चाळीशी नंतर वाटणाऱ्या प्रेमाबद्दल काही

चाळीशी नंतर

Submitted by तुषार विष्णू खांबल on 13 September, 2025 - 14:45

चाळीशी नंतर
शब्दांकन - तुषार खांबल

चाळीशीनंतर वाटे मला
की पुन्हा तारुण्यावर स्वार व्हावे
शुभ्र घोड्यावरून येणारा
तुझ्या स्वप्नातील राजकुमार व्हावे

एखाद्या अनोळखी वळणावर
नकळत आपली भेट व्हावी
रखरखत्या वाळवंटात ती
मृगजळापरी भासावी
मला समोर पाहताच मग लाजून
गुलाबी तुझे गाल व्हावे
चाळीशीनंतर वाटे........

जुन्या साऱ्या आठवणी
मग डोळ्यासमोर याव्या
अबोल दोघे तरीही त्या
नयनातून व्यक्त व्हाव्या
माझ्या मनातील भावनांना
खुले तुझ्या हृदयाचे द्वार व्हावे
चाळीशीनंतर वाटे .........

Subscribe to RSS - चाळीशी नंतर वाटणाऱ्या प्रेमाबद्दल काही