शिवणाची कात्री

शिवणाची कात्री

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या, झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शिवणाची कात्री