राहिले तर आमच्या पुढार्‍यांना पळवाटा कुठून मिळणार..
पुतळ्याच्या नादात कांद्याचे भाव विसरलेच ना सगळे
>>सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा मी त्रिव्र निषेध करत आहे.
अनुमोदन

|| धर्माकरिता झुंजावे | झुंजता झुंजता मरावे |
मरता मारिता घावे | राज्य आपुले ||

देवद्रोही तितुके कुत्ते | मारोनि घालावे फत्ते|
देवदास होती फत्ते | यदर्थी संशय नाही ||

देवमस्तकी मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा |
मुलुख बुडावा की बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||

समर्थांनी हा उपदेश दिला होता .....

असो ...

समर्थ ...शिवबा...सारखी स्वप्नं वारंवार पडत नसतात नियतीला(--छावा) Sad

एकूणच हे जे घाणेरडे जातीयवादी राजकारण अन इतिहासाचा बट्ट्याबोळ करणं चाललय ....अन लोकांची जी निष्क्रीयता आहे त्याविषयी ....ह्यामुळे .आपण काहीही करु शकत नाही ...:( Sad Sad

|| महाराष्ट्र देश थोडका उरला | राजकारणे लोक शोधिला |
अवकाश नाही जेवायाला | उदंड कामे ||

...........हे सारे विसरुन जाणे येवढेच आपल्या हातात आहे Sad

अरे भूमी पावन झाली पण काही कर्म दरिद्री राहिलेच ना... शेवटी स्वकियांशी द्यावा लागलेला लढा अजून संपलेला नाहीये..

शापच आहे बहुदा आपल्या हजार पिढ्यांना... Sad

मला एकच प्रश्न आहे:
जर दादोजी कोंडदेव "कुलकर्णी" च्या ऐवजी त्यांचे इतर काही आडनाव असते तर कोणाची तो पुतळा हलवायची हिम्मत झाली असती का? असो.
आणि बाय द वे, जे लोक हे काही करत आहे त्याना शिवरायाना काय अभिप्रेत होते त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांची नजर त्याना या प्रकरणातुन काय मिळवता येइल याच्यावर आहे.

>>आणि बाय द वे, जे लोक हे काही करत आहे त्याना शिवरायाना काय अभिप्रेत होते त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांची नजर त्याना या प्रकरणातुन काय मिळवता येइल याच्यावर आहे.

अगदी बरोबर. नाहीतर त्यांनी आपली शक्ती, वेळ आणि पैसा ह्या गोष्टि अतिशय वाईट अवस्थेत असलेले शेकडो-हजारो गड आणि किल्ले यांच्या डागडुजी (restoration) मधे खर्च केली असती. किंवा मग सगळ्या मराठी माणसांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यात खर्च केली असती. अफझलखानाचा कोथळा काढल्याचे पोस्टर बघून श्री गणेशाच्या मूर्तीवर दगडफेक करणार्‍यांचे हात तोडले असते.
यातूनच त्यांचा दांभिकपणा आणि भेकडपणा सिद्ध होतो.
तसे न करता दादोजी एका विशिष्ठ जातीचे म्हणून त्यांच्यावर आकस.
दुर्दैव देशाचं.

जेम्स लेन / दादोजी हे विषय सर्व फक्त मोहरे आहेत.. हे एका मोठ्या राजकारणाची फक्त काही तुकडे आहेत... पण त्यामुळे आपण भावी पिढीचे काय नुकसान करतोय ह्याची त्यांना तमा नाही.. त्यांना कळेल तर ना की ते काय करत आहेत...

अनुमोदन पभ.
काही ठराविक राजकारण्यांची अंडीपिल्ली बाहेर येण्याची शक्यता दिसायला लागली की ह्या संघटना, ही विचार विकृती अचानक मेडिया मधे दिसू लागतात. आणि मग या राजकारण्यांना आवरसावर करायला वेळ मिळतो. हे ही विसरता कामा नये.

जो कोणी द्रवे लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल....

>>> इथे तर सरकारच हे करून आणतंय... तक्रार करायची कोठे???

<<सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा मी त्रिव्र निषेध करत आहे>>
१०००% सहमत !
...जे जे होईल ते ते पहाणे....दुसरं काय करू शकतो रे आपण ??? Sad

हा पुतळा हलवायचा निर्णय नेमका कुणी घेतला. त्यावर इतक्या गुपचूप रित्या कार्यवाही का केली गेली. याबाबत माहीती बाहेर आली का ? मी वाचली नाही.
महाराजांचे सगळेच विसरले गेले रे, नुसते पुतळेच राहिले.

मला तर ते व्ही एच पीचेच कारस्थान आहे असे वाटते. त्यांच्याच ऑफिसम्ध्ये बरे ते पत्रक आले.? त्याशिवाय स्वतः होऊन रिअ‍ॅक्ट कसे होता येईल? ह्या युक्त्या आता जुन्या झाल्या.

Historians, it is said, fall into one of three categories:
Those who lie.
Those who are mistaken.
Those who do not know. - anonymous

अजुन एक Oscar Wilde कडुन - The only duty we owe to history is to rewrite it.

असो. जातपात/धर्म याबद्दल भरपुर बोललो आहेच पुर्वी. परत "गाढवापुढे गायली गीता/कुराण/बायबल .....:डोमा: " असे नको.!

मेलेल्या माणंसाबद्दल हे करण्यात वेळ घालवणारे जीवंत माणसे मरत आहेत त्याकडे जेव्हा ल़क्श देतील तो सुदिन.

अजुन एक Oscar Wilde कडुन - The only duty we owe to history is to rewrite it.
----- ते करणे सर्वांनाच शक्य नसते, मग काय असलेला इतिहासच बदलायचा आणि तेच होत आहे.

भगवद्गीता आणि महाभारत दोन्ही जाळायचं.. किती हा मूर्खपणा! नुस्तं महाभारत जाळलं की गीतापण जळतेच की! Proud का लॉर्ड्स आर्मीच्या महाभारतात गीता नाही? हिंदु धर्माची पुस्तकं विकत घेऊन असे लोक जाळणार असतील, तर जाळु देत बिचारे ! Proud यांच्यासाठी स्वतंत्र आवृत्त्या छापाव्या लागतील.

बी ग्रेडी लोकांनी यडछाप इतिहासतज्ञ पैदा केले आहेत. त्यांना ईतिहासाची मोडतोड करण्याची सुपारी दिली आहे. कुठे ते व्यासंगी पुरंदरे,मेहंदळे मंडळी आणि कुठे हे तंबाखु मळणारे, गुडघ्यात मेंदु असलेले बी ग्रेडी बुजगावणे.