सपाटीकरण

मॅकडोनल्डायझेशन, एकजिनसीकरण, सपाटीकरण इत्यादी

Submitted by चिनूक्स on 28 April, 2026 - 07:37

यंदा उन्हाळ्यात गंगोत्रीला गेलो होतो. पूर्वी, पंधरावीस वर्षांपूर्वी, लागोपाठ चारपाचदा तिथे जाणं झालं होतं. मधल्या काळात झालेले बदल या प्रवासात चांगलेच डोळ्यात भरले. पूर्वी ऋषिकेश मागे पडल्यावर लगेच थंडीची जाणीव होई. आता ऋषिकेशपासून मोठाल्या रस्त्यांचं बांधकाम सुरू होतं. सगळीकडे धूळ भरलेली होती. कमालीचं उकडत होतं. वाटेत लागणारं उत्तरकाशी आता मोठं शहर झालं आहे. पूर्वी या लहानश्या गावातून रस्ता जाई. आता शहरात जावं लागू नये, म्हणून शहराबाहेरून रस्ता काढला आहे. जुनी लाकडी घरं आता दिसत नाहीत. विदर्भ - मराठवाड्यात असतात तश्या निळ्यागुलाबी चुन्यानं रंगवलेल्या भिंती आहेत.

विषय: 
Subscribe to RSS - सपाटीकरण